करोना संसर्गाची साथ सुरू झाल्यानंतर ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ (Buy now, Pay later) हा पर्याय प्रचंड लोकप्रिय झाला आहे. विशेषत: तरुण पिढीमध्ये आणि कमी उत्पन्न असलेले ग्राहकांमध्ये हा पर्याय सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या पर्यायामुळे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कपडे, फर्निचर, स्नीकर्स किंवा कॉन्सर्टचे तिकिटं खरेदी करू शकता. याची देयक रक्कम एकाच वेळी भरण्याऐवजी छोट्या रकमेच्या सुलभ हफ्त्यांमध्ये भरू शकता.
आफ्टरपे, अॅफर्म, क्लार्ना आणि पेपल यासारख्या कंपन्यांनी ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सुविधा देऊ केली आहे. या वर्षाच्या शेवटी अॅपलही ही सुविधा बाजारात आणणार आहे. पण आर्थिक अस्थिरतेच्या काळात अनेक अपराधही वाढत आहेत. त्यामुळे ही सुविधा नेमकी काय आहे? याचा ग्राहकांना फायदा होतो की तोटा? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सुविधा नेमकी काय आहे?
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सुविधा मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संबंधित अॅप डाउनलोड करावं लागतं. त्यानंतर संबंधित अॅपच्या माध्यमातून बँक खातं, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. यानंतर साप्ताहिक किंवा मासिक हप्त्यांमध्ये पैसे भरण्यासाठी साइन अप करणे आवश्यक आहे. क्लार्ना आणि आफ्टरपे यासारख्या कंपन्या कर्जदारांना ही सुविधा देण्यापूर्वी क्रेडिट तपासतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास अवघ्या काही मिनिटांत अशा प्रकारचं मंजूर केलं जातं. यानंतर ठरलेल्या हफ्त्याप्रमाणे आपोआप तुमच्या खात्यातून पैसे वजा केले जातात किंवा तुमच्या कार्डवर शुल्क आकारले जाते.
जर तुम्ही वेळेवर हफ्ते भरत असाल तर तांत्रिकदृष्ट्या ही सेवा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं व्याज आकारत नाही. परंतु तुम्ही उशिरा हफ्ते भरल्यास किंवा हफ्ते चुकवल्यास एकूण देय रकमेच्या टक्केवारीनुसार आगाऊ शुल्क आकारले जाऊ शकते. ३४ डॉलरपेक्षा पेक्षा जास्त व्याज आकारले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही एकापेक्षा अधिकवेळा हफ्ते चुकवल्यास, भविष्यात ही सेवा वापरण्यावर तुमच्यावर बंधणे येतात. अशा आर्थिक अपराधामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचू शकते.
अशाप्रकारे खरेदी करणं सुरक्षित आहे का?
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा अमेरिकेतील ‘ट्रुथ इन लेंडिंग’ कायद्याचा भाग नाही. या कायद्याद्वारे क्रेडिट कार्ड आणि इतर प्रकारच्या कर्जांचे नियमन केले जाते. याचा अर्थ तुमचा व्यापाऱ्यांशी झालेला वाद सोडवणे, वस्तू परत करणे किंवा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तुमचे पैसे परत मिळवणे, हे अधिक कठीण होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्या ग्राहकांना संरक्षण देऊ शकतात, परंतु असं करण्यात कंपन्यांना स्वारस्य नसल्याचं दिसून येतं.
‘नॅशनल कन्झ्युमर लॉ सेंटर’च्या सहयोगी संचालक लॉरेन सॉंडर्स यांच्या मते, कर्जदारांनी “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” या सेवेचा वापर करताना संबंधित अॅपला क्रेडिट कार्ड लिंक करणं टाळायला हवं. यामुळे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरण्याबाबतचं मिळणारं संरक्षण गमावू शकता. शिवाय कार्ड कंपनीच्या व्याजामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. शक्य असेल तर थेट क्रेडिट कार्डचा वापर करून असे व्यवहार करावेत.
इतर धोके काय आहेत?
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा कुठेही केंद्रीकृत केली नाही. त्यामुळे अशा कर्जांची नोंद प्रमुख क्रेडिट रेटिंग संस्थेसह तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर दिसत नाही. याचा अर्थ संबंधित कंपन्या तुम्हाला अधिक वस्तू खरेदी करण्याची मान्यता देऊ शकतात. कारण तुमच्यावर किती कर्ज आहे, हे इतर कंपन्यांना कळत नाही. अशा कर्जांचे हफ्ते तुम्ही वेळेवर भरले तर याची नोंद क्रेडिट रेटिंग संस्थेकडे केली जात नाही. मात्र, तुम्ही कर्जाचे हफ्ते चुकवले तर याची नोंद क्रेडिट रेटिंग संस्थेकडे केली जाते. याचा गंभीर परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.
हेही वाचा- विश्लेषण : देशात ‘इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी’ला सुरूवात; जाणून घ्या ग्राहकांना काय फायदा?
किरकोळ विक्रेते ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा का प्रदान करतात?
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ या सेवेमुळे संबंधित उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री होण्याची शक्यता वाढते. जेव्हा खरेदीदारांना हप्त्यांमध्ये रक्कम फेडण्याचा पर्याय दिला जातो, तेव्हा ते एकाच वेळी अधिक वस्तू खरेदी करण्याची शक्यता असते, त्यामुळे किरकोळ विक्रेते अशी सेवा देतात.
ही सेवा कुणासाठी सर्वाधिक फायदेशीर?
जर वेळेवर सर्व हफ्ते भरण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ ही सेवा तुमच्यासाठी तुलनेने निरोगी असू शकते. कारण यामुळे तुम्हाला व्याजमुक्त कर्ज मिळतं.परंतु तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करू इच्छित असाल आणि तुम्ही वेळेवर पेमेंट करू शकत असाल तर क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्हाला फसवणुकीपासून कायदेशीर संरक्षणही मिळते.