डॉक्टरांना रुग्णांचा वैद्यकीय पूर्वेतिहास सहज उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने आभा कार्ड योजना सुरू केली. परंतु भविष्यात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आभा कार्ड महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एका बैठकीत याबाबत घेतलेल्या निर्णयावरून अधोरेखित झाले आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयंमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये नोंदणीसाठी आवश्यक करण्याचा निर्णय घेतला आहे.

आभा कार्डबाबत आयोगाचा निर्णय काय?

वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी, वार्षिक नूतनीकरण यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी रुग्णालयामधील रुग्णांची संख्या आणि उपचारासाठी उपलब्ध असणारी साधनसामग्री विचारात घेणे महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णांची प्रमाणित नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नुकत्याच झालेल्या १४ व्या बैठकीमध्ये देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आपत्कालिन विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या पूर्व नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आभा कार्ड नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, आभा कार्डशिवाय कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…

हेही वाचा >>>ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील ‘ड्रॉप इन’ खेळपट्ट्यांबाबत इतकी चर्चा का? भारत-पाकिस्तान सामन्याची रंगत वाढणार की घटणार?

आभा कार्ड म्हणजे काय?

हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. त्यामध्ये रुग्णाच्या आरोग्याची कुंडली असणार आहे. या कार्डमध्ये रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित सर्व तपशीलाची नोंद असणार आहे. या कार्डच्या साहाय्याने कधीही रुग्ण डॉक्टरकडे गेल्यास त्यांना त्याच्या आरोग्याचा पूर्वइतिहास एका क्लिकवर समजणार आहे. हे कार्ड आधार कार्डसारखेच असेल. यावर एक १४ आकडी क्रमांक असेल. याच क्रमांकाचा वापर करून रुग्णाचा सर्व वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना समजू शकेल. संबंधित व्यक्तीवर कोणत्या आजाराबाबत कधी व कोणत्या दवाखान्यात उपचार झाले, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या, कोणती औषधे देण्यात आली, रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत, तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे, ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे वैद्यकीय दस्ताऐवज, अहवाल, पावत्या, औषधांच्या चिठ्ठ्या गहाळ होण्याची भीती राहणार नाही. नागरिकांना त्यांचे अहवाल सहजपणे ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यास कशी मदत?

रुग्णालयातील रुग्ण संख्या व उपचारासाठी लागणारी साधनसामग्रीच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी देणे असे निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर आभा कार्डमध्ये रुग्णांच्या आजाराची नोंद होणार असल्याने ठरावीक कालावधी कोणत्या प्रदेशात, कोणत्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली याची माहिती मिळणे सोपे होणार आहे. तसेच आभा कार्डमुळे रुग्णांच्या आजारासंदर्भातील तपशीलवार माहिती संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना ही माहिती उपयोगी ठरेल. आजघडीला वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या व्यक्तीला स्वत: माहिती गोळा करावी लागतो. यामध्ये त्याचा बराचसा वेळ जातो. मात्र यामुळे ते अधिक सोपे होणार आहे.

हेही वाचा >>>शून्यातून उभे केले ‘जायंट किलर्स’… शरद पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही महायुतीवर बाजी कशी उलटवली?

आभा कार्ड पूर्णपणे गोपनीय असणार का?

प्रत्येक आभा हेल्थ कार्डवर १४ आकडी युनिक आयडी क्रमांक असेल आणि एक क्युआर कोडही असेल. याच्या मदतीने डॉक्टरांना नागरिकांचा वैद्यकीय इतिहास पाहता येणार आहे. आभा कार्ड बनवल्यानंतर नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांचा पूर्वइतिहास कोणाकडेही जाण्याची शक्यता नाही. आभा कार्डमधील माहिती गोपनीय राहावी यासाठी सरकारनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आभा कार्ड असलेल्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचा वैद्यकीय इतिहास कोणीही जाणून घेऊ शकणार नाही. कारण आभा कार्ड क्रमांक नोंदवल्यानंतर लागलीच त्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकांवर ओटीपी येतो. त्यामुळे संबंधित नागरिकांनी ओटीपी दिल्याशिवाय कोणीही त्यावरील माहिती पाहू शकणार नाही.

आयुष्यमान कार्ड व आभा कार्डमध्ये फरक काय?

आयुष्यमान कार्ड आरोग्य विम्याशी संबंधित कार्ड असून, हे कार्ड फक्त विशिष्ट वर्गांसाठी म्हणजे गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आहे. आयुष्यमान कार्ड हे उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्त आहे. तर आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाऊंट असून, देशातील कोणतीही व्यक्ती हे कार्ड बनवू शकतो. तसेच उपचारादरम्यान वैद्यकीय पूर्वेतिहास समजून घेण्यासाठी या कार्डचा वापर होतो.