गेल्या काही दिवसांपासून धर्म संसद आणि या धर्म संसदेत होणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांची चांगलीच चर्चा आहे. हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये एक सभा पार पडली. आयोजकांनी याला ‘धर्म संसद’ असं नाव दिलं होतं. या सभेसाठी देशभरातील मठ आणि मंदिरांचे प्रमुख सहभागी झाले होते. एकूण १५० सहभागी व्यक्तींमध्ये सुमारे ५० महामंडलेश्वर देखील होते. हरिद्वारमधील वेद निकेतन धाममध्ये झालेली ही धर्म संसद जुना आखाड्याचे यती नरसिंहानंद गिरी यांनी आयोजित केली होती. या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात नेमकं काय घडलं.
हरिद्वारमध्ये द्वेषपूर्ण भाषण…
१७ ते १९ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या सभेनंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली. या सभेमध्ये मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषणं केली गेली. नरसंहार आणि मुस्लिमांविरुद्ध शस्त्रे वापरण्याच्या खुले आवाहन या सभेत करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी कथितरीत्या प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे करून अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांच्या हत्येचे आवाहन केले होते.
भाजपा नेत्यांची उपस्थिती…
या सभेमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा १८ डिसेंबरला उपस्थित होते. तसेच दिल्ली भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिकही उपस्थित होते.
हरिद्वारमध्ये झालेली भाषणं..
“२०२९मध्ये मुस्लीम पंतप्रधान नको”
या सभेचा विषय २०२९मध्ये देशाचं पंतप्रधानपद मुस्लीम व्यक्तीकडे असेल, हा असल्याचं नरसिंहानंद यांनी सांगितलं. “२०२९मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी मुस्लीम व्यक्ती असेल, हाच या सभेचा विषय होता. हा कोणताही निराधार विचार नाही. ज्यांना लोकसंख्येचं गणित कळतं, त्यांना हे माहिती आहे. ज्या पद्धतीने मुस्लीम लोकसंख्या वाढतेय आणि आपली लोकसंख्या घटतेय, येत्या सात ते आठ वर्षांत रस्त्यांवरून फक्त मुस्लीमच फिरताना दिसतील”, असं नरसिंहानंद म्हणाले होते.
फक्त १० टक्के हिंदू राहतील..
दरम्यान, येत्या २० वर्षांत देशात फक्त १० टक्के हिंदू राहतील, असा दावा देखील नरसिंहानंद यांनी केला होता. “इस्लामचा इतिहास पाहाता पुढील २० वर्षांमध्ये ५० टक्के हिंदूंचं धर्मांतर झालेलं असेल आणि ४० टक्के हिंदूंची हत्या केली जाईल. फक्त १० टक्के हिंदू शिल्लक राहतील, जे अमेरिका, कॅनडा, लंडन आणि युरोप किंवा संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयाला असतील. कुठेही मठ, मंदिर नसतील”, असा वादग्रस्त दावा नरसिंहानंद यांनी केला होता.
अधिक चांगली शस्त्रास्त्र हवीत
दरम्यान, या सभेत बोलताना त्यांनी आता अधिक चांगली शस्त्र हवीत, असं देखील म्हटलं होतं. “तलवारी विसरा, त्या फक्त शोकेसमध्ये ठेवल्या जातील. आता अधिक चांगल्या शस्त्रांनी लढा दिला जाईल. फक्त चांगली शस्त्रच तुम्हाला वाचवू शकतील. शास्त्रमेव जयते”, असं नरसिंहानंद आपल्या भाषणात म्हणाले होते.
दरम्यान, हरिद्वारमधील सभेत झालेल्या भाषणांचा वाद संपला नसताना रायपूरमध्ये झालेल्या सभेत आलेल्या धर्मगुरूंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
रायपूरमध्ये धर्मसंसदेत काय घडलं?
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्याचा आणि नथुराम गोडसेचे कौतुक केल्याचा आरोप या कार्यक्रमाबाबत करण्यात आला आहे.
कालीचरण महाराजांचं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य..
छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात कालीचरण महाराज आणि उपस्थित अन्य काही जणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्या. तसंच गांधींजींची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचे आभार मानल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर या संसदेदरम्यान नथुराम गोडसेचं कौतुकही करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम..
रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री भूपेश बघेल अचानक या कार्यक्रमातून निघून गेले. “चिथावणीखोर आणि हिंसक गोष्टी इथे खपवून घेतल्या जात नाहीत. राष्ट्रपिताविषयी अशा गोष्टी बोलल्याने त्यांची मानसिक स्थिती काय आहे हे निश्चितच दिसून येते. त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. याप्रकरणी कठोरात कठोर पाऊल उचलले जाईल ते उचलले जाईल,” असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.
कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल..
कालीचरण महाराज यांच्या विधानानंतर संसदेचे निमंत्रक दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनी विरोध करत स्वतःला या धर्मसंसदेपासून दूर केलं. या धर्मसंसदेचा उद्देश फळाला न आल्याचंही ते म्हणाले. दरम्यान नंतर कालीचरण यांच्या विरोधात रविवारी रात्री उशिरा आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र..
हरिद्वार धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमण यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी सरन्यायाधिशांना धर्मसंसदेच्या नावाखाली झालेल्या द्वेषपूर्ण भाषणांची दखल घेण्याची विनंती केली आहे. १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या सभेत देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या आणि जातीय सलोख्याच्या विरोधात सातत्याने भाषणे झाली. अल्पसंख्याकांच्या विरोधात शस्त्र उचलण्याचीही चर्चा होती असे वकिलांनी म्हटले आहे.