मुंबईहून उड्डाण केलेल्या स्पाईस जेटच्या विमानाच्या आत दुर्गापूर विमानतळावर उतरताना खराब हवामानामुळे (टर्ब्युलन्स) अपघात झाला. दुर्घटनेत विमानातील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य प्रवासी व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. या घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) चौकशीही करण्यात येणार आहे. विमान विमानतळावर उतरताना निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या अपघाताची नेमकी कारण काय आहेत यासंदर्भातील सखोल चौकशीसाठी एका गटाची स्थापना डीजीसीएकडून करण्यात आलीय.

नेमकं घडलं काय?
ही घटना १ मे रोजी घडली. स्पाईस जेटचे ‘बोईंग बी ७३७’ विमानाने मुंबई विमानतळावरुन सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास दुर्गापूरसाठी उड्डाण केले. या विमानात १९५ प्रवासी होते. विमान उतरण्यापूर्वी वादळात सापडले. विमान उतरत असतानाच खराब हवामानामुळे त्याला बरेच धक्के बसत होते. त्यामुळे केबिनमध्ये ठेवलेले सामान प्रवाशांवर पडू लागले. यामुळे काही प्रवासी जखमी झाले. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार या विमानाने पाच वाजता उड्डाण केलं होतं. सायंकाळी हे विमान सातच्या सुमारास दुर्गापूरमधील काझी नाझरुल इस्लाम विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. मात्र दोन तासांच्या उड्डाणनंतर विमान उतरताना टर्ब्युलन्समुळे विमान जोराजोरात हलू लागले. अचानक विमानामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली काहींना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. यावेळी प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानातील कर्मचारीही प्रवाशांना मदत करीत होते. परंतु खराब हवामानामुळे विमानाला लागत असलेले धक्के, इतस्तत: पडणारे सामान आणि जखमी प्रवासी यामुळे गोंधळाचे वातावरण होते. प्रवासी मदतीसाठी याचना करीत होते. काही वेळानंतर हे विमान तातडीने विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यात आल्याचे स्पाईस जेटकडून सांगण्यात आले.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?

प्रवाशांची परिस्थिती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या डोक्याला, पाठ, खांद्याला तसेच चेहऱ्याला इजा झाली आहे. काही प्रवाशांवर उपचार सुरू असून यापैकी दोन प्रवाशांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. एकाच्या डोक्याला, तर दोन प्रवाशांच्या पाठिच्या कण्याला मार बसला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या विमानाची पाहणी केली. यात विमानातील आसनेही तुटलेली होती, तर प्राणवायूचे मास्क व अन्य सामानही अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले.

टर्ब्युलन्स म्हणजे काय?
एकूण सात प्रकारचे टर्ब्युलन्स असतात. यामध्ये हवामानाशीसंबंधित टर्ब्युलन्सचा समावेश आहे. मोठ्या आकाराचे ढग किंवा वादळी परिस्थीती असणाऱ्या भागातून विमान जात असेल तर असे टर्ब्युलन्स जाणवतात. दुसरा प्रकार म्हणजे हवेमुळे होणारे म्हणजेच क्लिअर एअर टर्ब्युलन्स. यामध्ये वाऱ्यामुळे किंवा जेट स्ट्रीम्समुळे विमान हलू लागतं. टर्ब्युलन्स शब्दाचा नेमका अर्थ सांगायचा झाला तर विमानाच्या पंखांवरील हवेचा समतोल बिघडल्याने विमानाच्या आतमध्ये जाणवणारे धक्के. हवेचा समतोल बिघडल्याने विमानाच्या व्हर्टीकल मोशनवर परिणाम होतो आणि विमान स्थिरता गमावते. त्यामुळेच टर्ब्युलन्समध्ये विमान जोरजोरात हलते. टर्ब्युलन्सचे इतर प्रकार म्हणजे वेक टर्ब्युलन्स. म्हणजे विमान हवेतून उडते तेव्हा विमानाच्या मागे विंगटिपजवळ म्हणजेच पंखाजवळ हवेचे भोवरे तयार होतात आणि त्यामुळे विमानाचे संतूलन बिघडते.

