करोनाचा संसर्ग झाल्यानंतर असिम्टोमॅटीक म्हणजेच लक्षणं न दिसणारे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अनेकजण घरीच आयसोलेशनमध्ये राहून औषधांच्या मदतीने करोनावर मात करत आहेत. मात्र घरीच उपचार घेणाऱ्या आणि कमी वयाच्या रुग्णांवर रोगप्रतिकार करणाऱ्या प्रोटीन्सचा उलट परिणाम होताना दिसतोय. खास करुन तरुण किंवा करोनाशिवाय इतर कोणताही त्रास नसणाऱ्यांमध्ये साइटोकिन स्टोमची समस्या दिसून येत आहे. मागील काही काळापासून करोनामुळे किंवा करोनामधून बरं झाल्यानंतरही तरुणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागील मुख्य कारण साइटोकिन स्टोम असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र साइटोकिन स्टोम म्हणजे काय?, यामुळे शरीरावर काय परिणाम होतो असे अनेक प्रश्नांसंदर्भात सध्या इंटरनेटवर माहिती शोधली जात आहेत. याच साइटोकिन स्टोमबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं
एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये इम्यून सिस्टीम साइटोकिन नावाची प्रथिनं (प्रोटीन्स) तयार होतात. अनेकदा हे प्रोटीन्स कधीतरी एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होतात की त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याऐवजी ही प्रथिनं चांगल्या पेशींवर दुष्परिणाम करतात. याच गोष्टीला साइटोकिन स्टोम असं म्हटलं जातं. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रोगप्रतिकारशक्ती विषाणूंविरोधात लढण्याऐवजी शरीरातील चांगल्या पेशींविरोधातच लढते.
नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?
साइटोकिन स्टोम परिस्थितीमध्ये शरीरातील चांगल्या पेशींवर परिणाम करणाऱ्या प्रथिनांमध्ये एवढ्या मोठ्या प्राणात वाढ होते की रोगप्रतिकारशक्ती फारशी परिणामकारक ठरत नाही. त्यामुळेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्ग झाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. साइटोकिन हे विषाणूंना प्रतिकार करणारं प्रथिनं आहे. संसर्ग झाल्यानंतर ही प्रथिनं शरीरामध्ये तयार होतात. शरीरामध्ये संसर्ग अधिक प्रमाणामध्ये पसरु नये यासाठी ही प्रथिनं काम करतात. विषाणूंमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी रक्तामध्ये मर्यादित प्रमाणात ही प्रथिनं असणं गरजेचं असतं. मात्र कधीतरी संसर्ग रोखण्याचं काम असणारं हे प्रथिनेच शरीरासाठी घातक ठरतात. मात्र नक्की असं का होतं हे समजून घेण्यासाठी साइटोकिन स्टोम परिस्थिती कशी निर्माण होते हे समजून घ्यावं लागेल.
नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
सर्वात आधी कधी यासंदर्भात समजलं होतं?
साइटोकिन स्टोमचा शोध सर्वात आधी १९९३ मध्ये लागला. सुरुवातीला त्याला हायपरसाइटोकिनेमिया असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर यासंदर्भात बरंच संशोधन झालं आणि हा शब्द अनेकदा वापरण्यात आला. या प्रक्रियेमध्ये साइटोकिन प्रथिनं अनियंत्रित पद्धतीने वाढत जातात आणि रुग्णांच्या फुफ्फुसांना सूज येते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. याला सेकेंड्री बँक्टेरियल निमोनिया असंही म्हटलं जातं. सेकेंड्री बँक्टेरियल निमोनियामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर इतर कोणत्या विषाणूचा संसर्ग झाल्यास शरीरामधील ऑटो इम्यून सिस्टीम अधिक जास्त प्रमाणात काम करु लागते. आधीच संसर्ग झालेला असतानाच पुन्हा नव्याने एखाद्या विषाणुचा संसर्ग झाल्यास शरीरामध्ये प्रथिनं निर्माण होण्याचं प्रमाणही वाढतं आणि साइटोकिन स्टोमची शक्यता निर्माण होते.
नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?
साइटोकिन स्टोमची लक्षणं काय?
साइटोकिन स्टोम झाल्यानंतर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येणं, शरीराला सूज येणं याचबरोबर चक्कर येणं, खूप थकवा येणे, उलट्या होणे या गोष्टींचा समावेश आहे. विशेष म्हणजे साइटोकिन स्टोम हा केवळ करोना संसर्ग झालेल्यांना होतो असं नाही. तर कोणत्याही व्यक्तीमध्ये मोठ्याप्रमाणात रोगप्रतिकारशक्ती वाढली तर साइटोकिन स्टोमचा धोका निर्माण होतो. कोणत्याही धडधाकट व्यक्तीलाही साइटोकिन स्टोमचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या शरीरामधील सुदृढ पेशींवर परिणाम होऊन प्रकृती खालावते.
नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?
साइटोकिन स्टोमला सन १९१८-२० मध्ये स्पॅनिश फ्लूच्या संसर्गाच्या वेळी लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते. काही वर्षांपूर्वी एचवनएनवन म्हणजेच ‘स्वाइन फ्लू’ आणि एचफाइव्हएनवन म्हणजेच ‘बर्ड फ्लू’च्या साथींदरम्यानही साइटोकिन स्टोममुळे मृत्यू झाला होता. या साथींच्या दरम्यान रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नादात अधिक प्रमाणात प्रोटीन निर्माण झाल्याने काही रुग्णांचा मल्टीपल ऑर्गन फ्लेल्यूअरने मृत्यू झाला होता.