Aarogya Setu Personal Data Of Indians: कोविड १९ दरम्यान चर्चेत राहिलेल्या आरोग्य सेतू अॅपद्वारे गोळा केलेल्या तुमच्या माहितीचे पुढे काय झाले याची तुम्हाला कल्पना आहे का? अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत माहिती देताना याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. आजवरच्या अनेक चर्चांमध्ये आरोग्य सेतुबाबत मुख्य दोन समस्या समोर आल्या होत्या. यातील एक म्हणजे अॅपचे स्वरूप आणि दुसरं म्हणजे गोपनीयतेला धोका. आता कोविडची लाट ओसरल्यावर अॅपच्या अनिवार्य वापराचा नियम शिथिल झाला आहे पण तुमच्या डेटाचा काय वापर करण्यात आला हे माहिती आहे का? आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य सेतूबाबत चिंता काय होती?

आरोग्य सेतू मोबाईलमध्ये असणे हे सुरुवातीला रेल्वे आणि हवाई प्रवासासाठी अनिवार्य होते. केवळ सरकारी संस्थाच नाही तर झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या वितरण कर्मचार्‍यांना अॅपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य केले होते.

अॅपला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या डेटाचे स्वरूप पाहता लोकांनी गोपनीयतेची चिंता देखील व्यक्त केली होती. डेटा सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला असला तरी, त्यासाठी नेमके काय माध्यम वापरले होते याविषयी लोकांना माहिती नव्हती. २०२० मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात अॅपच्या अनिवार्य स्वरूपाविरुद्ध आणि त्याच्या डेटा संकलन पद्धतींविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने अॅपच्या वापरावर स्थगिती देण्यास नकार दिला, परंतु वापरकर्त्याकडे आरोग्य सेतू नसल्यास एखाद्या नागरिकाला कोणतीही सेवा नाकारू शकत नाही असेही म्हटले होते.

आरोग्य सेतूवरील माहितीचं पुढे काय झालं?

बुधवारी ८ फेब्रुवारीला काँग्रेस खासदार अमर सिंह यांनी आरोग्य सेतूद्वारे गोळा केलेल्या डेटावर नियंत्रण ठेवणारे सध्याचे कायदे/ प्रोटोकॉल तसेच डेटा हाताळणाऱ्या सरकारी किंवा खासगी संस्था व व्यक्तींची यादी मागितली होती.यावर उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीने २९ मार्च २०२० रोजी एक आदेश जारी केला होता. यानुसार धोक्याची क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि प्रभावी उपाय प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन करणारा एक गट स्थापन केला होता. कोविड-19 महामारीच्या काळात या योजनांच्या प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सर्व कामे या गटामार्फत केलेली होती.

अधिकार प्राप्त गटाच्या निर्णयानुसार, अध्यक्षांनी ११ मे २०२० रोजी एक आदेश जारी केला ज्यात आरोग्य सेतू डेटा ऍक्सेस आणि नॉलेज शेअरिंग प्रोटोकॉल, २०२० विषयी माहिती देण्यात आली होती. आरोग्य सेतू मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे नागरिकांच्या खाजगी माहितीचे संरक्षण करण्यासाठी यामार्फत नियम बनवण्यात आले होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: करोना संपलेला नाही! हरणांमुळे पूर्ण जगावर पुन्हा येऊ शकते कोविडचे संकट, नवा अभ्यास काय सांगतो?

नागरिकांच्या माहितीचे ट्रेसिंग अॅप म्हणून काम करत असताना, त्याने एखाद्या व्यक्तीचे नाव, फोन नंबर आणि लिंग यासारखे वैयक्तिक तपशील गोळा करण्यात आले होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्य आरोग्य विभाग, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आणि जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्या मंजूर अधिकाऱ्यांनाच आरोग्य सेतूद्वारे गोळा केलेला डेटा हाताळण्याची परवानगी देण्यात आली होती. आता आरोग्य सेतू मोबाईल ऍप्लिकेशनचे संपर्काचे ट्रेसिंग वैशिष्ट्य बंद करण्यात आले आहे. तसेच गोळा केलेला संपर्काचे ट्रेसिंग डेटा हटवण्यात आला आहे.

आरोग्य सेतूचे भविष्य काय?

जेव्हा आरोग्य सेतू लाँच झाले तेव्हा गोपनीयता कार्यकर्त्यांनी असा अंदाज लावला होता की आरोग्य सेतूच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. कोविडची लाट ओसरल्यावर फेब्रुवारीमध्ये, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने त्यांच्या प्रमुख आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे आरोग्य सेतू अॅपसह एकत्रीकरण करण्याची घोषणा केली, ज्यामुळे वापरकर्त्यांना अॅपवरून १४ -अंकी अद्वितीय आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करता येतील.

हे ही वाचा<< विश्लेषण: व्हर्जिनिटी टेस्ट का व कशी केली जाते? उच्च न्यायालय ते WHO ने सांगितलेलं कौमार्य चाचणीचं वास्तव काय आहे?

या अॅपमध्ये क्यूआर कोडद्वारे आरोग्य स्थिती शेअर करणे, ओपन एपीआय, आरोग्य सल्लागार आणि चाचणी प्रयोगशाळेचे तपशील यांसारख्या अतिरिक्त सोयी सुद्धा देण्यात आल्या आहेत. याबाबत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या संचालक सीमा खन्ना यांनी माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened with aarogya setu private data collected during covid 19 by modi government update explained svs