टर्ब्युलन्स धोकादायक असतात का?
टर्ब्युलन्स कोणत्या प्रकारचा आहे त्यावर ते किती धोकादायक असतात हे सांगता येतं. सामान्यपणे विमान हवेतून प्रवास करताना ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या टर्ब्युलन्समधून जात असते. मात्र अशा अडथळ्यांना तोंड देण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात आलेलं असतं. मात्र अनेक प्रकरणांमध्ये अशाप्रकारच्या टर्ब्युलन्समुळे विमान अपघाताच्या घटना घडल्यात. अनेकदा असे टर्ब्युलन्स हे विमान अपघाताला कारणीभूत ठरतात. अर्थात टर्ब्युलन्ससोबत इतर घटकांमुळेही अपघात होतात. मात्र टर्ब्युलन्स सारख्या प्रकारामुळे विमानावर नियंत्रण मिळवताना अडचणी येतात. योग्य प्रशिक्षण नसणे, हवामान आणि माहितीची योग्यपद्दतीने उपलब्धता हव्या त्या वेळी न होणे हे सुद्धा टर्ब्युलन्स संभाळता न येण्यामागील कारणे असतात. या साऱ्या गोष्टींमुळेच अपघात होतात.

स्पाइस जेट प्रकरणामध्ये तपासात कशावर लक्ष्य केंद्रित केलं जाईल?
नियमांनुसार विमानामध्ये घडलेल्या प्रकारात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी कसे झाले याचा सर्वात आधी शोध घेतला जाईल. हा प्रकार हवामानाच्या स्थितीमुळे झाला की वैमानिकांना पुरेसं प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. त्यांना टर्ब्युलन्स कसा हाताळावा हे ठाऊक नव्हतं का? त्यांनी क्रू मेंबर्सला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील तसेच या अपेक्षित टर्ब्युलन्ससंदर्भातील काही निर्देश दिले होते का याचा तपास केला जाणार आहे. नागरी उड्डायण मंत्रालयाने २०१९ मध्ये हवाई वाहतूक प्रवाशांना दिलेल्या हक्कांनुसार विमान प्रवासादरम्यान अपघाती निधन किंवा गंभीर जखम झाल्यास विमान कंपनीला प्रवाशाला २० लाख रुपयांची मदत करणं बंधनकारक आहे. प्रत्येक प्रवाशाला किंवा अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला कंपनीकडून २० लाखांची नुकसान भरपाई देणे नियमांनुसार बंधकनकारक करण्यात आलंय.

विमानातून प्रवास करताना टर्ब्युलन्स जाणवू लागला तर प्रवाशांनी काय करणं अपेक्षित असतं?
अमेरिकेतील फेड्रल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफएएच्या निर्देशांनुसार, “अनपेक्षित टर्ब्युलन्सदरम्यान प्रवाशांनी जखमी होण्यापासून वाचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सीटबेल्ट कायम बांधलेला ठेवावा.” एफएएच्या निर्देशांनुसार टर्ब्युलन्सच्या परिस्थितीमध्ये प्रवाशांनी फ्लाइट अटेंडण्ट्सच्या निर्देशांचे पालन करुन सुरक्षित राहण्यासंदर्भातील सर्व सूचना ऐकाव्यात आणि त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. दोन वर्षांपेक्षा कमी वयाचं मुल प्रवास करत असल्यास चाइल्ड सेफ्टी सीट आणि त्यावरील यंत्रणांचा वापर करणं अपेक्षित आहे.

टर्ब्युलन्स टाळता येतो का?
एफएएच्या सल्ल्यानुसार विमान कंपन्यांनी त्यांची संपर्क यंत्रणा कायम उपलब्ध राहील अशापद्दतीने नियोजन करणं अपेक्षित आहे. अगदी हवामानामुळे निर्माण झालेल्या टर्ब्युलन्सदरम्यानही संपर्क यंत्रणा सुरळीत रहील आणि वैमानिक व जमीनीवरुन माहिती देणारे म्हणजेच डिस्पॅचर संपर्कात राहतील याची काळजी घेणे आवश्यक असतं. यासाठी या डिस्पॅचर्सला योग्य प्रशिक्षण देणं, ऑटोमेशनचा वापर करुन विमानातील परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेणं, डेटा डिस्प्ले योग्य राहील याबद्दलची यंत्रणा विमानात असणं. विमानामध्ये हवामानासंदर्भातील माहिती देणारी यंत्रणा असणं, अपेक्षित आहेत. तसेच टर्ब्युलन्सदरम्यान कोणी जखमी झालं तर काय करावं याचप्रमाणे स्वत:ची आणि प्रवाशांची सुरक्षा राहील यासाठी आप्तकालीन परिस्थितीत काय करावं हे सुद्धा विमान कंपनीने निश्चित केलं पाहिजे. तसेच विमानाची स्थिती कशी आहे, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि मुख्यपणे ते टर्ब्युलन्समध्ये कसं काम करतं याची माहिती कंपनीकडे असणं आवश्यक आहे. या माध्यमातून टर्ब्युलन्स टाळण्याचा किंवा त्याचा कमी परिणाम होईल असा प्रयत्न कंपन्यांना करता येईल, असं एफएए सांगतं.

Story img Loader