Black Moon वर्षभरात आकाशात फूल मून, पिंक मून, सुपर मून, ब्लड मून पाहायला मिळाला. आता वर्षाच्या अखेरीस आकाशात चक्क ‘ब्लॅक मून’ पाहायला मिळणार आहे. ब्लॅक मून ही अतिशय दुर्मीळ घटना मानली जाते. ही एक अशी घटना आहे, जी खगोलशास्त्रात अधिकृतपणे ओळखली जात नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत हौशी खगोलशास्त्रज्ञ आणि स्टारगेझर्समध्ये ब्लॅक मूनने लोकप्रियता मिळवली आहे. यूएस नेव्हल ऑब्झर्व्हेटरीनुसार, ही अनोखी घटना ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.२७ वाजता घडेल. अमेरिकेतील लोकांना काळा चंद्र ३० डिसेंबर रोजीच दिसेल; तर युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांतील लोकांना याचे ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शन होईल. भारतात ही दुर्मीळ घटना ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३.५७ च्या सुमारास ‘ब्लॅक मून’ दिसू शकेल.

दुर्मीळ घटना काय?

ब्लॅक मून ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आहे, जी एकाच महिन्यात दोन अमावास्या असताना घडते. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते. अमावास्या हा चंद्राचा तो टप्पा असतो जेव्हा चंद्र पृथ्वीवर दिसत नाही. कारण- तो सूर्य आणि पृथ्वी यांच्याशी संरेखित असतो. ‘ब्लॅक मून’ हा ‘ब्ल्यू मून’च्या विरुद्ध असतो. कारण- ‘ब्ल्यू मून’ची घटना एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असताना घडते. काळा चंद्र उद्भवतो. कारण- चंद्राचे चक्र पाहता, चंद्राला त्याच्या सर्व टप्प्यांतून जाण्यासाठी लागणारा वेळ कॅलेंडर महिन्यापेक्षा थोडा लहान असतो. चंद्राचे चक्र सुमारे २९.५ दिवसांचे म्हणजे ते बहुतेक महिन्यांत ३० किंवा ३१ दिवस असते. वैकल्पिकरीत्या फेब्रुवारीमध्ये अमावास्या नसताना काळा चंद्र येऊ शकतो. कारण- तो सर्वांत लहान महिना आहे. हे केवळ लीप वर्षात घडू शकते, जेव्हा फेब्रुवारीमध्ये २९ दिवस असतात. याअगोदर ही घटना २०२० मध्ये घडली होती आणि त्यानंतर आता २०२४ मध्ये घडत आहे.

ब्लॅक मून ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आहे, जी एकाच महिन्यात दोन अमावास्या असताना घडते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : २०२५ मध्ये मोठ्या धोक्याची चिंता? बर्ड फ्लू म्यूटेशनने जगभरात संकटाची स्थिती? वैज्ञानिकांनी वर्तवली भीती

‘ब्लॅक मून’चा पृथ्वीवर काय परिणाम होतो?

खगोलशास्त्राच्या दृष्टीने काळ्या चंद्राचे विशेष काही महत्त्व नाही; परंतु त्याचे काही पर्यावरणीय प्रभाव असू शकतात, जसे की भरती-ओहोटी, प्राण्यांचे वर्तन आणि वनस्पतींच्या वाढ यांवर त्याचा परिणाम होतो. ‘ब्लॅक मून’ कमी भरतीस कारणीभूत ठरू शकतो. कारण- सूर्य आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण संरेखित होते. याचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होऊ शकतो आणि किनारपट्टीची धूप होऊ शकते. या चंद्राचा परिणाम घुबड, वटवाघूळ व कीटक यांसारख्या निशाचर प्राण्यांवरही होऊ शकतो, जे नेव्हिगेशन आणि शिकारीसाठी चंद्रप्रकाशावर अवलंबून असतात. ‘ब्लॅक मून’चा वनस्पतींवरही परिणाम होऊ शकतो. कारण- वनस्पतींचे उगवणे आणि फुलणे चंद्राच्या टप्प्यांवर अवलंबून असते. त्यांचे वाढीचे चक्र विलंबित किंवा वेगवान होऊ शकते, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण बदलू शकते.

