उत्तर प्रदेशमध्ये आयोजित महाकुंभचा आज १५ वा दिवस आहे. महाकुंभ मेळ्यात आज धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन सेक्टर १७, शांती सेवा शिबिर येथे दुपारी १२ वाजल्यापासून करण्यात आले आहे. ही धर्म संसद वाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यंदाच्या संसदेत सनातन बोर्डाची मागणी हा चर्चेचा प्रमुख विषय असणार आहे, ज्यावर देशभरातून आलेले साधू-संत चर्चा करतील. महाकुंभ मेळ्यात धर्म संसदेचे महत्त्व आहे, कारण प्रत्येक कुंभ मेळ्यात याचे आयोजन केले जाते. धर्म संसद म्हणजे नक्की काय? त्याचे स्वरूप कसे असते? त्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? त्याविषयी जाणून घेऊ.

धर्म संसद म्हणजे काय?

धर्म संसदचा शब्दशः अर्थ धार्मिक संसद असा होतो. हे हिंदू धर्मगुरू किंवा संतांचे व्यासपीठ आहे, जिथे धर्मासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय घेतले जातात, धर्माशी निगडीत मुद्द्यांवर विचारविनिमय केला जातो. १९८४ मध्ये नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) पहिली धर्म संसद आयोजित केली होती, जिथे राम जन्मभूमी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

_sex parties at davos
सेक्स पार्टी अन् नऊ कोटींमध्ये मुलींची बुकिंग; दावोस परिषदेदरम्यानचा धक्कादायक अहवाल समोर, प्रकरण काय?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
new pamban bridge
समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?
Torres Scam
Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Amit Shah maha kumbh ANI
Maharashtra Breaking News Updates : महाकुंभ : अमित शाहांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
धर्म संसदचा शब्दशः अर्थ धार्मिक संसद असा होतो. हे हिंदू धर्मगुरू किंवा संतांचे व्यासपीठ आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?

१९८५ मध्ये उडुपी येथे झालेल्या पुढील धर्म संसदेत आठ ठराव पारित करण्यात आले, त्यापैकी एकात श्री राम जन्मभूमी, श्री कृष्ण जन्मस्थान आणि काशी विश्वनाथ परिसर हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. एखादी धर्मविषयक समस्या सोडवायची असल्यास मोठ्या धर्मगुरूंना चर्चेसाठी बोलावले जाते. यात शास्त्र संमतीने निर्णय घेतले जातात. विहिंपच्या धर्म संसदांना त्याचे मार्गदर्शक मंडळ, देशभरातील ६५ प्रमुख संतांच्या मंडळांना बोलावले जाते. जेव्हा जेव्हा संतांच्या मतांची, हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्याची गरज भासते, तेव्हा तेव्हा प्रमुख धर्मगुरूंना बोलावले जाते.

मार्गदर्शक मंडळ सहभाग ठरवते, ज्यात आखाड्यातील संतांचा समावेश असतो. हे संत स्वतः सहभागी होऊ शकतात किंवा त्यांचे प्रतिनिधी संसदेत पाठवू शकतात. विहिंपचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणाले की, परिषदेने आत्तापर्यंत १७ धर्म संसदांचे आयोजन केले आहे. या धर्म संसद म्हणजे संतांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नियमित आयोजित केल्या जाणाऱ्या बैठका आहेत. ‘विहिंप’ची शेवटची धर्म संसद २०१९ मध्ये हरिद्वार येथे झाली. त्या बैठकीत संतांनी उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यास सांगितले होते.

विहिंप आणि इतर संसद

वर्षानुवर्षे नवीन संघटनांनी त्यांच्या स्वतःच्या धर्म संसदांना बोलावले आहे, ज्याला विहिंपने स्पष्टपणे मान्यता दिली आहे. जैन यांच्या मते, विहिंपने १९८४ मध्ये पहिली धर्म संसद आयोजित केली असताना कोणीही धर्म संसद आयोजित करू शकतो, असे स्पष्ट केले होते. नवीन परंपरा आणि पद्धतींचा विकास हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. “जर इतर कोणी ही पदवी वापरत असेल तर त्यामुळे विहिंपच्या धर्म संसदेची प्रतिष्ठा आणि गौरव कमी होत नाही,” असेही त्यांनी सांगितले.

मात्र, जैन यांनी हरिद्वारच्या बैठकीतून आपली संघटना वेगळी असल्याचे सांगितले. “ती विहिंपची धर्म संसद नव्हती. विहिंपने धर्म संसद या शब्दाचे पेटंट घेतलेले नाही, परंतु विहिंपची भाषा कोणती आणि कोणती नाही हे संपूर्ण देशाला समजले आहे,” असे ते म्हणाले. यती नरसिंहानंद हे व्हीएचपीच्या मार्गदर्शक मंडळात नव्हते आणि ते कधीही व्हीएचपीच्या व्यासपीठावरून बोलले नव्हते, असेही जैन यांनी सांगितले.

प्रत्येक आखाड्याची संसद

जुना आखाड्याचे अध्यक्ष प्रेम गिरी महाराज यांनी धर्म संसदेची व्याख्या फक्त संतांची सभा अशी केली आणि सांगितले की, प्रत्येक आखाडा नियमितपणे स्वतःची धर्म संसद आयोजित करतो. “जर एखाद्या महामंदडलेश्वराने २००-४०० अनुयायांची सभा घेतली आणि उपदेश केला, तर ती देखील एक धर्म संसद आहे,” असे ते म्हणाले. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी म्हणाले की, धर्म संसदांचा उद्देश सनातन धर्म आणि भगवद्गीता आणि रामायणातील संदेशाचा प्रसार करणे आहे. रवींद्र पुरी म्हणाले की, त्यांनी हरिद्वारमध्ये आयोजित केलेल्या धर्म संसदेला विरोध केला, कारण धर्म संसद हे राजकीय व्यासपीठ असू नये. ते कोणाच्याही विरोधात नसावे आणि त्यात सकारात्मक विचार आणि सकारात्मक संदेश असावा.”

यंदाच्या धर्म संसदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

प्रयागराज येथील महाकुंभात विश्व हिंदू परिषदेची धर्म संसद वादळी ठरणार आहे. या बैठकीत प्रमुख आखाडे सनातन मंडळाच्या स्थापनेसाठी दबाव आणण्यासाठी, वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भूमिका घेण्याची शक्यता आहे. विहिंपच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, वक्फ बोर्ड रद्द करण्याचा प्रस्तावही धर्म संसदेत येणार आहे. “वक्फ बोर्ड देशासाठी धोका आहे. वक्फ बोर्डाने सरकारी जमीन किंवा इमारतीवर वक्फ मालमत्ता म्हणून दावा केल्याची प्रकरणे वेळोवेळी उघडकीस आली आहेत,” असे विहिंपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. “वक्फ कायद्यातील दुरुस्ती पुरेशी नाही. आम्हाला वक्फ बोर्ड पूर्णपणे रद्द करायचे आहे,” असे ते पुढे म्हणाले.

धर्म संसदेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होण्याची अपेक्षा आहे, तो राज्य आणि उर्वरित देशातील मंदिर-मशीद वादाशी संबंधित असेल. अलीकडेच, भागवत यांनी डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात ‘इंडिया- द विश्वगुरू’ या विषयावर व्याख्यान देताना म्हटले होते की, अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामानंतर काही लोकांच्या मनात असे होते की ते हिंदूंचे नेते होऊ शकतात, त्यामुळे त्यांनी मंदिर-मशीद वाद वाढवला आणि सांगितले की हे अस्वीकार्य आहे.

हेही वाचा : जगातील सर्वांत मोठा हिमखंड ‘या’ बेटावर धडकणार? याचे परिणाम किती विध्वंसक?

सर्वसमावेशक समाजाचे समर्थन करताना भागवत म्हणाले की, जगाला हे दाखविण्याची गरज आहे की लोक एकोप्याने एकत्र राहू शकतात. परंतु, हिंदू धर्मगुरूंचा एक भाग स्वयंसेवक प्रमुखांच्या दृष्टिकोनाच्या विरोधात आहे, त्यामुळे प्रयागराज येथील धर्म संसदेत या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. मंदिर-मशीद वादाच्या वादग्रस्त मुद्द्यावर भागवतांच्या दृष्टिकोनाच्या विरोधात स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेली विहिंप काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader