बायोबिटुमेन कशापासून तयार केले जाते?

केंद्र सरकारने रस्ते बांधणीसाठी पेट्रोलियम-आधारित बिटुमेनमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत लिग्निन मिसळण्यास परवानगी दिली आहे. बिटुमेन हा कच्च्या तेलाच्या ऊर्ध्वपतनातून तयार होणारा काळा पदार्थ (डांबरासारखाच पण निराळा) आहे. त्याचा वापर रस्ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बायोबिटुमेन हे जैव-आधारित बंधक (बाइंडर) आहे. भाजीपाला, झाडाचे खोड, शेवाळ, लिग्निन (लाकडाचा एक घटक) किंवा प्राण्यांची विष्ठा यांसारख्या अक्षय स्राोतांपासून ते बनवण्यात येते. पेट्रोलियम बिटुमेनला स्थानिक पर्याय म्हणून बायोबिटुमेन विकसित करण्यात आले आहे. याचा वापर रस्ते बांधण्यासाठी केल्यास प्रदूषण कमी होणार आहे. नागपूरनजीक मनसरजवळील नवा रस्ता बनवण्यासाठी लिग्निन तंत्रज्ञानाचा उपयोग झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बायोबिटुमेन रस्त्याचे फायदे काय?

सध्या महामार्गावरील फक्त एक किलोमीटरचा भाग (स्ट्रेच) या तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कमी खर्चात, तरीही नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा ४० टक्के अधिक मजबूत रस्ते तयार करता येतील. देशाला सध्या रस्ते बांधणीसाठी ४० लाख टन डांबर लागते. त्यातील ४५ हजार टन डांबर रिफायनरीमधून येते किंवा आयात करावे लागते त्यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होतो. बायोबिटुमेनचा उपयोग केल्यास रस्ते निर्मितीचा खर्च कमी होईल, असा दावा केला जातो. तसेच इंधनेदेखील आता पेट्रोलऐवजी सीएनजीवर आणण्यात येत आहेत.

हेही वाचा : Indus Valley Civilization: मासे, धान्य, डाळी, फळे, भाज्या; सिंधू संस्कृतीचा आहार नेमका कसा होता?

शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

नागपूर जिल्ह्यातील मनसरहून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील एक किलोमीटरचा रस्ता बायोबिटुमेनद्वारे तयार करण्यात आला आहे. या भागात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होते. धान काढल्यानंतर जमिनीत उरणारे तणस, पराळी (राइस स्ट्रॉ) जाळण्याऐवजी त्यापासून अन्य पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान देशात तयार झाले आहे. तुमसर देव्हाडाच्या साखर कारखान्यात सीएनजी उत्पादन सुरू होत आहे. आता वाहने सीएनजीवर गेल्यास इंधनाचा मासिक खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होईल. भविष्यात सीएनजीचा वाढणारा उपयोग लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो, असा दावाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

तज्ज्ञांची मते काय आहेत?

पोर्तुगालमधील मिन्हो विद्यापीठातील ‘सेंटर फॉर टेरिटरी, एन्व्हायर्नमेंट अँड कन्स्ट्रक्शन‘चे ह्यूगो सिल्वा हे बायोबिटुमेनवर संशोधन करत आहेत, त्यांच्या मते पारंपरिक बिटुमेनप्रमाणेच, जैव-आधारित आणि प्लास्टिक पॉलिमर- बायोबिटुमेन सुधारण्यासाठी मिश्रणात जोडले जाऊ शकतात. पॉलिमर कार्यक्षमतेत सुधारणा करू शकतात. बायोबिटुमेनमध्ये सध्याच्या डांबरापेक्षा अधिक पर्यावरणास अनुकूल असण्याची क्षमता आहे. बिटुमेन रस्त्यांचे अनेक फायदे आहेत. बिटुमेनचे वॉटरप्रूफिंग आणि बंधक गुणधर्म रस्ते दीर्घकाळ टिकणारे बनवतात. बिटुमेन रस्त्यांचे पृष्ठभाग तुलनेने अधिक गुळगुळीत असतात. बिटुमेन रस्ते पाणी आणि अत्यंत हवामानास प्रतिरोधक असतात, तसेच ते काँक्रीट रस्त्यांपेक्षा कमी खर्चात लवकर बांधले किंवा दुरुस्त केले जाऊ शकतात.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाखमधल्या पुतळ्यावरून वाद; नेमकं प्रकरण काय?

प्लास्टिकचा वापरही रस्तेबांधणीत होतो ना?

‘सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’मधील तज्ज्ञ सांगतात की, शहरातून निघणारा कचरा, टाकाऊ प्लास्टिकचाही वापर रस्ते बांधणीत केला जातो. शहरातून निघालेला कचरा एका ठिकाणी गोळा केल्यावर त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यातून जैव अपघटन (बायोडिग्रेडेशन) होणारे व न होणारे प्लास्टिक वेगळे केले जाते. यंत्राद्वारे त्याचे तुकडे केले जातात. ते तुकडे खडी/गिट्टीत मिसळून १५० डिग्री सेल्सियस तापमानावर ठेवले जाते. या प्रक्रियेमुळे गिट्टीला प्लास्टिकचे आवरण चढते. त्यात बिटुमेन टाकून रस्त्यावर अंथरले जाते. या मिश्रणामुळे रस्त्याची वाढते तापमान, पाऊस आणि अधिक भारवहनाचा परिणाम या रस्त्यावर होत नाही.
chandrashekhar.bobde@expressindia.com