जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (James Webb Space Telescope) कामगिरीकडे अवकाश तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राशी संबंधित लोकांचे लक्ष लागले होते. डिसेंबरमध्ये प्रक्षेपित केलेली आणि पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या कक्षेला समांतर L2 या कक्षेत भ्रमण करणाऱ्या या अवकाश दुर्बिणीने काढलेली छायाचित्रे नेमकी कशी असतील याची उत्सुकता होती. या दुर्बिणीशी संबंधित नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा स्पेस एजन्सी यांसह अमेरिकेतील काही खगोल अभ्यासक संस्था यांनी पहिली पाच विविध छायाचित्रे मंगळवारी प्रसिद्ध केली. यावरुन सर्वजण आश्चर्यचकितच झालेच पण त्याचबरोबर विश्वाचा वेध घेणाऱ्या या अवकाश दुर्बिणीच्या क्षमतेची सर्वांना खात्री पटली. यानिमित्ताने अवकाश दुर्बिणीचे संचालन करणाऱ्यांना टेलिस्कोपबद्दल पाच प्रमुख गोष्टी माहित होत आहेत.

अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी

Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
effective use of artificial intelligence in bhabha atomic research centre
कुतूहल : बीएआरसी आणि टीआयएफआर
an overview of explainable artificial intelligence
 कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन
kaho na pyaar hai hritik roshan movie sets guinness world record
हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
Dog jumps to save drowning owner
पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने मारली उडी; VIDEO पाहून व्हाल अवाक्
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही हबल या अवकाश दुर्बिणीच्या (Hubble Space Telescope) पुढचे काम करत आहे. छायाचित्र काढण्याची गुणवत्ता सुधरवण्यासाठी हबल दुर्बिणीची तब्बल पाच वेळा दुरुस्ती करावी लागली होती. हबलची दुरुस्ती करणे शक्य होते पण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपबाबत तसे शक्य नाही. त्यामुळे जेम्स वेबची छायाचित्रे कशी असतील याकडे सर्वांचे लक्ष होते. जी छायाचित्रे जेम्स वेबने काढली आहेत ती अपेक्षपेक्षा चांगली, सुस्पष्ट असल्याची प्रतिक्रिया जेन रिगबे या प्रकल्प संचालिकेने दिली आहे. या छायाचित्रांमुळे आता खऱ्या अर्थाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप युग सुरु झाल्याचे मानले जात आहे. अवकाशातील १३ विविध ठिकाणे ही निश्चित करण्यात आली असून आता या दुर्बिणीद्वारे त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून नवे संशोधन, माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

अवकाशात आणखी खोलवर बघता येणार

अवकाशातील दिर्घीकांचा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SMACS 0723 या भागाचे जेम्स वेबने घेतलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. याच भागाचे छायाचित्र हबल टेलिस्कोपने काही वर्षांपूर्वी घेतले होते. जेम्स वेबने घेतलेले छायाचित्र हे तुलनेत कित्येक पटीने स्पष्ट असून यामधील हजारो दिर्घीकाही आधीच्या छायाचित्रांपेक्षा अधिक सुस्पष्ट दिसत आहेत. हा दिर्घिकांचा समूह आपल्यापासून १३ अब्ज १० कोटी प्रकाशवर्षे दूर आहेत. म्हणजेच या दिर्घीकांचा समूहांपासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहचण्यास १३ अब्ज वर्षे लागली. तेव्हा १३ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर तेही अत्यंत स्पष्टपणे बघणे या जेम्स वेबच्या माध्यमातून शक्य होणार आहे. थोडक्यात अनंत अशा अवकाशात दूरवर बघणे, दिर्घिकांच्या निर्मितीचा प्रवास बघणे शक्य होणार आहे, विश्व निर्मितीचे कोडे उलगडणे शक्य होणार आहे.

परग्रहावरील वातावरणाचा वेध

विविध तरंगलांबीच्या माध्यमातून अवकाशाचा वेध घेण्याची क्षमता या दुर्बिणीत आहे. यामुळे आपल्या सूर्यमालेबाहेर इतर ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या वातावरणात कोणती मुलद्रव्ये-घटक आहेत याची माहिती मिळवणे आता शक्य होणार आहे. आपल्या सूर्यमालेपासून एक हजार १२० प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूर्यासारख्या ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्य WASP-96b नावाच्या ग्रहाच्या वातवरणात पाणी आणि विविध प्रकारचे ढग असल्याचा शोध जेम्स बेवने लावला आहे. या क्षमतेमुळे सूर्यमालेबाहेर जे आत्तापर्यंत विविध पृथ्वी सदृश्य ग्रह शोधण्यात आले आहेत त्यांच्या वातवरणाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

अनपेक्षित शोधांची शक्यता जास्त

जेम्स वेब अवकाश दुर्बिणीमुळे अवकाश पुन्हा एकदा नव्याने न्याहाळण्याची, बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण याआधी विविध अवकाश दुर्बिणींच्या माध्यमातून अवकाशातील विविध भागांची छायाचित्रे काढण्यात आली असली तरी जेम्स वेबच्या अफाट क्षमतेमुळे नवे, अनपेक्षित शोध-माहिती हाती लागण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे अवकाशातील विविध तारे, कृष्णविवर, ढग, दिर्घिका यांबद्दलची आश्चर्यकारक माहिती हाती आल्यास आश्चर्य वाटायला नको. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाच छायाचित्रांनी याची झलकच दाखवून दिली आहे.

दुर्बिणीला धोका कायम रहाणार

दुर्बिणचे प्रक्षेपण डिसेंबर महिन्यात झाले, पृथ्वीपासून दूर नियोजित ठिकाणी पोहचल्यावर आणि जूनपर्यंत सर्व उपकरणांची चाचणी घेण्यात आली आणि छायाचित्रे काढण्याकरता जेम्स वेब सिद्ध करण्यात आली. असं असतांना दुर्बिणीच्या एका आरशाचे अत्यंत लहान आकाराच्या लघुग्रहाच्या धूलीकणामुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दुर्बिणीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नसला तरी दुर्बिणीचे नगण्य का होईना पण नुकसान झाल्याचं दिसून आळं आहे. ही माहिती येत असतांनाच लघुग्रहाचे आणखी अत्यंत छोटे चार धुलीकण हे दुर्बिणीच्या आरशावर आपटल्याचे आढळून आले होते. हबल दुर्बिणीप्रमाणे असे नुकसान दुरुस्त करणे जेम्स वेबमध्ये शक्य नाही. कारण १५ लाख किलोमीटर अतंरावर दुर्बिण दुरुस्त करणे हे अशक्य आहे. तेव्हा भविष्यात अवकाशात दुर्बिणीवर असे आघात होण्याची शक्यता जास्त असल्याने या दुर्बिणचे अस्तित्व हे नेहमीच धोक्याच्या अवस्थेत रहाणार आहे.

तेव्हा अनंत विश्वाचे नव्याने दर्शन घडवू पहाणारी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप निर्धारीत सहा महिन्यांच्या कार्यकाल पूर्ण करते का? हबलप्रमाणे दीर्घकाळ कार्यरत रहाते का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.