पश्चिम बंगालमध्ये करोनानंतर आता काळा नावाच्या रोगाने थैमान घातले आहे. बंगालमधील जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये काळा तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत ६५ लोकांना या रोगाची लागण झाली आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये अधिक काळ राहिलेल्या लोकांना काळा तापाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे करोना आणि दुसरीकडे काळा तापाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

कालाजार किंवा काळ्या तापाचा आजार म्हणजे काय?
कालाजार किंवा व्हिसेरल लीशमॅनियासिस हा एक परजीवी रोग आहे, जो (सैंडफ्लाइज़) समुद्रकिनारी आढळणारा एक कीटक चावल्यामुळे हा रोग पसरतो. या किटकाचा रंग तपकिरी असून त्यांच्या शरीरावर केस असतात. या किटकांना लीशमॅनिया डोनोव्हानी’ नावाच्या परजीवीची लागण झालेली असते. हे किटक मुख्य: चिखलमय प्रदेशात खडड्यांमध्ये किंवा दमट भागामध्ये आढळून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लेशमॅनियासिस रोगाचे ३ प्रकार आहेत ज्यात कालाजार हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे. कुपोषीत किंवा रोग प्रतिकारक शक्ति कमी असेल्या व्यक्ती या रोगाला लवकर बळी पडतात. डबल्युएचओच्या म्हणण्यानुसार लेशमॅनियासिस हा पर्यावरणीय बदल म्हणजे जंगलतोड आणि शहरीकरणाशी देखील जोडलेला आहे. २०२० साली ब्राझील, चीन, इथिओपिया, इरिट्रिया, भारत, केनिया, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान आणि येमेन या दहा देशांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक या रोगाशी संबंधित प्रकरणे आढळून आली आहेत.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?

हेही वाचा- विश्लेषण : शहराच्या नामांतराला केंद्राची मान्यता आवश्यक का असते?

भारतात कालाजार कुठे आढळून आला आहे?
पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि कलिमपोंग या जिल्ह्यांमध्ये या रोगाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर बीरभूम, बांकुरा, पुरुलिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्येही कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत, कोलकात्यात या रोगाचा अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये बराच वेळ घालवलेल्या लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून आला. बांगलादेशातील काही व्यक्तींमध्येही कालाजारची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराचे निदान झालेल्या सर्व लोकांवर सरकार विनामूल्य उपचार करेल, असा दावा राज्य सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हा रोग स्थानिक आहे. नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NCVBDC) च्या आकडेवारीनुसार अंदाजे १६५.४ दशलक्ष लोकांना या रोगाचा धोका आहे. देशात गेल्या काही वर्षांत या रोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. २०१४ मध्ये, सुमारे ९.२०० प्रकरणे नोंदवली गेली होती, तर २०२१ मध्ये ही संख्या १,२७६ इतकी कमी झाली होती.

हेही वाचा- विश्लेषण : रुबिया यांच्या अपहरणामागे कोणाचा हात होता? जवळपास तीस वर्षांपूर्वीचे हे प्रकरण काय आहे?

कालाजारची लक्षणे कोणती?
या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये बरेच दिवस ताप येणे, वजन कमी होणे, यकृतामध्य वाढ होणे वाढणे, अशक्तपणासारखी लक्षणे आढळून येतात. तसेच त्वचा कोरडी पडून पातळ आणि खवलेयुक्त होऊ शकते, केस गळतात . हलक्या रंगाची त्वचा असलेल्या लोकांच्या हात, पाय, पोट आणि चेहऱ्याच्या त्वचेचा रंग राखाडी दिसू शकतो, म्हणूनच NCVBDC नुसार या आजाराला “ब्लॅक फिव्हर” असेही म्हणतात. निदान झालेल्या सर्व रुग्णांना त्वरित आणि पूर्ण उपचार आवश्यक आहेत.

या रोगाची लागण झालेल्या रुग्णांना कोणते उपचार दिले जातात.
या रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर अँटी-लेशमॅनियल औषधे उपलब्ध आहेत. डबल्युएचओद्वारे वेक्टर नियंत्रणाची देखील शिफारस केली जाते, म्हणजेच कीटकनाशक फवारणी द्वारे आजूबाजूच्या किटकांचा नायनाट करुन रोगाचा प्रसारही कमी करता येतो.

Story img Loader