सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज २ ऑगस्ट रोजी सकाळी  उघडकीस आली आणि कलाविश्वाला जबरदस्त धक्का बसला. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. नितीन देसाई यांच्या अशा अचानक दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवसागणिक वाढत चाललेल्या आत्महत्या ही चिंतेची बाब ठरत आहेत. विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रासलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्राचा देशभरातून दुसरा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा विचार करता मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. यानिमित्ताने या आत्महत्या या विषयाचे विविध पैलू समजून घेणे, महत्त्वाचे ठरावे. 

नैराश्य कसे निर्माण होते?

प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे सांगतात, नैराश्य हे अचानक सुरु होत नाही, ती एक प्रक्रिया आहे. सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आपल्यावर परिणाम होत असतो. या बदलांमुळे मनात अनेकदा सकारात्मक व नकारात्मक विचार येतात. त्यामुळे मेंदूमध्ये अनेक रासायनिक बदल होतात. ही प्रक्रिया दीर्घकालीन आहे. अपेक्षाभंग झाला की आपल्याला दुःख होते, हे वारंवार घडले की मेंदूमध्ये विशिष्ट रासायनिक प्रक्रिया वारंवार व्हायला लागतात. त्यामुळे मेंदूचा समतोल बिघडतो. त्यामुळेच नकारात्मक गोष्टी सहन करणे अवघड होते. डॉ. आशीष देशपांडे सांगतात, मेंदूतील रासायनिक बदलांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, आणि मेंदूला काम करणे अशक्य होते. त्यामुळे एकाग्रता येत नाही, झोप लागत नाही, तरतरीत वाटत नाही. ही लक्षणे मेंदूमधील भावनेशी संबंधित (लिंबीक कॉर्टेज) काही भागांमधील बदलांमुळे दिसून येतात.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

नैराश्य आणि आत्महत्येचा संबंध कितपत असतो?

नैराश्यग्रस्त व्यक्ती आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींसाठी कोणाला कारणीभूत ठरवते यावरून त्या व्यक्तीची पुढची कृती लक्षात येऊ शकते. जर नैराश्यासाठी स्वत:ला कारणीभूत ठरवत असेल तर आत्महत्येसारखे पर्याय निवडले जातात. मात्र हा राग समाजावर असेल तर हिंसा होऊ शकते. अर्थात नैराश्य हे आत्महत्येशी निगडित असते. मात्र प्रत्येक हिंसा ही नैराश्याशी निगडित असतेच असे नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने काही वर्षांपूर्व एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुंबईमध्ये ३८ हजार ५८८ तर राज्यात अंदाजे सव्वा लाख व्यक्ती मानसोपचार घेत आहेत. 

नैराश्यासाठी जबाबदार रसायने कोणती ?

सिरोटोनिन, नॉर एपिनेफ्रिन, डोपामिन ही रसायने प्रामुख्याने मेंदूमध्ये नैराश्य येण्यासाठी जवाबदार आहेत. ज्या वेळी माणसाला नैराश्य येते, त्यावेळेस मेंदूतील रसायनांचे प्रमाण कमी होते. डॉ. आशीष देशपांडे सांगतात, ‘व्यक्तीला नैराश्याचा आजार होण्यासाठी मेंदूच्या विशेष भागांत पेशींची प्रथिनोत्पादनाची प्रक्रिया बदलणे आवश्यक असते. ही प्रक्रिया जशी जनुकांवर अवलंबून असते तशीच त्या व्यक्तीच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. व्यक्तीचं जेनेटिक स्ट्रक्चर आणि वातावरणाचा तिच्यावर होणारा परिणाम या दोन्ही गोष्टींचा समन्वय होतो तेव्हाच त्या व्यक्तीमध्ये नैराश्याची गुणसूत्रे (क्रोमोझोम्स) किंवा जनुकं (जीन्स) असतील आणि त्याच्या जोडीला वातावरणात ताणतणाव असेल तर त्या सगळ्याच्या परिणामातून त्या व्यक्तीला नैराश्याचा आजार होतो. याची शक्यता आता साधारण १८ ते २५ टक्के इतकी असते. म्हणजे जन्माला आलेल्या १०० बालकांमध्ये १८ ते २५ बालकांना नैराश्याचा त्रास आयुष्यात एकदा तरी अनुभवावा लागेल’. 

मानसिक विकाराची लक्षणे काय  

मानसिक विकारांच्या प्राथमिक लक्षणांमध्ये  एकटेपणा जाणवणे, सतत रडावेसे वाटणे, उत्साह न वाटणे,  भूक कमी लागणे, वजन कमी होणे, अवयवांमध्ये दुःखी जाणवणे इत्यादींचा समावेश होतो. आयुष्यात जे काही घडतयं त्याविषयी नाखूष असणे ही प्रवृत्ती विकसित होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंताग्रस्तता यांची लक्षणे प्रामुख्याने आढळून आली आहेत.

आत्महत्या हाही गंभीर आजारच

डॉ. आशीष देशपांडे या संदर्भात सांगतात, नैराश्य हा मानसिक विकार समजला जाणारा आजार असला तरी प्रत्यक्षात हा आजार शारीरिक असून तो मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्वाइन फ्ल्यू अशा कोणत्याही आजाराइतकाच गंभीर आहे. नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांची संख्या मोठी आहे. आजचं राहणीमान, बदलती सामाजिक परिस्थिती, वाढती स्पर्धा, नातेसंबंध या सगळ्यामुळे लोकांचं जगणंच बदललं आहे. या स्पर्धेत टिकून राहताना बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोय याची कल्पनाच नसते. आणि ती असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हळूहळू याचं प्रमाण वाढून एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. आज जरी सोशल मीडियामुळे जग जवळ येत असलं तरी, या सोशल मीडियाच्या  आधीनतेमुळे लोकांना विविध मानसिक-शारीरिक आजारांना सामोरं जावं लागत आहे.

अधिक वाचा : काळे पाणी म्हणजे काय? ते पिणे किती आरोग्यदायी?

सर्व वयोगटाच्या व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण आढळून येते, त्यामुळेच या आजारावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे.

या प्रश्नासंदर्भात इतर मनोविकारतज्ज्ञांशीही संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आत्महत्या ही आत्महत्याच असते. सेलिब्रिटींची वेगळी आणि सामान्य माणसाची वेगळी असा भेद त्यात नसतो. दोघांचीही आत्महत्या नैराश्येतूनच होते. प्रत्येकाची कारणे नैराश्यामागची वेगळी असतात. परंतु, तणाव असह्य होतो आणि मार्ग नाही अशा कोंडींत माणूस सापडतो उपायांसाठी वैज्ञानिक मार्गदर्शन लाभत नाही तेव्हा आत्महत्या होतात.  सेलिब्रिटींचे नैराश्याचे प्रमाण आणि सामान्य माणसाचे वेगळे असे वस्तूतः काहीही वेगळे नसते. त्यामुळे आत्महत्या मग ती कुणाचीही असो, ती आत्महत्याच असते, त्यात भेद नसतो !