आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कार्यकारी मंडळाने गेल्या आठवड्यात श्रीलंकेसाठी सुमारे ३ अब्ज डॉलरच्या बेलआऊट पॅकेजला मंजूर दिली, ज्यापैकी सुमारे ३३३ दशलक्ष डॉलर देशाच्या मानवतावादी संकटाला दूर करण्यासाठी त्वरित वितरित केले जाणार होते. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासंदर्भात भाष्य केले. IMF ने त्यांच्या देशाला बेलआऊट निधी जारी करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत मित्र देशांनी वचनबद्धतेची पूर्तता करावी, अशी त्यांची इच्छा आहे. कर्जात बुडालेला पाकिस्तान देश १.१ अब्ज डॉलर निधी पुन्हा पूर्ववत व्हावा यासाठी चालू वर्षाच्या फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करीत आहे. हा निधी पाकिस्तानला मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात मिळणार होता. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. पाकिस्तान मागणी करत असलेला निधी २०१९ मध्ये मान्य झालेल्या ६.५ अब्ज डॉलर बेलआउटचा भाग आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा