भारतामध्ये स्टार्ट-अप कल्चर हे चांगलंच रूढ झालं आहे. छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांनीही स्वतःच्या उद्योगाला स्टार्ट-अपचं रूप दिलं आहे. स्वीगी, झोमॅटोसारख्या स्टार्ट-अपमुळे भारतीय उद्योगक्षेत्राला चांगलीच चालना मिळाली आहे. काही स्टार्ट-अपना उत्तम यश मिळालं पण काही स्टार्टअप मात्र पूर्णपणे अपयशी ठरले. स्टार्ट-अप विश्वात यासंदर्भात अशीच एक संकल्पना चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे झॉम्बी ‘स्टार्ट-अप’. याचा अर्थ म्हणजे एखाद्या स्टार्ट-अपची चांगली हवा करून त्यात एक मोठी रक्कम गुंतवण्यात येते पण त्यामानाने त्यातून अपेक्षित अशी कमाई होत नाही अशा स्टार्ट-अप्सना ‘झॉम्बी स्टार्ट-अप’ म्हंटलं जातं.

एखाद्या स्टार्ट-अपमध्ये काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. पण या अशा ‘झॉम्बी स्टार्टअप’मध्ये काम करण्यापूर्वी त्या स्टार्ट-अप कंपनीविषयी माहिती काढणं अत्यावश्यक असतं. तुम्हीसुद्धा एखाद्या स्टार्ट-अपमध्ये काम करायचा विचार करत असाल तर या खालील गोष्टींची काळजी घ्या.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

१. पैसे कुणी गुंतवले आहेत ते बघा :

एखाद्या स्टार्ट-अपमध्ये कुणी आर्थिक गुंतवणूक केली आहे याची माहिती तिथे काम सुरू करण्याआधी मिळवा. याबरोबरच त्या गुंतवणूकदाराची पार्श्वभूमी आणि त्याने आजवर केलेले बिझनेस याची माहिती मिळवा. यापैकी कोणतीच गोष्ट समाधानकारक नसेल तर त्या स्टार्टअपमध्ये शक्यतो काम करण्याचं टाळा.

आणखी वाचा : विश्लेषण : क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडून १७ लोकांची हत्या करणारा, मानवी रूपातील नरभक्षक जेफ्री डॅमर होता तरी कोण?

२. गोंधळून जाऊ नका :

चमकतं ते सगळं सोनं नसतं ही गोष्टी ध्यानात ठेवायला हवी. त्याप्रमाणेच एखादं स्टार्ट-अप बाहेरून कितीही वेगळं आणि उत्तम वाटत असलं तरी त्याच्या या प्रतिमेला भुलून तुम्ही तिथे काम करायचा निर्णय घेऊ नका. कंपनीला किती पुरस्कार मिळाले यापेक्षा त्यांचे व्यावहारिक आकडे याकडे लक्ष ठेवा.

३. कर्मचाऱ्यांची प्रगती बघा :

एखाद्या स्टार्ट-अपमध्ये केवळ टॉप लेवल मॅनेजमेंट नव्हे तर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची वैयक्तिक आणि आर्थिक प्रगती किती होत आहे या गोष्टीचा अभ्यास करा. काही स्टार्ट-अपमध्ये अजूनही कर्मचाऱ्यांना योग्य पगार आणि पगारवाढ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊनच त्या स्टार्ट-अपमध्ये काम करायचा निर्णय घ्या.

४. पारदर्शकता :

कोणत्याही स्टार्ट-अप कंपनीमध्ये काम सुरू करण्यापूर्वी त्या कंपनीची पारदर्शकता तपासून पाहा. कारण स्टार्ट-अप असो किंवा मोठी कंपनी दोन्हीच्या व्यवहारात सुसूत्रता आणि पारदर्शकता नसेल तर त्या कंपनीची आणि त्यात काम करणाऱ्या लोकांची प्रगती खुंटते असं कित्येक उद्योजकांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : IMDb वरील चित्रपटांचं रेटिंग अचूक असतं का? जाणून घ्या कसं देतात रेटिंग

५. मूळ उद्देश जाणून घ्या :

एखाद्या स्टार्ट-अपमध्ये काम करताना ती कंपनी सुरू करण्यामागचा मुख्य हेतु जाणून घ्या. बरेचसे उद्योजक साईड बिझनेस म्हणून एखादी स्टार्ट-अप कंपनी सुरू करतात आणि त्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोनही संकुचित असतो. बऱ्याचदा त्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग हळूहळू त्यांचा यातला रस कमी होतो. त्यामुळे बऱ्याच स्टार्ट-अप कंपन्या या नकारात्मक दृष्टिकोनामुळे बंद पडतात.

Story img Loader