सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ असलेल्या ‘एक्स’ला (पूर्वीचे ट्विटर) लाखो वापरकर्त्यांनी नुकताच निरोप दिला असून त्यांनी ‘ब्लूस्काय’ या नवीन मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ब्लूस्काय वापरण्याच्या संख्येमध्ये अधिक वाढ झाली. ‘ब्लूस्काय’ हे नवे समाज माध्यम काय आहे, लाखो वापरकर्त्यांनी त्यावर खाते का उघडले, आणि अमेरिकी निवडणुकीचा त्याच्याशी संबंध काय, याबाबतचे विश्लेषण…

ब्लूस्काय हे नवे समाज माध्यम काय आहे?

इलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ सारखेच ब्लूस्काय हे समाज माध्यम व्यासपीठ आहे. एक्सवर ज्याप्रमाणे पोस्ट, संदेश आणि रिट्वीट करता येतात, त्याचप्रमाणे या समाज माध्यमावरही अशा गोष्टी वापरकर्ते करू शकतात. ट्विटरची स्थापना करणारे जॅक डॉर्सी यांनीच ‘ब्लूस्काय’ तयार केले आहे. मस्कने दोन वर्षांपूर्वी ट्विटर विकत घेतल्यानंतर डॉर्सी यांनी आता मस्क यांच्या ‘एक्स’ला आव्हान देण्यासाठी ब्लूस्कायची निर्मिती केली. अल्प कालावधीत ब्लूस्कायला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून अमेरिकेतील १.५ लाख नागरिकांनी ‘एक्स’ वापरणे बंद केले आणि ते आता ब्लूस्कायकडे वळले आहेत. २०२१ मध्ये ब्लूस्काय एक स्वतंत्र कंपनी म्हणून तयार करण्यात आली आणि त्यानंतर डॉर्सी यांनी तयार केलेले समाज माध्यम त्यांनी प्रसृत केले. ब्लूस्काय या समाजमाध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे ग्रेबर आहेत. २०१९ मध्ये डॉर्सी यांनी ब्लूस्काय एक नवीन उपक्रम म्हणून सुरू केला होता, परंतु २०२२ मध्ये मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ब्लूस्काय आता मस्कच्या एक्सचे मुख्य प्रतिस्पर्धी बनला आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा >>>निवडणुकीत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा का गाजतोय? अदानींवरून दावे-प्रतिदावे का?

ब्लूस्कायचा वापर कसा?

डॉर्सी यांनी बनवलेले ब्लूस्काय हे समाज माध्यम व्यासपीठ या वर्षी फेब्रुवारीमध्ये नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मात्र त्यावेळी ते केवळ प्राथमिक अवस्थेत होते. त्यानंतर १० महिन्यांच्या कालावधीत या समाज माध्यमांवर नियंत्रण साधने आणि इतर फिचर्स तयार करण्यात आले. ब्लूस्कायचे व्यासपीठ मस्कच्या ‘एक्स’पेक्षाही, परंतु पूर्वीच्या ट्विटरशी अधिक साधर्म्य साधते. त्या ट्विटरच्या निळ्या पक्ष्याची जागा येथे निळ्या फुलपाखराने घेतली आहे. ब्लूस्कायवर एक्सप्रमाणे तुम्ही पोस्ट, संदेश आणि रिट्वीट करू शकता, थेट संदेश पाठवू शकता आणि पोस्ट पिन करू शकता. ब्लूस्काय वापरकर्ते स्वत:चे सर्व्हर निर्माण करू शकतात आणि तिथे डाटा साठवून ठेवू शकतात. ब्लूस्काय वापरकर्त्यांना लघूसंदेश पोस्ट करण्याची परवानगी देते, त्याशिवाय छायाचित्रे आणि चित्रफिती पोस्ट करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. ब्लूस्कायचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ‘डिसेंट्रलायझेशन फ्रेमवर्क’ हे आहे, ते डेटा स्टोरेजला स्वतंत्र बनवते. ब्लूस्काय हे समाज माध्यम व्यासपीठ एक्सपेक्षा भिन्न अल्गोरिदम फीड वापरते. येथे तुम्हाला फक्त तोच मजकूर दिसेल, जो तुम्ही फॉलो करता किंवा तुम्हाला माहीत आहे.

ब्लूस्कायचे वापरकर्ते किती?

ब्लूस्कायने नोव्हेंबरच्या मध्यात सांगितले की त्यांचे एकूण वापरकर्ते १.५० कोटी झाले आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस ही संख्या अंदाजे १.३० कोटी होती. ‘एक्स’वरील अनेक वापरकर्ते त्यांचे विचार मांडण्यासाठी पर्यायी व्यासपीठाचा शोध घेत होते. त्याचवेळी ब्लूस्काय प्रसिद्ध झाल्याने अनेक वापरकर्त्यांनी एक्सचा निरोप घेतला आणि हे नवे समाज माध्यम वापरायला सुरुवात केली. ब्राझीलमध्ये ऑगस्टमध्ये एक्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर अनेकांनी ब्लूस्कायचा वापर करण्यास सुरुवात केली आणि या नव्या समाजमाध्यमाने आठवडाभरात २६ लाख वापरकर्ते मिळवले. ब्लॉक केलेल्या खात्यांचे वापरकर्तेही तुमच्या सार्वजनिक पोस्ट पाहू शकतात, असे एक्सने ऑक्टोबरमध्ये सूचित केल्यानंतर पाच लाख वापरकर्त्यांनी ब्लूस्कायचा वापर करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>>पाकिस्तान-बांगलादेशदरम्यान सागरी मार्ग सुरू? भारताची चिंता का वाढली?

ब्लूस्काय वापरकर्ते वाढण्याचे कारण?

अमेरिकी उद्योजक असलेल्या इलॉन मस्क याने नोव्हेंबर २०२२ मध्ये ट्विटर विकत घेतले आणि त्याचे नाव एक्स ठेवले. मात्र मस्क याचा कारभार मनमानी असल्याचा आरोप अनेक वापरकर्त्यांनी केला आहे. ‘एक्स’ वापरकर्त्यांसाठी मस्कने तयार केलेले काही नियम आणि फिचर्स वापरकर्त्यांना आवडलेले नाहीत. मस्कने टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या वापरकर्त्यांना मोकळे रान दिले.  शिवाय गेल्याच महिन्यात घोषणा केली की वापरकर्ते आता ज्यांना ब्लॉक केले आहे त्यांच्याही पोस्ट पाहू शकतात. काही वापरकर्त्यांना मस्कची ही घोषणा पटली नसल्याने त्यांनी एक्सला रामराम ठोकला. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खुले समर्थन दिले आणि त्यांचा प्रचार केला. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांनी एक्स सोडल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एक्स या समाजमाध्यमाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader