तब्बल ११२ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक या जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली ‘टायटन’ ही पाणबुडी गायब झाली होती. या पाणबुडीचे अवशेष सापडले असून यातील सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही पाणबुडी तळाशी झेपावल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्याशी संपर्क तुटला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्रात सापडले टायटन पाणबुडीचे अवशेष

टायटन या पाणबुडीचा ४ दिवसांपासून शोध सुरू होता. त्यासाठी अमेरिकेच्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या. शेवटी अमेरिकेच्या तटरक्षक दलाने पाणबुडीतील सर्वांचाच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याआधी तटरक्षक दलाने बचाव पथकांना पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत, असे सांगितले होते. पाणबुडीचा शोध घेण्यासाठी मानवरहित व्हेइकलची मदत घेण्यात आली होती. याच व्हेइकलला समुद्रात ४८८ मीटर (१६०० फूट) खोलात टायटन या पाणबुडीचे अवशेष सापडले होते. समुद्रात या पाणबुडीचा स्फोट झाल्याचा अंदाज अमेरिकन तटरक्षक दलाचे अॅडमिल जॉन मॅगर यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is cause of titan sub implosion who go to see titanic wreckage prd
Show comments