कुलदीप घायवट

मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकल सेवेमुळे मुंबई सदोदित धावती असते. लोकलमुळे संपूर्ण मुंबई महानगरात स्वस्तात आणि वेगवान प्रवास प्रवाशांचा होतो. मात्र या लोकलचे चालक अर्थात मोटरमनच्या आंदोलनाने मुंबईकरांची गती मंदावली. मोटरमननी आंदोलन मागे घेतले असले तरीही त्यांच्या समस्या सुटणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
demand diesel SUV cars
विश्लेषण : डिझेल एसयूव्ही कार्सच्या मागणीत वाढ का होत आहे?

मोटरमन संघटनेने आंदोलन का सुरू केले?

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका मोटरमनच्या निधनानंतर आंदोलनाची ठिणगी पडली. सर्व मोटरमन एकवटले. त्यानंतर अतिरिक्त तास काम बंद करून मोटरमन संघटनेने असहकार आंदोलन सुरू केले. यामुळे शनिवारी लोकल फेऱ्या पूर्ण क्षमतेने धावू शकल्या नाही. याचा थेट फटका सर्वसामान्य नोकरदार वर्ग, छोटे व्यावसायिक, कष्टकरी वर्ग, विद्यार्थी, महिला, रुग्ण यांना बसला. लोकल प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वे प्रशासना आणि मोटरमन, रेल्वे कर्मचारी संघटना यांची तातडीची बैठक झाली. त्या बैठकीत प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मोटरमननी अतिरिक्त काम बंद आंदोलन मागे घेऊन लोकल सेवा पूर्ववत केली.

हेही वाचा… विश्लेषण: दिल्लीत पुन्हा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय? 

मोटरमनचा मृत्यू नेमका कसा झाला?

शुक्रवारी हार्बर मार्गावरून पनवेल-सीएसएमटी लोकल चालवताना नकळतपणे मोटरमन मुरलीधर शर्मा (५४) यांनी सिग्नलचा नियम मोडला. त्यानंतर कठोर कारवाईला तोंड कसे द्यावे, कारवाईमुळे कुटुंबियांना त्रास होणार, आर्थिक बाजू कोलमडणार अशा अनेक प्रश्नांनी मोटरमन शर्मा यांच्या मनात घर केले, असे सांगितले जाते. त्यांच्या डोक्यात बहुधा तोच विचार सुरू असताना भायखळा-सॅन्डहर्स्ट रोड येथे रेल्वे रूळ ओलांडताना प्रगती एक्स्प्रेसची जोरदार धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शर्मा यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होऊ लागली.

शर्मा यांचा मृत्यू आंदोलनाचे कारण कसा?

मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी गुरुवारी सकाळी एका पाळीचे काम करून सायंकाळी पुन्हा ‘जादा काम’ केले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी कर्तव्य बजावताना धोक्यात सिग्नल चुकीच्या पद्धतीने ओलांडला. मध्य रेल्वे प्रशासनाने मोटरमनवर जादा काम करायची सक्ती केल्याने, मोटरमन तणावाखाली आहेत. या तणावामुळे शर्मा यांच्याकडून नियमाचे उल्लंघन झाले असावे, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नियमभंगाची शिक्षा म्हणून मोटरमनला सक्तीची किंवा अनिवार्य निवृत्ती (सीआरएस) दिली जाते. ती भीती शर्मा यांच्या मनात होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ऑल इंडिया एस.सी- एस.टी. रेल्वे एम्प्लॉयइज असोशिएशन, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, रेल कामगार सेना, मोटरमन, ट्रेन मॅनेजर उपनगरीय लाॅबीने अतिरिक्त तास काम न करण्याचा निर्णय घेऊन असहकार्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… विश्लेषण : ‘युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी आमची नाही’… ट्रम्प यांच्या विधानावरून वादंग का?

मोटरमनच्या आंदोलनाचा काय परिणाम झाला?

लोकल सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून लोकल सेवेवर लाखो प्रवासी अवलंबून आहेत. शुक्रवारी सायंकाळी मोटरमननी आंदोलन पुकारले. त्यानंतर शनिवारी सकाळी मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुख्य मार्गिका आणि हार्बर रेल्वेवरील सुमारे २० लोकल फेऱ्या रद्द झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, परिस्थिती गंभीर होती. शनिवारी संपूर्ण दिवसभर १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द आणि ३०० हून अधिक लोकल उशिराने धावल्या. अनेक लोकल ३० मिनिटांपासून ते ६० मिनिटांपर्यंत उशिराने धावत होत्या. परिणामी, लाखो प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागल्या. एक लोकल एकाच ठिकाणी बराच अवधी थांबल्याने, प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे मार्गावरून पायी पुढील स्थानक गाठले.

मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम कसा?

मुंबई हे बेटांचे शहर असून, सात बेटांमध्ये भराव टाकून संपूर्ण मुंबई तयार झाली. अनेक दलदलींचा भाग, तलावांचे क्षेत्र बुजवून रेल्वे मार्ग तयार करण्यात आले. हळूहळू मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वेचे जाळे विस्तीर्ण होत गेले. सद्यःस्थितीत रेल्वे मार्गांचे हे जाळे प्रचंड गुंतागुंतीचे आहे. मुंबईतील अनेक रेल्वे मार्ग तीव्र वळणांचे, चढ-उतार असलेले आहे. या मार्गात अनेक पूल, बोगदे आहेत. मार्गालगत लोकवस्ती आहे. अनेक मार्गिकांची गुंतागुंत, त्यावरून सातत्याने लोकल सेवा सुरू राहणे, सिग्नलच्या जागा निश्चित नाहीत अशा अनेक बाबींशी सामना करून मोटरमनला कायम सतर्क राहून लोकल चालवावी लागते.

हेही वाचा… भारतीय संस्कृती: प्रणय देवतांच्या प्रेमकथेचा अन्वयार्थ काय?

मुंबईतील सिग्नल यंत्रणा मोटरमनला का देतेय चकवा?

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील जवळपास दोन हजारहून अधिक सिग्नल आहेत. त्यापैकी अनेक सिग्नल जागेअभावी नियमांना बगल देऊन उभे करण्यात आले आहेत. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे रुळांच्या डाव्या बाजूला सर्व सिग्नल असणे बंधनकारक आहे. परंतु, जागेअभावी रेल्वेने सुमारे ३७५ सिग्नल उजव्या बाजूला लावले असून त्याला रेल्वे मंडळाची मंजुरी घेतली. हा बदल लक्षात घेऊन लोकल चालवताना अनेकदा मोटारमनचा गोंधळ उडतो. त्यामुळे लोकलच्या वेगावर परिणाम होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उजव्या बाजूला असलेल्या सिग्नलपैकी जवळपास ३२ सिग्नल जागेनुसार डाव्या बाजूला बसवण्याचे काम हाती घेतले आहे. यासह दोन सिग्नलमधील अंतर २०० मी., ४०० मी. व प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असल्याने मोटरमनला पुढील सिग्नलचा अंदाज पटकन येत नाही.

आतापर्यंत किती मोटरमनवर कारवाई?

मुंबईतील सिग्नल यंत्रणा निश्चित ठिकाणी नसल्याने तणावपूर्ण परिस्थितीत मोटरमनला लोकल चालवावी लागते. लोकल चालवताना मोटरमनकडून अनेकदा नकळतपणे सिग्नल नियम मोडणे, लोकलचा निश्चित थांबा ओलांडणे (प्लॅटफॉर्म ओव्हर शूटिंग) असे प्रकार घडतात. मोटरमनच्या सिग्नल संबंधित चुकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सक्तीची/अनिवार्य निवृत्तीची (सीआरएस) कारवाई केली जाते. त्यामुळे मोटरमन प्रचंड दडपणाखाली असून त्याचा ताण वाढत आहे. परिणामी अनेक शारीरिक व्याधी जडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे कामगार सेनेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३५ मोटरमनवर सीआरएसची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आंदोलनानंतर कारवाई थांबणार का?

धोक्याच्या स्थितीत सिग्नल ओलांडून (एसपीएडी) घटनांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वे मंडळाकडे सादर केला जाईल. जोपर्यंत रेल्वे मंडळ या प्रकरणावर अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत, मोटरमन नोकरीच्या सुरक्षिततेची अपेक्षा करू शकतात. तसेच एसपीएडीच्या (सिग्नल पासिंग अॅट डेंजर) बाबतीत सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार नाही, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी मोटरमन संघटनेला दिले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची कमतरता?

मध्य रेल्वेवर दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. मात्र, या लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेकडे पुरेसे मोटरमन नाहीत. सध्या मोटरमनच्या २० टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांचा ताण इतर मोटरमनवर येतो. मोटरमनला अतिरिक्त तास कर्तव्य निभावून लोकल फेऱ्या चालवाव्या लागतात.

रेल्वेचे म्हणणे काय?

मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देते. मोटरमनने सिग्नल ओलांडून अपघात केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. एका लोकलमधील दोन हजारांहून अधिक प्रवाशांची जबाबदारी एका मोटरमनवर असते. त्यामुळे त्यांच्याकडून सिग्नल ओलांडण्याची घटना घडल्यास, लोकलमधील दोन हजार प्रवाशांसह पाठीमागून येणाऱ्या इतर लोकलच्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्याचबरोबर मोठी वित्तहानी होते. त्यामुळे सिग्नल ओलांडण्याच्या घटनेत नोकरीतून काढून टाकण्याची तरतूद रेल्वे मंडळाने तयार केली आहे. तरीही प्रशासनाकडून विचारपूर्वक कारवाई केली जाते. यासह अतिरिक्त कामाच्या तासाला मोटरमनला जादा मोबादला दिला जातो, असे एका मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader