सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज २ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आणि कलाविश्वाला जबरदस्त धक्का बसला. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. नितीन देसाई यांच्या अशा अचानक दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवसागणिक वाढत चाललेल्या आत्महत्या ही चिंतेची बाब ठरत आहेत. विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रासलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्राचा देशभरातून दुसरा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा विचार करता मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. यानिमित्ताने या आत्महत्या या विषयाचे विविध पैलू समजून घेणे, महत्त्वाचे ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा