अनीश पाटील

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डार्क वेबवरून अमली पदार्थांचे वितरण करणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एमडीएमए हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. डार्क वेबद्वारे नेदरलँड्समधून एमडीएमए आणण्यात आले होते. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी डार्क वेब, मोबाइल मेसेंजरसारख्या सुविधांचा वापर होत आहे. अमली पदार्थविरोधी पथकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी विक्रेते मानवविरहित तस्करीवर अधिक भर देत आहेत. कुरियर व पोस्टामार्फत अमली पदार्थ पुरवले जातात. हा सर्व व्यवहार आभासी चलनाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे मूळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यपद्धतीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न…

amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
IRCTC , IRCTC website down, IRCTC latest news,
आयआरसीटीसी संकेतस्थळ काही काळ बंद
Drugs worth Rs 44 lakh seized in Katraj area one arrested by anti-narcotics squad
कात्रज भागात ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
Stock of illegal drugs cigarettes seized at airport Mumbai news
विमानतळावर अवैध औषधे, सिगारेटचा साठा जप्त
cyber crime
सायबर सुरक्षाकवच
mumbai, retired woman income tax department Digital arrested
प्राप्तीकर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्ट, २५ लाख रुपयांची सायबर फसवणूक

डीप वेब आणि डार्क वेब म्हणजे काय?

महासागराच्या तळाशी कुठले जीव अस्तित्वात आहेत, याची आपल्याला पूर्णपणे माहिती नाही. त्याप्रमाणे इंटरनेटच्या जगात डीप वेब आहे. इंटरनेटच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाग हा ‘डीप वेब’ आहे. असे म्हटले जाते की इंटरनेटचा हा भाग इतका मोठा आहे की येथे किती संकेतस्थळे आहेत हे कोणीच शोधू शकत नाही. डीप वेबमध्येच एक मोठे काळे जग आहे, ज्याला डार्क वेब म्हणतात. अनेकदा डीप वेब आणि डार्क वेब हे एकच समजले जाते. ज्यांना सर्च इंजिन ओळखू शकत नाहीत, त्यांच्यासाठी डीप वेब ही संकल्पना वापरली जाते. तेथील बहुतांश माहिती ही सुरक्षित असते आणि ती फक्त काही विशेष व्यक्तींनाच पाहता येते.

डार्क वेबपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. त्यासाठी विशेष ब्राऊझरचा वापर केला जातो. हा डीप वेबचाच एक भाग मानला जातो. डार्क वेबच्या माध्यमातून सायबर जगतातील अनेक अवैध धंदे चालतात. कधी या जगात हॅकर्स, विधि अधिकारी आणि सायबर गुन्हेगारांचा दबदबा होता. एन्क्रिप्शन आणि विशेष ब्राऊझरच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने डार्क वेबपर्यंत पोहोचता येते. डार्क वेबचा वापर बेकायदा नाही, मात्र त्याचे अनेक धोके असतात. सायबर गुन्हे, संशयित प्रणाली किंवा इतर देशांच्या यंत्रणांच्या जाळ्यात अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे सामान्यांना इंटरनेटवरील या जगापासून दूर राहण्याचाच सल्ला दिला जातो.

तस्करीसाठी डार्क वेबचा कसा वापर होतो?

ही कार्यपद्धती विशेषत: आंतरराष्ट्रीय तस्कर वापरतात. या कार्यपद्धतीत सर्व व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. बीटकॉईनसारख्या कूटचलनाच्या साहाय्याने अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. हा व्यवहार दिसतो तितका सोपा नाही. डार्क आणि डीप अशा दोन प्रकारांत हा व्यवहार होतो. या व्यवहारासाठी इंटरनेटवरील या तस्करांच्या संकेतस्थळावरून सदस्यत्व घ्यावे लागते. कूटचलनाद्वारे, बिटकॉइनद्वारे सदस्यत्व मिळते. एका बिटकॉइनची किंमत सध्या २२ लाखांवर पोहोचली आहे. त्यावरून यातील उलाढालीचा अंदाज येऊ शकतो. संकेतस्थळावर सदस्य होण्यासाठी बिटकॉइन खरेदी करावे लागतात. मात्र नुसते बिटकॉइन खरेदी करूनदेखील सदस्य केले जाईलच असे नाही. जोपर्यंत तस्कराचा हेतू स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सदस्यत्व मिळत नाही. डार्क वेबवर असे क्रमांक व संकेतस्थळे उपलब्ध आहेत. त्यामार्फत अमली पदार्थ मागवले जातात. त्याची रक्कमही कूटचलनात दिली जाते. या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग दिसत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर, पोस्ट सेवेचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. परिणामी आरोपींपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.

स्थानिक बाजारात अमली पदार्थांची कशी विक्री होते?

स्थानिक बाजारात अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुकवरून त्याची माहिती प्रसारित केली जाते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी विशिष्ट संकेतांक सांगणे आवश्यक असते. या पार्टीत कोकेन, केटामाइनसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठे समारंभ, ते आयोजित करणाऱ्या कंपन्या किंवा कुरियरच्या माध्यमातून तस्कर अमली पदार्थ पार्ट्यांमध्ये पोहोचवतात.

भारतातूनही कुरियरमार्गे तस्करी होते का?

आंध्र प्रदेशवरून कुरियरमार्फत ऑस्ट्रेलियात एफिड्रीनच्या तस्करीचा मार्ग एनसीबीने शोधून काढला आहे. एनसीबीने यापूर्वी केलेल्या पाच कारवायांमध्ये कुरियरमार्फत ऑस्ट्रेलियात जात असलेले अमली पदार्थ जप्त केले होते. त्यात १० किलोपेक्षा जास्त एफिड्रीन जप्त करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये एफिड्रीन व मेथा एमफेटामाईन हे अमली पदार्थ चांगलेच प्रचलित आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशातील काही तस्कर कुरियरमार्गे ऑस्ट्रेलियामध्ये एफिड्रीन पाठवत आहेत.

निर्मितीसाठी नवीन मार्गांचाही वापर होतो का?

अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी कच्चा माल गोळा करण्याच्या पद्धतीही आता बदलल्या आहेत. डॉक्टर शॉपिंग तंत्राचा वापर सर्वाधिक केला जातो. बाजारातील अनेक औषधांत अमली पदार्थ तयार करण्यासाठीची रसायने असतात. ती वेगळी करता येतात. परदेशात आणि भारतातही ही औषधे फक्त डॉक्टरांच्या निर्देशानुसार ग्राहकाला विकता येतात; पण भारतीय बाजारातील त्रुटी हेरून तस्कर एकाच चिठ्ठीद्वारे शहरातील अनेक दुकानांतून ही औषधे खरेदी करतात. कधी कधी औषधविक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायच प्रतिबंधित औषधे विकतात. हे तस्कर औषधे खरेदी करून त्यातील प्रतिबंधित रसायने वेगळी करतात. त्यानंतर ही रसायने परदेशात ड्रगनिर्मितीसाठी पाठविली जातात. तस्करांच्या या कार्यपद्धतीला ‘डॉक्टर शॉपिंग’ असे म्हटले जाते. तस्करांच्या या नव्या कार्यपद्धतीमुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणताही संबंध उरत नाही.

Story img Loader