प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा व पुनर्नियोजनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाची आवश्यकता का आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्यांना खरोखरच या प्रकल्पामुळे फायदा होणार का, याबाबतचे विश्लेषण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धिविनायक मंदिराला इतके महत्त्व का आहे?

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची मोठी गर्दी तेथे असते. पायी चालत मंदिरापर्यंत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

हेही वाचा : विश्लेषण : जगात ड्रोनचे महत्त्व वाढण्याचे कारण काय? इराणी ड्रोन किती विध्वंसक?

सुशोभीकरणाची व पुनर्नियोजनाची आवश्यकता का?

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे मंदिरावर हल्ल्याच्या धमक्या सतत येत असतात. अनेकदा मंदिराला धोका असल्याची चर्चा होत असते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र दिवसेंदिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागाने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असून त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची यातून निवड केली जाणार आहे.

कोणत्या सुविधा देणार ?

दादर आणि प्रभादेवी स्थानकांच्या साधारण मध्यावर असलेले सिद्धिविनायक मंदिर पालिकेच्या जी उत्तर आणि जी दक्षिण विभागांच्या हद्दीवर आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातून या मंदिराकडे येणारे भाविक दादर स्थानकात येतात. त्यामुळे दादरसारख्या गजबजलेल्या स्थानकाकडून प्रभादेवीकडे येण्यासाठी मिनी बसगाड्यांची सुविधा वाढवण्यात येणार आहे. तसेच स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या भाविकांना वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे वाहनतळाचीही सुविधा देण्यात येणार आहे. मंदिराजवळ नवीन मेट्रो स्थानक सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोने येणाऱ्या भाविकांना थेट मंदिरात पोहोचता यावे यासाठी सुविधा निर्माण करणे ही आताची गरज आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; लवकरचं सुरु करणार लसीकरण मोहीम, वाचा सविस्तर…

सुविधांबाबतचा निर्णय कसा घेणार?

प्रकल्प व्यवस्थापक सल्लागारांनी दिलेल्या विस्तृत अहवालावर निर्णय घेण्यासाठी पालिकेच्या परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. त्यात जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त, पालिकेचे वास्तुविशारद, पालिकेच्या विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता, नगर उप अभियंता या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती प्रकल्प आराखड्याबाबत निर्णय घेणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

प्रकल्पात कोणत्या घटकांचा समावेश?

मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करणे, मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार तयार करणे, भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह, दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांची तात्पुरती बसण्याची व्यवस्था, छत तयार करणे, मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करणे, भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करणे अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is beautification plan of siddhivinayak temple and its benefits for the devotees print exp css