मुसळधार पावसामुळे सध्या हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे रविवारपासून (२५ जून) मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी आकस्मिक पूर आला आहे, तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील पांडोह-कुल्ली मार्गावरील खोंतिनल्लाह या भागात आस्कमिक पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे या भागात प्रवासी अडकून बसले आहेत. दरम्यान, पूर आणि आकस्मिक पूर यात काय फरक आहे? आकस्मिक पूर येण्याचे कारण काय? हे जाणून घेऊ या…

हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती

हिमाचल प्रदेशमधील कांगरा, मंडी, सिरमौर या जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासह मंगळवारपर्यंत आकस्मिक पूर येणार नाही, असेही सांगितले होते.

Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

आकस्मिक पूर म्हणजे काय?

एखादा विशिष्ट ऋतूत मुसळधार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे विशेषत: पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचू शकते. परिणामी पूर येण्याचा धोका वाढतो. आकस्मिक पूरदेखील अशाच परिस्थितीत येतो. मात्र अगदी कमी कालावधित आलेल्या पुराला आकस्मिक पूर म्हटले जाते. हा पूर कोणतीही कल्पना नसताना येतो. अमेरिकन हवामान संस्था नॅशनल वेदर सर्व्हिसने आकस्मिक पुराबाबत अधिक माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे ६ तासांच्या आत पूर आल्यास त्याला आकस्मिक पूर म्हणावे, असे या संस्थेने सांगितले आहे. मुसळधार पावसाव्यतिरिक्त अन्य कारणांमुळेही आकस्मिक पूर येऊ शकतो.

भारतात बहुतांशवेळा ढगफुटी, अचानकपणे आलेला मुसळधार पाऊस यामुळे आकस्मिक पुराची स्थिती निर्माण होते. हीमनद्या वितळल्यामुळे सरोवरे ओसंडून वाहण्याची शक्यता असते. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांना तुलनेने आकस्मिक पुराचा धोका अधिक असतो. मागील काही वर्षांपासून तर या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे.

भूस्खलानाची मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणे

अनेकवेळा आकस्मिक पुरामुळे भूस्खलनाच्या घटना घडतात. भूस्खलनामुळे दगड, खडक माती उतारावरून थेट खाली येतात. पर्वतीय प्रदेशांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित कारणांमुळे भूस्खलनाच्या घटना घडतात. पाऊस, भूकंप, बर्फ वितळणे, पुरामुळे उतार निर्माण होणे ही भूस्खलनाची काही नैसर्गिक कारणे आहेत. तर उत्खनन, वृक्षतोड, पायाभूत सुविधांचा अमर्याद विकास, प्रमाणाच्या अधिक गुरांना चारा देणे अशी भूस्खलनाची मानवनिर्मित कारणे आहेत. भारत हा सर्वाधिक भूस्खलन होणाऱ्या देशांपैकी एक आहे.

ज्या ठिकाणी नद्या अरुंद असतात, त्या ठिकाणी आकस्मिक पूर येण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भगात लोकसंख्येची घनता अधिक असते. येथे लोक दाटीवाटीने राहतात. याच कारणामुळे शहरातील काही भागात नद्या अरुंद असतात. परिणामी ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात आसस्मिक पुराचा धोका अधिक असतो.

भारतात आकस्मिक पूर, पुराच्या घटनांचे प्रमाण किती?

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका अभ्यासानुसार बांगलादेशनंतर भारतात पुराच्या सर्वाधिक घटना घडतात. पुरामुळे झालेल्या जगातील एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे एकट्या भारतात होतात. चेन्नई आणि मुंबई शहरांत आकस्मिक पुराचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश अशा किनारी प्रदेशातील राज्यांत आस्मिक पूर येण्याचे प्रमाण अधिक आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही (NDMA) आकस्मिक पुराची काही कारणे सांगितली आहेत. देशात वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी साधारण ७५ टक्के पाऊस हा पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यांत पडतो. यामुळे देशातील अनेक नद्यांना या काळात पूर आलेला असतो. पुराममुळे साधारण ४० दशलक्ष हेक्टर जमिनिला पुराचा फटका बसण्याची शक्यता असते. या पुरामुळे प्रत्येक वर्षी १८.६ दशलक्ष हेक्टर जमीन पुरामुळे प्रभावित होते. भविष्यात आकस्मिक पूर येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या आगीमुळे वृक्ष तसेच इतर वनस्पती नष्ट होत असून जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होत आहे. परिणामी भविष्यात आकस्मिक पुराच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आकस्मिक पुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी काय करायला हवे, याबाबत भारतीय ग्लेशियोलॉजिस्ट सय्यद इक्बाल हसनैन यांनी सांगितले आहे. आकस्मिक पुरासारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डोंगराळ भागाची देखरेख करायला हवी. संवेदनशीलपणे विकासकामांचे नियोजन करायला हवे, असे हसनैन यांनी सांगितले.