पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या आणि राज्यात तिसऱ्यांदा ममताराज येणार असल्याचं निश्चित झालं. त्याचा जसा झटका पंतप्रधानांपासून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मोठी फौज पश्चिम बंगालमध्ये उतरवून देखील पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भाजपाला बसला, तसाच तो सिनेअभिनेत्री कंगना रनौतला बसला! आता पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा कंगना रनौतशी काय संबंध? तर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कंगना रनौतनं ममता बॅनर्जी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत एक वादग्रस्त ट्वीट केलं. ट्विटरच्या लेखी कंगनाच्या ‘वादग्रस्त ट्वीट्स’चा घडा भरला आणि ट्विटरनं कंगना रनौतचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं. अर्थात बंद करून टाकलं! पण अकाउंट नेमकं कोणत्या परिस्थितीत सस्पेंड होतं? एकदा सस्पेंड झालेलं अकाउंट पुन्हा कधीच सुरू होऊ शकत नाही का? कंगनाला दुसरं ट्विटर अकाउंट सुरू करता येईल का? समजून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं!

ट्विटर अकाउंटवर कारवाई केव्हा होते?

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

ट्विटरच्या नियमावलीनुसार एखादा ट्विटर वापरकर्ता त्याच्या अकाउंटवरून वारंवार आक्षेपार्ह, द्वेष निर्माण करणारे, अश्लीलता पसरवणारे, कॉपीराईट नियमांचं उल्लंघन करणारे किंवा या कोणत्याही संदर्भात ट्विटरच्या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई केली जाते. कंगना रनौत हिचं ट्विटर अकाउंट जसं सस्पेंड करण्यात आलं आहे, त्याचप्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सवर कारवाईचे अनेक प्रकार ट्विटरकडे आहेत.

किती प्रकारे ट्विटर करू शकते कारवाई?

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ट्विटर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करू शकते. एखादं ट्वीट आक्षेपार्ह असेल, तर त्या ट्विटला ‘Disputed’ किंवा ‘MIsleading’ असं लेबल लावलं जातं. किंवा विशिष्ट प्रदेशात किंवा देशात हे ट्विट युजर्सला दाखवलं जात नाही. ट्वीट अगदीच गंभीर असेल, तर युजरला ते काढून टाकावं लागतं. त्यासंदर्भात ट्विटरकडून युजरला मेल करून सांगितलं जातं. जोपर्यंत हे ट्विट युजर काढत नाही, तोपर्यंत ते इतर युजर्ससाठी हाईड म्हणजेच लपवलं जातं.

काही ट्विट्स हे नियमांचं उल्लंघन करत असूनही ट्विटरकडून अपवाद म्हणून कायम ठेवले जाऊ शकतात. पण असे ट्विट्स इतरांना दाखवण्याआधी त्यात काय आक्षेपार्ह आहे हे सांगितलं जातं. युजरनं तरी इच्छा दर्शवली, तर ते ट्विट युजरला दाखवलं जातं.

खात्यांवर केली जाणारी कारवाई!

एखाद्या प्रोफाईलमध्ये किंवा युजरनं ट्वीट केलेल्या फोटो/व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह असल्यास तात्पुरते ते इतरांसाठी हाईड केले जाते आणि युजरला अपेक्षित बदल करण्यास सांगितले जाते. जर एखादा युजर एखाद्या वादात अडकून ट्वीट्स करत असेल, तर ते अकाउंट १२ तास ते ७ दिवस अशा कालावधीसाठी फक्त Read-only mode वर ठेवले जाते. म्हणजे युजरला ट्वीट, लाईक किंवा शेअर करता येत नाही. वाद शमल्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह केले जाते. एखाद्या युजरनं केलेलं नियमांचं उल्लंघन अत्यंत गंभीर आणि वारंवार स्वरूपाचं असेल, तर ते खातं कायमस्वरूपी बंद केलं जातं. कंगनाच्या अकाउंटवर हीच कारवाई केली आहे! याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट देखील ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलं आहे.

कंगनाला ट्विटरकडून दणका; अकाऊंट कायमचं बंद

खातं कायमस्वरुपी बंद म्हणजे काय?

एखादं खातं कायमस्वरुपी बंद करणं ही ट्विटरकडून कुठल्याही ट्वीट किंवा युजरवर केली जाणारी सर्वात गंभीर अशी कारवाई आहे. एखादा युजर वारंवार ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करत असेल, द्वेष निर्माण करणारे किंवा अपमानजनक ट्वीट्स किंवा प्रतिक्रिया किंवा अशा स्वरुपाचं वर्तन करत असेल तर त्याच्यावर ही कारवाई केली जाते. कंगणाच्या प्रकरणात द्वेष निर्माण करणारे आणि अपमानजनक ठरतील असे ट्वीट करण्याबाबतच्या नियमांचं सातत्याने उल्लंघन झाल्याची बाब ट्विटरकडून नमूद करण्यात आली आहे. तसेच, या वर्तनातून समाजात गंभीर परिणाम उमटू शकतात, असं देखील नमूद करण्यात आलं आहे.

सस्पेंड झालेलं अकाउंट जगात कुठेही दिसू शकत नाही. या अकाउंटशी संबंधित प्रोफाईल, ट्वीटस किंवा मीडिया असं काहीही दिसू शकत नाही. तसेच, अशा ट्विटर युजरला पुन्हा नवीन ट्विटर अकाउंट देखील उघडता येऊ शकत नाही. अशा प्रकरणात युजरला त्याने केलेल्या नियमभंगाविषयी माहिती दिली जाते आणि नंतर त्यावर कारवाई केली जाते.

ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाने केला वर्णद्वेषाचा आरोप, म्हणाली, “अमेरिकेला असं वाटतं की…”

बंद अकाउंट पुन्हा सुरू होणार की नाही?

ट्विटरकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की अकाउंट सस्पेंड करणं ही सर्वात गंभीर अशी कारवाई आहे. त्यामुळे अशा कारवाईविरोधात युजरला दाद मागण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीवरून जर ट्विटरला वाटलं की संबंधित युजरवर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे, तर त्याच्या तक्रारीचा विचार होऊ शकतो. मात्र, जर त्यातून ट्विटरची खात्री पटू शकली नाही, तर ट्विटर संबंधित युजरला त्याच्या नियम उल्लंघनाचं गांभीर्य विषद करणारा लिखित प्रतिसाद देईल.

कंगना रनौतला ट्विटरकडून वारंवार इशारे देण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र, वारंवार कंगनाकडून नियमांचं उल्लंघन होत राहिलं. कंगनाच्या ट्विटर अकाऊंटला जवळपास ३० लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे कंगनानं नुकतंच पश्चिम बंगाल निवडणुकांनतर केलेलं ट्वीट हे त्या घड्यातलं शेवटचं ट्वीट ठरलं आणि ट्विटरनं कंगनावर कारवाईचा बडगा उगारला!