उलटी हा शब्द जरी किळसवाणा वाटत असला तरी व्हेल माशाची उलटी कोटींमध्ये विकली जाते. होय, हे खरे आहे. व्हेल माशाच्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. व्हेल माशाच्या उलटीला सोने, हिर्‍यांपेक्षाही अधिकचा भाव आहे. नुकतीच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवलीजवळील काटई – बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील तीन जणांकडून व्हेल माशाची उलटी जप्त केली. या उलटीची बाजारातील किंमत सहा कोटी २२ लाख रुपये आहे. व्हेल माशाच्या उलटीला इतकी किंमत कशी? व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यवधींना विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो? त्याविषयी जाणून घेऊ.

व्हेल माशाच्या उलटीला ‘एम्बरग्रीस’ म्हणून ओळखले जाते. एम्बरग्रीस विशेषतः राखाडी रंगाची असते. ‘फ्लोटिंग गोल्ड : अ नॅचरल अॅण्ड हिस्ट्री ऑफ एम्बरग्रीस’चे लेखक ख्रिस्तोफर केम्प म्हणतात की, स्पर्म व्हेल दिवसाला अनेक गोष्टी खातो. जेव्हा या गोष्टी व्हेल पचवू शकत नाही, तेव्हा तो ते उलटीच्या स्वरूपात बाहेर काढतो. हा व्हेलच्या शरीरातील कचरा असतो. त्यालाच एम्बरग्रीस, असे म्हणतात. एम्बरग्रीस हा राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ असतो. हा पदार्थ एक प्रकारे मेणापासून तयार झालेल्या दगडासारखा असतो. हा पदार्थ पाण्याच्या पृष्ठभागाभोवती तरंगतो आणि काही वेळा किनाऱ्यावरही दिसून येतो. १७८३ मध्ये जर्मन वैद्य फ्रांझ श्वेडियावर यांनी याला ‘व्हेल माशाचे शेण’ म्हटले होते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
व्हेल माशाच्या उलटीला ‘एम्बरग्रीस’ म्हणून ओळखले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

हेही वाचा : महिलेने जुळ्या मुलांना दिला दोन गर्भाशयांतून जन्म; जगभरात या दुर्मीळ प्रकरणाची चर्चा का होतेय?

व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात?

पचन न झाल्यामुळे व्हेल मासा गिळलेले प्राण्याचे अवयव, दात, टोकदार शरीर उलटीच्या माध्यमातून बाहेर काढतो. ही उलटी बाहेर पडताच त्याचा एक मेणासारखा दगड तयार होतो, जो पाण्यावर तरंगतो. व्हेल माशाच्या उलटीमध्ये कठोर कवचासारखा भाग, काटे आढळून येतात. उलटीच्या मेणासारख्या असलेल्या या गोळ्यात गरम केलेली वस्तू (सुई, चाकू) टाकल्यास, तो गोळा वितळतो आणि त्यातून धूर निघतो. व्हेल माशाच्या उलटीत काही विशिष्ट घटक आढळतात; परंतु ही उलटी खरंच उपयुक्त आहे की नाही, हे विशिष्ट प्रयोगशाळांमध्ये तपासणी केल्यानंतरच ठरते. व्हेल माशाच्या उलटीला तरंगते सोने, असेही संबोधले जाते. व्हेल माशाच्या एक किलो उलटीची किंमत जागतिक बाजारात एक कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे.

पचन न झाल्यामुळे व्हेल मासा गिळलेले प्राण्याचे अवयव, डात, टोकदार शरीर उलटीच्या माध्यमातून बाहेर काढतात. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

व्हेल माशाच्या उलटीचा वापर कशासाठी जातो?

या उलटीचा परफ्युम मार्केटमध्ये होणारा वापर; विशेषत: कस्तुरीसारखे सुगंध तयार करण्यासाठी होत असलेला वापर हे या उलटीची इतकी उच्च किंमत असण्याचे कारण आहे. परफ्युम तयार करण्यासाठी या उलटीचा वापर केला जातो. त्यामुळेच याला परफ्युमची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईसारख्या देशांमध्ये जास्त मागणी असल्याचे सांगितले जाते. हवेच्या संपर्कात आल्यानंतर यातून विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो, असे तज्ज्ञ सांगतात. व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग परफ्युमला सुगंधित आणि दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. इजिप्शियन लोक सुगंधित धूप म्हणूनदेखील या उलटीचा वापर करायचे, असे सांगितले जाते. तसेच शारीरिक व्याधी दूर करण्याच्या उपचारांमध्ये आणि लैंगिक क्षमता वाढविणार्‍या औषधांसह इतरही महागड्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो. त्याशिवाय दारू आणि सिगारेट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर करतात. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीसाठी व्यावसायिक कितीही पैसे देण्यास तयार असतात.

हेही वाचा : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस; हा आजार कसा होतो? याची लक्षणे अन् उपाय काय?

उलटीची तस्करी का केली जाते?

त्याच्या उच्च मूल्यामुळे विशेषतः किनारपट्टीच्या भागात व्हेल माशाच्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. अशा तस्करीसाठी गुजरातच्या किनारपट्टीचा वापर केला गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ‘स्पर्म व्हेल’ ही संरक्षित प्रजाती असल्याने, व्हेलची शिकार करण्यास परवानगी नाही. परंतु, तस्करांनी व्हेल माशांच्या पोटातून मौल्यवान एम्बरग्रीस मिळविण्यासाठी या माशांना बेकायदा लक्ष्य केल्याचीही माहिती आहे.