उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये डिजिटल रेपचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षांपासून कथित ‘डिजिटल रेप’ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांपासून एका १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेप केल्याचा आरोप व्यक्तीवर आहे. मॉरिस रायडर असे आरोपीचे नाव आहे. मात्र, आधी डिजिटल बलात्कार म्हणजे काय हे समजून घेऊया?
‘डिजिटल रेप’ म्हणजे काय?
‘डिजिटल रेप’च्या घटनांमध्ये स्त्री किंवा मुलीसोबत बळजबरीने सेक्स करताना बोटे, अंगठा किंवा प्रजनन अवयवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूचा वापर केला जातो. डिजिटल म्हणजे संख्या. बोट, अंगठा, पायाचे अंगठे यांसारखे शरीराचे अवयव देखील डिजिट म्हणून संबोधले जातात. निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी डिजिटल बलात्कारामध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०१२ पर्यंत ‘डिजिटल रेप’ बलात्काराच्या कक्षेत येत नव्हते. निर्भया सामूहिक बलात्कारानंतर भारतातील लैंगिक गुन्ह्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले. ज्यामुळे देशातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. आता डिजिटल रेप गुन्ह्यांची व्याप्ती बलात्कार मानली जाते.
काय आहे गुन्हा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. आई वडील जवळपास २० वर्षांपासून आरोपीला ओळखतात. सुरुवातीला भीतीमुळे तरुणीला फिर्याद देता आली नाही. मात्र, नंतर त्यांनी या प्रकरणातील संशयिताच्या हालचाली नोंदवण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावर पुरावे गोळा केले. मुलीने आपला त्रास पालकांना सांगितला आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी एका कलाकार-सह-शिक्षकाला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर ३९ चे एसएचओ राजीव कुमार यांनी पीटीआयला सांगितले, “मुलगी येथे तिच्या पालकासोबत राहते. मुलीचे पालक २० वर्षांपासून आरोपीला ओळखतात. याप्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केली होती. अटकेनंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.”
डिजिटल रेपसाठी काय आहे शिक्षा?
भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार, डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची असू शकते
डिजिटल रेप ३७६ अंतर्गत येण्यापूर्वी घडलेले दोन गुन्हे
- दोन वर्षांच्या मुलीसोबत डिजिटल रेप: एका दोन वर्षीय मुलीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या योनीमध्ये बोटांचे ठसे आढळून आले. मात्र, या काळात लैंगिक छळ किंवा बलात्काराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. तपासात असे निष्पन्न झाले की, तिचे वडीलच असे कृत्य करायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली, परंतु बलात्काराशी संबंधित असलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत शिक्षा किंवा आरोप लावण्यात आला नाही.
- ६० वर्षीय महिलेवर डिजिटल रेप: दिल्लीत एका ६० वर्षीय महिलेवर एका ऑटोरिक्षा चालकाने डिजिटल बलात्कार केल्याची घटना घडली होती. ६० वर्षीय महिला एका नातेवाईकाच्या घरी ऑटोमधून लग्न समारंभासाठी जात होती. यादरम्यान ऑटोचालकाने महिलेच्या योनीमध्ये लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पण त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले नाही.