‘ब्लॅक मून’चे महत्त्व काय?

‘ब्लॅक मून’चे काही लोकांसाठी सांस्कृतिक किंवा धार्मिक अर्थ असू शकतात. काहींचा असा विश्वास आहे की, ब्लॅक मून हे जगाच्या समाप्तीचे लक्षण आहे किंवा मोठे बदल आणि परिवर्तनाचा काळ आहे. ते त्याला बायबल, कुराण किंवा माया कॅलेंडरच्या भविष्यवाण्यांशी जोडतात. काही लोक ‘ब्लॅक मून’ चांगल्या विधी, जादू आणि जादूटोण्यासाठी उपयुक्त मानतात. कारण- त्यांच्या मते- ‘ब्लॅक मून’चा कालावधी विधी आणि जादूसाठी एक शक्तिशाली मानला जातो. त्यांचा असा विश्वास आहे की, या काळाचा वापर चांगल्या किंवा वाईट हेतूंसाठी केला जाऊ शकतो. ‘ब्लॅक मून’ला नूतनीकरण आणि पुनर्जन्माचा काळ म्हणूनही ओळखले जाते. कारण- या काळात चंद्राच्या नवीन चक्राला सुरुवात होते.

खगोलशास्त्राच्या दृष्टीने काळ्या चंद्राचे विशेष काही महत्त्व नाही. (छायाचित्र-रॉयटर्स)

ब्लॅक मूनची इतर चंद्राच्या घटनांशी तुलना

ब्लॅक मून हा ‘ब्लड मून’ सारखा नाही. ब्लड मून संपूर्ण चंद्रग्रहणाचे दुसरे नाव आहे. ब्लड मूनच्या घटनेत चंद्र पृथ्वीच्या सावलीमुळे लाल होतो. ब्लॅक मून आणि ब्लड मून या दोन्ही दुर्मीळ घटना आहेत; परंतु त्यांची कारणे आणि परिणाम वेगवेगळे आहेत. जेव्हा पृथ्वी, सूर्य b चंद्र एका सरळ रेषेत असतात आणि पृथ्वी सूर्यप्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते तेव्हा ‘ब्लड मून’ दिसून येतो. ब्लड मूनची घटना पृथ्वीवरून कुठूनही दिसू शकते आणि तो काही तास टिकू शकतो. त्याचे काही पर्यावरणीय आणि सांस्कृतिक प्रभावदेखील असू शकतात; जसे की भरती-ओहोटी, प्राण्यांचे वर्तन आणि धार्मिक विश्वासार्हतेवर परिणाम करणे. ब्लॅक मून सुपर मूनसारखादेखील नसतो. सुपर मून पौर्णिमा किंवा चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो तेव्हा तो नेहमीपेक्षा मोठा आणि उजळ दिसतो. ब्लॅक मून आणि सुपर मून हे दोन्ही चंद्राच्या कक्षेशी संबंधित आहेत; परंतु त्यांचे स्वरूप विरुद्ध आहे. पृथ्वीवर कुठूनही सुपर मून दिसू शकतो आणि तो काही दिवस टिकू शकतो.

हेही वाचा : तुम्हीही इंजेक्शनला घाबरता? आता सुईशिवाय मिळणार इंजेक्शन; काय आहे वेदनारहित शॉक सिरिंज?

ब्लॅक मून कुठे आणि कधी दिसणार?

यूएस नेव्हल ऑब्झर्व्हेटरीनुसार, डिसेंबरचा चंद्र ३० डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.२७ वाजता दिसेल. भारतात ब्लॅक मून ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३.५७ वाजता दिसणार आहे.

अमेरिका : ३० डिसेंबरला ब्लॅक मून दिसणार

युरोप, आफ्रिका व आशिया : ३१ डिसेंबरला दिसेल. या घटनेनंतर पुढील ब्लॅक मून ऑगस्ट २०२५ पर्यंत दिसणार नाही.

Story img Loader