केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या भूस्खलनामध्ये रविवारपर्यंतच्या (४ ऑगस्ट) आकडेवारीनुसार २१९ जणांचा मृत्यू झाला; तर २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही आपत्ती घडल्यानंतर लष्कराच्या तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF), तटरक्षक दल, नौदल यांच्याकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.

दुर्घटनाग्रस्त भागात सातत्याने पडणारा पाऊस हे बचावकार्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. सततच्या पावसामुळे कर्मचाऱ्यांची, तसेच इतर आवश्यक साहित्याची ने-आण करणे प्रचंड अवघड होऊन बसले होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी भारतीय सैन्याच्या मद्रास इंजिनीयर ग्रुपने गुरुवारी (१ ऑगस्ट) युद्धस्तरावर तात्पुरत्या ‘बेली ब्रिज’ची निर्मिती केली. हा पूल चुरलमळा या ठिकाणी जोडण्यात आला. भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंडक्काई गावात पोहोचण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. बचावकार्यासाठी लागणारी जड-अवजड यंत्रे आणि अॅम्ब्युलन्ससारख्या इतर वैद्यकीय सोई दुर्घटनास्थळी तातडीने पोहोचवण्यासाठी हा १९० फुटांचा बेली ब्रिज फारच सोईचा ठरताना दिसत आहे. या बेली ब्रिजमध्ये २४ टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे; तसेच जोवर भरभक्कम असा कायमस्वरूपी पूल बांधला जात नाही, तोवर तो वापरला जाऊ शकतो, इतका तो कार्यक्षम आहे. ‘बेली ब्रिज’ हा प्रकार नेमका आहे तरी काय आणि तो इतक्या कमी कालावधीमध्ये तयार करूनही इतका कार्यक्षम कसा असतो, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ….

sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
what is bank locker
Bank Locker : बँकेची लॉकर सेवा कुणाला मिळते? काय असतात निकष? जाणून घ्या
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
woman forcing orphanage girls into prostitution
देहविक्रीस प्रवृत्त करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा; सेक्स रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ
Pimpri, Bomb Threats, Hospitals, VPN, IP Address, Nigdi Police, Email Threat,
पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव

हेही वाचा : दुर्मीळ काळा वाघ ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्येच का आढळतो?

बेली ब्रिज म्हणजे काय?

बेली ब्रिज म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर असा एखादा पूल की, ज्याचे भाग आधीपासूनच तयार असतात आणि आवश्यकता असताना ते जोडण्यात येतात. थोडक्यात कमीत कमी बांधकाम प्रक्रिया करून गरजेच्या वेळी अत्यंत कमी वेळेत उभा करता येईल, इतका कार्यक्षम असलेला हा ‘मॉड्युलर’ पूल असतो. ‘मॉड्युलर’ याचा अर्थ ज्याचे विभक्त भाग एकत्र जोडल्यानंतर साकार होते अशी गोष्ट होय. ‘बेली ब्रिज’ याच प्रकारात मोडतो. अमेरिकन सैन्याच्या इंजिनीयर स्कूलच्या मॅन्युअलमध्ये अशी नोंद आहे की, बेली ब्रिजचा उगम युद्धाच्या काळात झाला. ज्या स्थापत्य अभियंत्याने या पुलाची निर्मिती केली, त्याच्याच नावावरून या पुलाला हे नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या (१९३९-१९४५) काळात डोनाल्ड कोलमन बेली या स्थापत्य अभियंत्याने या प्रकारच्या नव्या पुलाची सर्वांत पहिल्यांदा निर्मिती केली. अमेरिकन सैन्याच्या इंजिनीयर स्कूलच्या मॅन्युअलमध्ये म्हटले आहे, “१९४१ साली बेली यांनी आपल्या या नव्या रचनेचा पहिला आराखडा ब्रिटिश वॉर ऑफिसकडे सादर केला होता. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात हाच बेली ब्रिज अनेक कामांसाठी उपयोगी ठरला. शत्रूपक्षाचा हल्ला सुरू असतानाही हा पूल सहजपणे हलवता यायचा आणि त्याची पुनर्बांधणी करता यायची. तसेच अवघ्या काही तासांतच तो मोडून, पुन्हा दुसऱ्या जागी उभादेखील करता यायचा. १९४३-४५ मध्ये इटली आणि वायव्य युरोपमधील मित्रराष्ट्रांच्या सैन्याने याचा मोठ्या प्रमाणावर आणि चांगला वापर केला. ब्रिटिश फील्ड मार्शल लॉर्ड बर्नार्ड लॉ माँटगोमेरी यांनी या बेली ब्रिजबाबत बोलताना एकदा म्हटले होते, “बेली ब्रिजशिवाय आम्ही हे युद्ध जिंकूच शकलो नसतो. आमच्याकडे असलेली ही सर्वोत्तम गोष्ट होती.”

बेली ब्रिज कशा प्रकारे काम करतो?

बेली ब्रिजमधील प्री-फॅब्रिकेटेड भागांमध्ये हलक्या स्टीलच्या पॅनेल्सचा समावेश होतो. हे पॅनेल्स मोठ्या स्क्रूसारख्या गोष्टींद्वारे जोडलेले असतात. याच गोष्टींमुळे पुलाच्या रेलिंगची उभारणी करण्यास मदत होते. कामगार दोन्ही बाजूंच्या रेलिंगच्या मध्यभागी बीम लावतात. या बीमच्या माध्यमातूनच पुलावरील जाण्या-येण्याचा मार्ग तयार होतो. पुलाचे हे सर्व भाग एकमेकांशी अत्यंत मजबुतीने बांधण्यात आलेले असल्याने एकूणच हा पूल भरभक्कम पद्धतीने उभा राहतो आणि त्याला स्थैर्य प्राप्त होते. त्यानंतरही आवश्यक असल्यास या पुलाचा विस्तार करता येतो. या पुलाचे भाग वजनाने हलके असल्यामुळे त्यांना हवे तिथे हलवताही येते. त्यासाठी कोणत्याही अवजड वा बोजड साधनांची गरज भासत नाही. फक्त युद्धकाळातच नव्हे, तर विशेषत: आपत्ती निवारणाच्या कामासाठीही या प्रकारची यंत्रणा अत्यंत आदर्श ठरते. या पुलाच्या भागांची वाहतूक छोट्या ट्रकच्या माध्यमातून करता येते.

हेही वाचा : रायगड जिल्ह्यातील वर्षा पर्यटन स्थळांवर बंदी का घातली गेली? इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरच्या अपघाती मृत्यूचा परिणाम?

भारत आणि बेली ब्रिज

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुस्तकामध्ये पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापनेचे (अभियंता) माजी संचालक एम. आर. जोशी यांनी लिहिलेय, “भारतीय सशस्त्र दलांनी आणि विशेषत: भारतीय सैन्याने ब्रिटिशांच्या बेली ब्रिजचा हा वारसा पुढे नेला.”

१९७१ साली पाकिस्तानबरोबर झालेले युद्ध असो वा बांगलादेश मुक्तिसंग्राम असो; या दोन्हीही युद्धकाळामध्ये अशा प्रकारच्या बेली ब्रिजचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. याआधीही अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २०२१ साली राज्यात अचानक आलेल्या पुरानंतर भारत-चीन सीमेवरील महत्त्वाच्या गावांमध्येही अशा प्रकारचे बेली पूल बांधण्यात आले होते.