Exit Poll लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. कुणाची सत्ता येणार हे त्याच दिवशी ठरेल. मात्र, त्यापूर्वी शनिवारी (१ जून) एक्झिट पोलचे कल हाती आले आहेत आणि जवळ जवळ सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात भाजपाने ‘अबकी बार ४०० पार, एक बार फिर मोदी सरकार’ या घोषणेने केली. प्रचाराच्या पहिल्या दोन टप्प्यांत हीच घोषणा केंद्रस्थानी होती. परंतु, त्यानंतर संविधान बदलाचा मुद्दा चर्चेत आला आणि ‘४०० पार’च्या घोषणेचा स्वरच कमी झाला. परंतु, आता एक्झिट पोलचे भाकीत समोर आल्यानंतर भाजपाप्रणीत एनडीएला खरोखर ४०० हून अधिक जागा मिळतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विविध एक्झिट पोलनी काय अंदाज व्यक्त केला? आणि या एक्झिट पोलनुसार एनडीए ‘४०० पार’ लक्ष्याच्या किती जवळ आहे? यावर एक नजर टाकू या.

हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
bjp Freebies route to delhi assembly power
दिल्ली निवडणुकीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी?

लोकसभा निवडणुकीचा सातवा व शेवटचा टप्पा शनिवारी पार पडला. त्यानंतर एक्झिट पोलने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता व्यक्त केली. सध्या संसदेत एनडीएकडे ३४२ जागा आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसकडे संसदेत ५२ जागा आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने यावेळी ४०० जागांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. जवळपास सर्व संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांनी भाकीत केले आहे की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करील.

एक्झिट पोल्सचा अंदाज काय?

न्यूज १८ मेगा एक्झिट पोलने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५५ ते ३७० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात केवळ भाजपालाच ३०५ ते ३१५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी १२५ ते १४० पर्यंतचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. इतर पक्षांना ४२ ते ५२ जागा मिळतील, असा अंदाज न्यूज १८ मेगा एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

‘चाणक्य’ एक्झिट पोलने मागील दोन लोकसभा निवडणुकांचा सर्वांत अचूक अंदाज व्यक्त केला होता. यंदाच्या मतदानोत्तर चाचणीत एनडीएला चाणक्य एक्झिट पोलने ३८५ ते ४१५ जागा मिळतील, असे भाकीत केले आहे. या अंदाजानुसार भाजपाने दिलेली ‘४०० पार’ची घोषणा खरी ठरण्याची शक्यता आहे. या पोलनुसार, भाजपालाच ३२० ते ३५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, इंडिया आघाडीला ९६ ते ११८ जागा आणि इतर पक्षांना २७ ते ४५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक ‘भास्कर’च्या मतदानोत्तर सर्वेक्षणात एनडीएला २८१ ते ३५० जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; तर इंडिया आघाडीला १४५ ते २०१ आणि इतर पक्षांना ३३ ते ४९ जागा मिळतील, असे भाकीत या सर्वेक्षणातून करण्यात आले आहे.

‘जन की बात’ एक्झिट पोलने एनडीएचा मोठा विजय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘जन की बात’च्या मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार युतीला ३६२ ते ३९२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा आणि इतरांना केवळ १० ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोल्सचा अंदाज (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

‘इंडिया टुडे-माय ॲक्सिस पोल’ने एनडीएला ३६१ ते ४०१ जागा; तर इंडिया आघाडीला १३१ ते १६६ आणि इतर पक्षांना ८ ते २० जागा मिळतील, असा अंदाज आहे. ‘सी व्होटर’ने एनडीएला ३५३ ते ३८३ जागा; तर इंडिया आघाडीला १५२ ते १८२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणात इतर पक्षांना चार ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘इंडिया न्यूज-डी डायनामिक्स पोल’ने भाकीत केले आहे की, एनडीएला ३७१ हून अधिक जागा मिळतील. या एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीला १२५; तर इतर पक्षांना ४७ जागा मिळतील, असा अंदाज आहे. रिपब्लिक भारत-मॅट्रिझ पोलने म्हटले आहे की, एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. दरम्यान, इंडिया आघाडीला ११८ ते १३३ आणि इतर पक्षांना ५० जागा मिळतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे.

रिपब्लिक टीव्ही-पीएमआरक्यू पोलनेही एनडीएला ३५९ जागांसह मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या पोलनुसार, इंडिया आघाडीला १५४, तर इतर पक्षांना ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. एनडीटीव्ही पोलनुसार एनडीएला मिळणार्‍या जागांचा अंदाज ३५८ आहे. इंडिया आघाडीला १४८ आणि इतर पक्षांना ३७ जागा मिळतील, असे भाकीत एनडीटीव्ही एक्झिट पोलने केले आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने असे भाकीत केले आहे की, इंडिया आघाडीला १०९ ते १३९ आणि इतर पक्षांना २८ ते ३८ जागा मिळतील.

लोकशाहीचा उत्सव

भाजपा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सांगितले की, लोकांनी सक्षम, शक्तिशाली, विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी तुष्टीकरण, घराणेशाही व भ्रष्टाचार बाजूला ठेवून मतदान केले आहे. भाजपा लोकसभेच्या ३७० पेक्षा जास्त आणि एनडीए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : राजधानी दिल्लीत पाण्याची वानवा; आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

एका निवेदनात नड्डा यांनी भाजपासाठी हा ‘लोकशाहीचा उत्सव’ यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी २०६ हून अधिक प्रचारसभांना संबोधित केले. सुमारे २३ रोड शो केले आणि जवळ जवळ ८२ मुलाखती दिल्या. त्यांनी निवडणुकीचे मुद्दे देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांचे निश्चितच परिणाम दिसत आहेत,” असे नड्डा म्हणाले.

दरम्यान, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या होणाऱ्या मतमोजणीपूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांनी दावा केला की, इंडिया आघाडी यंदाच्या निवडणुकीत २९५ पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील. आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर हा आकडा पुढे आला आहे.” ते पुढे म्हणाले, “हे लोकांचे सर्वेक्षण आहे. लोकांनी ही माहिती आमच्या नेत्यांना दिली आहे.”

Story img Loader