उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) भारतीय हवाई दलाचे MI 17 V5 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे. शनिवारी ही जंगलातील आग विझवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बांबी बकेटचा वापर केला. या बादलीचा वापर केल्याने आग विझवण्यास कमी वेळ लागतो, कारण तिच्या मदतीने आग लागलेल्या ठिकाणीच पाणी टाकले जाते. हेलिकॉप्टरने नैनितालजवळील भीमताल सरोवरातील पाणी गोळा करून जळत्या जंगलांवर ओतण्यासाठी बांबी बकेटचा वापर केला जात आहे, ज्याला हेलिकॉप्टर बकेट किंवा हेलीबकेट असेही म्हणतात.

बांबी बकेट म्हणजे काय?

बांबी बकेट हे एक विशेष हवाई अग्निशमन साधन आहे, ज्याचा वापर १९८० पासून केला जात आहे. हे बांबी बकेट म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकाराची बादली असते. ज्याला हेलिकॉप्टरमधून मजबूत तारांच्या मदतीने लटकवले जाते. या बादलीच्या तळाशी एक व्हॉल्व्ह बसवण्यात आलेला असतो, जो हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकाद्वारे नियंत्रित केला जातो. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तो या बादलीतून पाणी सोडून आग विझवतो. या बादलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्याला हेलिकॉप्टर बादली असेही म्हणतात.

kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचाः डॉक्टरांना उपचार नाकारण्याचा अधिकार आहे का? कायदा काय सांगतो?

बांबी बकेटचे काय फायदे आहेत?

बांबी बकेट उडताना पाण्याने भरून ते हेलिकॉप्टरच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. जंगलात किंवा आगीच्या मोठ्या घटनांमध्ये बांबीची बादली वापरली जाते. तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे आग विझवण्याचा खर्च कमी होतो. ज्या ठिकाणी अग्निशमन दलाला टँकर पोहोचवण्यात अडचण येते, अशा ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते जलद आणि सहज भरले जाऊ शकते. बादली तलाव आणि जलतरण तलावांसह विविध स्त्रोतांमधून भरली जाऊ शकते, ज्यामुळे अग्निशामक दलांना ते त्वरित पुन्हा भरता येते आणि आग लागलेल्या ठिकाणी पोहोचून ते ओतता येते. बांबी बकेट २७० लिटर ते ९८४० लिटरपेक्षा जास्त क्षमतेसह विविध आकार आणि मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचाः इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?

बांबी बकेटचा शोध कसा लागला?

बांबी बकेटचा शोध डॉन आर्नी या कॅनेडियन व्यावसायिकाने १९८२ मध्ये लावला होता. त्यावेळी वापरात असलेल्या हवाई अग्निशामक पाण्याच्या बादल्या कार्यक्षम नव्हत्या आणि त्यांचे निकामी होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर आर्नीला कल्पना सुचली. पाण्याच्या बादल्या सामान्यत: सॉलिड फायबरग्लास, प्लास्टिक किंवा धातूच्या फ्रेम्स असलेल्या कॅनव्हासपासून तयार केलेल्या असल्याचं त्याला आढळलं. त्यावेळी तयार केलेल्या बादल्या हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यास कठीण होत्या. त्यामुळे त्यांना आग लागलेल्या ठिकाणी ट्रकमधून नेण्यात येत होते आणि जवळच्याच ठिकाणाहून हेलिकॉप्टरच्या मदतीने हूकवर लटकवून जंगलात पाणी ओतावे लागत होते, परंतु त्यांचा मारा मंद होता. तसेच नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेमच्या वेबसाइटनुसार, आणखी एक समस्या अशी होती की, या कंटेनरमधून सोडलेले पाणी स्प्रेमध्ये विखुरले जात असल्यामुळे त्याचा प्रभावही कमी होत होता.

त्यानंतर डॉन आर्नी यांनी बांबी बकेट तयार करण्यास सुरुवात केली. खरं तर बांबी बकेटचा कोणताही धोका नाही. बकेटमध्ये एकदा पाणी भरल्यानंतर ते हेलिकॉप्टरमध्ये साठवले जाऊ शकते. तसेच ते पाणी भरण्यासाठीही सोपे आहे. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरमधून जेव्हा आग लागलेल्या जंगलात पाण्याचा मारा केला जातो. तेव्हा ते प्रचंड वेगानं जमिनीवर पडते आणि लागलीच आग विझली जाते. पाणी जमिनीवर पडताना कमी बाष्पीभवन होत असल्याने त्याचा वेग आणि प्रभाव वाढतो आणि आग लवकर आटोक्यात येते. या प्रयोगाला यश मिळाल्यानंतर बांबी बकेटचा आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागला. आज बांबी बकेटचा वापर जगभरातील ११५ पेक्षा जास्त देशांमध्ये १००० पेक्षा जास्त हेलिकॉप्टर ऑपरेटरद्वारे केला जातो. २०१७ मध्ये बांबी बकेटच्या आविष्कारासाठी आर्नीचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. बांबी बकेटमध्ये पाण्याऐवजी इतर रसायने भरून आग विझवण्यासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो. या बादलीत सुमारे ३०० लिटर ते १० हजार लिटर पाणी भरले जाऊ शकते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. अरुंद गल्ल्या आणि बहुमजली इमारतींमध्ये आग विझवणे सोपे जाते.