तब्बल ११२ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक या जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली ‘टायटन’ ही पाणबुडी गायब झाली होती. या पाणबुडीचे अवशेष सापडले असून यातील सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही पाणबुडी तळाशी झेपावल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्याशी संपर्क तुटला होता.

समुद्रात सापडले टायटन पाणबुडीचे अवशेष

टायटन या पाणबुडीचा ४ दिवसांपासून शोध सुरू होता. त्यासाठी अमेरिकेच्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या. शेवटी अमेरिकेच्या तटरक्षक दलाने पाणबुडीतील सर्वांचाच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याआधी तटरक्षक दलाने बचाव पथकांना पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत, असे सांगितले होते. पाणबुडीचा शोध घेण्यासाठी मानवरहित व्हेइकलची मदत घेण्यात आली होती. याच व्हेइकलला समुद्रात ४८८ मीटर (१६०० फूट) खोलात टायटन या पाणबुडीचे अवशेष सापडले होते. समुद्रात या पाणबुडीचा स्फोट झाल्याचा अंदाज अमेरिकन तटरक्षक दलाचे अॅडमिल जॉन मॅगर यांनी व्यक्त केला आहे.

USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?
Two young man drowned while fishing at Sadve in Dapoli
दापोलीतील सडवे येथे मासे पकडायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

पाणबुडीचा स्फोट कसा झाला?

टायटन या पाणबुडीसोबत नेमके काय घडले असावे? या प्रश्नाचे नेमके उत्तर कोणालाच माहिती नाही. मात्र ज्या दिवशी या पाणबुडीने समुद्रात प्रवासाला सुरूवात केली होती, त्याच दिवशी तिचा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टायटन ही पाणबुडी कार्बन फायबर आणि टायटॅनियमपासून तयार करण्यात आली होती. ४ हजार मीटर खोलीपर्यंतचा दबाव सहन करू शकेल तसेच पाणबुडीत बसलेल्यांचे पाण्याच्या दबावापासून संरक्षण होऊ शकेल, अशी या पाणबुडीची रचना करण्यात आली होती. टायटॅनिक जहाजाचे अवशेष ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी पाण्याचा दबाव प्रचंड असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळ जाणे म्हणजे खांद्यावर ३५ हत्ती उभे करण्यासारखे आहे.

समुद्रात खोलवर जाणे अधिक आव्हानात्मक

खोल समुद्रात प्रवास करणाऱ्या खलाशांना या प्रवासातील अडचणी आणि काठीण्यपातळीची कल्पना असते. अंतराळवीरांना अंतराळात जाताना ज्या अडचणी येतात, तशाच अडचणी खोल समुद्रातही येतात. किंबहुना अंतराळात जाण्यापेक्षा समुद्रात खोलवर जाणे अधिक आव्हानात्मक आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड विद्यापीठातील शिपबिल्डिंग हब फॉर इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग विभागाचे संचालक एरिक फुसिल यांनी सांगितले.

टायटन पाणबुडीतून प्रवास करणे योग्य होते का?

टायटन पाणबुडी कार्बन फायबर आणि टायटॅनियमचा वापर करून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे समुद्राच्या खोलवर जाण्यासाठी या पाणबुडीतून योग्य होते का, असा प्रश्न या क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. टायटॅनियम हा धातू लवचिक असतो. हा धातू दबाव आणि ताण दिला तरी तग धरू शकतो. कार्बन फायबरच्या बाबतीत मात्र तसे नाही. कार्बन फायबर हा कडक आणि लवचिक नसतो. जास्त दाब किंवा ताण दिल्यास तो तुटून जातो.

पाण्याच्या दबावामुळे २० सेकंदांत जहाजचा स्फोट?

याबाबत द कॉन्व्हर्सेशन या नियतकालिकात एरिक फ्युसिल यांनी याबाबत सविस्तर लिहिले आहे. कार्बन फायबर आणि टायटॅनियम यांच्यातील गुणधर्मांत फरक असल्यामुळे जहाजाच्या हूलमध्ये बिघाड होऊ शकतो. परिणामी पाण्यातील दबावामुळे जहाजाचा तत्काळ स्फोट होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या दबावामुळे एका सेकंदाच्या आत जहाज दबू शकते, असे फ्युसिल यांनी म्हटले आहे. पाण्यात होणाऱ्या या स्फोटामुळे २० मिलिसेकंदांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजेच मेंदू माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जेवढा वेळ घेतो, त्यापेक्षाही कमी कालावधित माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

आतापर्यंत समुद्रात खोलवर कोण-कोण गेलेले आहेत?

याआधीही अनेकवेळा लोकांनी पर्यटन आणि अभ्यासासाठी समुद्रात खोलवर जाण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. २०१४ साली कॅनडाचे चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन समुद्रात खोलवर गेले होते. ते समुद्रात १० हजार ९०० मीटर खोल गेलेले आहेत. तेथे जाऊन त्यांनी डेटा आणि फुटेज जमा केलेले आहेत. टायटॅनिक जहाज बुडालन्यांतर साधारण १०० वर्षांनी ते खोल समुद्रात गेले होते. कॅमेरॉन यांनी टायटानिकच्या अवशेषांनाही भेट दिलेली आहे.

२०१९ साली अमेरिकन एक्सप्लोरर व्हिक्टर वेस्कोवो यांनी मारियाना ट्रेंचमध्ये पाण्यात खोलवर जात जागतिक विक्रम केला होता. ते पाण्यात १० हजार ९२८ मीटरपर्यंत खोल गेले होते. याआधी १९६० साली जॅक्यूस पिकार्ड पाण्यात साधारण १० हजार ९१२ मीटर खोल गेले होते.

टायटन पाणबुडीत एकूण ५ जण प्रवास करत होते. यामध्ये अब्जाधीश हमीश हार्डिंग हेदेखील होते. वेस्कोवो हे हार्डिंग यांच्यासोबत समुद्रात खोलवर सर्वाधिक काळ राहिलेले आहेत. टायटन पाणबुडीत फ्रान्स नौदलाचे माजी कॅप्टन पॉल-हेन्री नार्गोलेट हेदेखील होते. त्यांनी याआधी अनेकवेळा टायटॅनिकच्या अवशेषांना भेट दिली होती.