Gujarat Loksabha Election 20224: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना गुजरातमधून एक खासदार विनामतदान निवडून थेट संसदेत पोहोचला आहे. भारतातील लोकसभेची ही १८ वी निवडणूक सध्या पार पडते आहे. भाजपा सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार की विरोधक त्यांना सत्तेतून पायउतार करण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण सात टप्प्यांतील या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार, याचा निकाल यायला अद्याप वेळ आहे. पण, एक मतदारसंघ याला अपवाद ठरला आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल सर्वांत आधी जाहीर झाला आहे. तिथे निवडणूक आयोगाने सोमवारी (२२ एप्रिल) भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल निवडून आल्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघातील इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा