गौरव मुठे

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसच्या १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला ९ मार्चपासून सुरुवात झाली आहे. याआधी देखील टीसीएसने मागील पाच वर्षांत तीनदा ‘बायबॅक’ योजना राबविली आहे. टीसीएसने आतापर्यंत गुंतवणूकदारांकडून ४८,००० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. म्हणजे चालू योजना जमेस धरून, टीसीएस सहा वर्षांत एकूण ६६,००० कोटी रुपये तिच्या गुंतवणूकदारांच्या पदरी टाकत आहे. अर्थात या योजनेला गुंतवणूकदारांकडून प्रतिसादही उमदा आहे. या पार्श्वभूमीवर ‘बायबॅक’ म्हणजे काय, त्याचा गुंतवणूकदारांना आणि कंपनीला काय आणि कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.

footpaths in Pune city will be audited here is the reason
शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?

एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे. सरलेले २०२१ साल हे ‘आयपीओ’द्वारे कंपन्यांच्या निधी उभारणीसाठी जसे विक्रमी वर्ष ठरले, त्याचप्रमाणे याच वर्षात ६१ कंपन्यांनी तब्बल ३९,२९० कोटी रुपये भागधारकांना समभाग पुनर्खरेदीच्या बदल्यात वितरित केले, जी दोन वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. २०१९ मध्ये या माध्यमातून ६३ कंपन्यांनी विक्रमी ५५,५९० कोटी रुपयांचे भागधारकांमध्ये वाटप केले.

कंपन्या ‘बायबॅक’ का करतात ?

कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध कार्यासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्या व्यतिरिक्तदेखील ठराविक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.

विशेषत: टीसीएसप्रमाणेच ताळेबंदात मोठी राखीव गंगाजळी असणाऱ्या, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल या सॉफ्टवेअर आणि माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या भागधारकांना ‘बायबॅक’ लाभ देण्यात अग्रेसर राहिलेल्या आहेत. तथापि भागधारकांना हा लाभ पोहचविण्याचा करबचतीच्या दृष्टीनेही उपकारक मार्ग असल्याने, बिगर-आयटी कंपन्यांकडून हा मार्ग अलीकडे मोठ्या प्रमाणात अनुसरला जात आहे.

कंपन्यांसाठी बायबॅक फायदेशीर कसा असतो?

कंपनी बायबॅकची घोषणा करून एक प्रकारे भागधारकांना आणि बाजारातील गुंतवणूकदारांना कंपनी सशक्त आहे असा संदेश देत असते. म्हणजेच कंपनीचा तिचा व्यवसायावर विश्वास असून कंपनी भविष्यात अधिक चांगली कामगिरी करेल, असा संदेश देखील कंपनी देत असते. यामुळे इतर गुंतवणूकदारदेखील कंपनीच्या समभागाकडे आकर्षित होऊन समभाग खरेदी करतात आणि मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या समभागाची किंमत देखील वधारते.

भांडवली बाजारात कंपनीच्या समभांगाची संख्या (फ्री फ्लोट) खूप जास्त असेल आणि त्यामुळे समभागाच्या किमतीत हालचाल खूप धीमी असेल किंवा समभागाच्या किमतीतील वृद्धी कमी असेल तर कंपन्या बाजारातील उपलब्ध समभागांची संख्या कमी करतात. ज्यामुळे बाजारात समभाग संख्या घटल्याने किंमत वधारण्यासाठी मदत होऊ शकते.

बायबॅक भागधारकांसाठी कसे फायदेशीर असते?

गुंतवणूकगुरू वॉरेन बफे दरवर्षी भागधारकांना एक खुले पत्र लिहून कानमंत्र देत असतात. चालू वर्षातील म्हणजे २०२२ सालातील पत्रात त्यांनी ‘बायबॅक’ची महती विशद केली आहे. बफे यांच्या मते, ‘बायबॅकमुळे कंपनीच्या व्यवसायातून मिळू शकणाऱ्या नफ्यावर भागधारकाचा दावा वाढू शकतो.’ कंपनीकडून बायबॅक केल्यामुळे बाजारातील समभागांची संख्या कमी झाल्याने प्रति शेअर उत्पन्न (अर्निंग पर शेअर- ईपीएस) वाढण्याची शक्यता असते, जे अर्थात समभागांचे ‘मूल्य’ वाढविण्यासही हातभार लावते. शेअर बायबॅकमुळे भागधारकांना दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे बऱ्याचदा बाजारात समभागाची किंमत कमी असते आणि त्यावेळी कंपनी बायबॅकच्या माध्यमातून बाजार किमतीपेक्षा अधिक किंमतीला समभाग खरेदी करते. याचबरोबर बाजारातील समभागांची संख्या कमी होणार असल्याने लवकरच कंपनीच्या समभागाची किंमत वरच्या दिशेने जाण्याची शक्यता वाढते. सध्या टीसीएसने ४,५०० रुपये प्रतिसमभागाप्रमाणे शेअर बायबॅकचा प्रस्ताव दिला आहे. सध्या युक्रेन – रशिया युद्धामुळे भांडवली बाजारात मोठी घसरण झाली आहे. टीसीएसचा समभागात देखील घसरण झाल्याने अशावेळी भागधारकांसाठी बायबॅक फायदेशीर ठरतो. शिवाय एकदा कंपनीकडून बायबॅक झाल्यानंतर बाजारात समभाग पुन्हा स्वस्तात उपलब्ध असल्यास गुंतवणूकदार पुन्हा कमी किमतीला बाजारात उपलब्ध असलेले समभाग खरेदी करू शकतो. यामुळे गुंतववणूकदार बायबॅकच्या माध्यमातून दिलेले समभाग आणि पुन्हा बाजारातून कमी किंमतीला खरेदी केलेले समभाग यातील जो फरक शिल्लक राहतो तो नफ्याच्या रूपाने पदरात पाडून घेऊ शकतो.

विश्लेषण: झटपट लोकल प्रवासासाठी सीबीटीसी; काय आहे ही यंत्रणा?

‘बायबॅक’ची प्रक्रिया कशी असते?

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीतील गंगाजळीचा आढावा घेऊन बायबॅकचा प्रस्ताव ठेवण्यात येतो. कंपनीच्या संचालकांनी बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर कंपनी बायबॅकसाठी एक सूचना जाहीर करते. यामध्ये बायबॅक किंमत, रेकॉर्ड डेट आणि बायबॅक कालावधी नमूद केला जातो. रेकॉर्ड डेट म्हणजेच कंपनीने निश्चित केलेल्या तारखेला तुमच्याकडे त्या कंपनीचे समभाग असणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागधारक समजले जातात आणि रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या खतावण्यात भागधारक म्हणून तुमची नोंद असते. असे पात्र भागधारक कंपनीच्या बायबॅकमध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनी ज्या प्रमाणात समभागांची पुनर्खरेदी करू पाहतेय, त्याच प्रमाणत भागधारकांकडील समभाग खरेदीसाठी पात्र समभाग किती हे देखील कंपनीकडून भागधारकांना ई-मेल संदेशाद्वारे कळविले जाते. भागधारक त्यांच्याकडील सर्वच समभाग या प्रक्रियेत कंपनीला विकू शकत नाहीत.

Story img Loader