Dinga Dinga Disease Symptoms Treatment जगभरात एकापाठोपाठ एक होणारे नवनवीन आजार चिंतेचे कारण ठरत असते. करोना महामारीने जगाला हादरवून सोडले होते. करोनानंतर आणखी एक नवीन आजार महामारीचे कारण ठरू शकते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती. या आजाराविषयी माहिती नसल्यामुळे याला ‘डिसीज एक्स’ असे नाव देण्यात आले होते. आफ्रिकेत या रहस्यमयी आजाराची प्रकरणे वाढत असतानाच आता युगांडामध्ये एका विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो लोक बहुतांश स्त्रिया आणि मुले हादरून गेली आहेत. या आजाराला ‘डिंगा डिंगा’, असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक बोलीभाषेमध्ये याचा अर्थ नृत्य करण्यासारखे थरथरणे, असा होतो.

हा एक गूढ आजार आहे; ज्यामुळे शरीर अनियंत्रित थरथरते आणि चालण्यात अडचणी येतात. अद्याप या आजारामुळे कोणाचाही कोणताही मृत्यू झाला नसला तरी आफ्रिकन देशात हा आजार वेगाने पसरत आहे. आरोग्य अधिकारी या आजाराच्या प्रसाराचे कारण शोधण्यासाठी महत्प्रयास करीत आहेत. असे स्थानिक माध्यम वाहिन्यांचे म्हणणे आहे. काय आहे डिंगा डिंगा आजार? त्याची लक्षणे काय? हा आजार नक्की आला कुठून? त्याविषयी जाणून घेऊ.

gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?
Mohanji Bhagwat expressed his concern about the decline in the country population
चारा नाही; तर चोचही नकोच!
30 bed updated ward at Thane District Hospital for treatment of Zika patients Mumbai print news
झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !

हेही वाचा : ‘हा’ देश भारतीयांना देणार व्हिसाशिवाय प्रवेश; विनाव्हिसा प्रवेशाचा फायदा काय? कोणते देश ही सुविधा देतात?

‘डिंगा डिंगा’ आजाराची लक्षणे काय?

युगांडाच्या बुंडीबुग्यो जिल्ह्यात या आजाराची प्रथम नोंद करण्यात आली. या विचित्र आजाराची अस्वस्थ करणारी विविध लक्षणे आहेत; ज्यामध्ये सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे नृत्यासारख्या हालचालींसारखे शरीराचे थरथरणे. त्याबरोबरच रुग्ण व्यक्तीमध्ये तीव्र ताप, अशक्तपणा आणि काही प्रकरणांत अर्धांगवायूसारखी लक्षणे दिसून येतात. स्थानिक माध्यम वाहिन्यांनुसार, या आजाराने प्रभावित झालेल्यांसाठी चालणे जवळजवळ अशक्य होते. कारण- शरीर अनियंत्रितपणे थरथरते आणि त्यामुळे चालणे शक्य होत नाही.

पेशन्स कटुसिमेने या रुग्णाने आजारपणाबद्दलचा तिचा वैयक्तिक अनुभव सांगितला. या आजाराची लागण झाल्यानंतर तिचे शरीर अनियंत्रित पद्धतीने थरथरू लागले, असे ती म्हणाली. “मला अशक्तपणा जाणवला. जेव्हा मी चालण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा माझे शरीर अनियंत्रितपणे थरथरत होते,” असे तिने युगांडाच्या वृत्तपत्र मॉनिटरला सांगितले. “ते खूप त्रासदायक होते. मला उपचारासाठी बुंदीबुग्यो रुग्णालयात नेण्यात आले आणि देवाचे आभार, मी आता बरी आहे,” असे ती पुढे म्हणाली. आतापर्यंत या आजाराची अंदाजे ३०० प्रकरणे फक्त बुंडीबुग्योमध्ये आढळून आली आहेत. २०२३ च्या सुरुवातीला आढळून आलेल्या या रोगाचा तपास अद्यापही सुरूच आहे. कारण शोधण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पुढील विश्लेषणासाठी नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

युगांडाच्या बुंडीबुग्यो जिल्ह्यात या आजाराची प्रथम नोंद करण्यात आली. (छायाचित्र-रॉयटर्स)

युगांडा आणि इतर पूर्व आफ्रिकन देशांमध्ये ‘एमपॉक्स’च्या नवीन स्ट्रेनची नोंद झाल्यानंतर काही महिन्यांनंतर ‘डिंगा डिंगा’ आजाराचा उद्रेक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अल्ट्रा-डेडली क्लेड १बी प्रकाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. ‘एमपॉक्स’ची नवीन स्ट्रेनची उदाहरणे युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये आढळली असून, इतर खंडांमध्येही या आजाराची प्रकरणे वाढत आहेत.

‘डिंगा डिंगा’ आजारांवर उपचार काय?

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, डिंगा डिंगा सामान्यत: सामुदायिक आरोग्य संघांद्वारे प्रदान केलेल्या प्रतिजैविकांनी उपचार करण्यायोग्य आहे. काही रुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्याच्या प्रयत्नात हर्बल उपचारांकडे वळले असताना, आरोग्य अधिकारी याला विरोध करताना दिसून येत आहेत. “हर्बल औषध या आजारावर उपचार करू शकते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही,” असे डॉ. क्रिस्टोफर यांनी सांगितले. “आम्ही विशिष्ट उपचार करीत आहोत आणि रुग्ण साधारणपणे एक आठवड्यात बरे होत आहेत. मी स्थानिकांना जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमधून उपचार घेण्याचे आवाहन करतो,” असे ते पुढे म्हणाले.

नोंदविलेल्या प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. असे असले तरी शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आशा आहे की, पुढील विश्लेषण लवकरच या रहस्यमय आजाराच्या कारणावर प्रकाश टाकेल. यादरम्यान स्थानिक आरोग्य सेवा हाय अलर्टवर आहेत, बाधितांवर सक्रियपणे उपचार करत आहेत आणि कोणत्याही संभाव्य नवीन प्रकरणांवर लक्ष ठेवत आहेत. या सर्व उपाययोजनांद्वारे आजाराची वाढती प्रकरणे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्येही रहस्यमयी आजार

युगांडामध्ये ‘डिंगा डिंगा’ची प्रकरणे वाढत असताना, त्याचा शेजारी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) आणखी एका रहस्यमय आजाराचा सामना करत आहे, ज्याला आफ्रिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनने ‘डिसीज एक्स’ म्हणून नाव देण्यात आले आहे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धापासून कांगो प्रांतातील पांझी आरोग्य क्षेत्रामध्ये अज्ञात आजाराची ४०६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दुर्दैवाने अधिकाऱ्यांनी किमान ७९ मृत्यूंची नोंद केली आहे. त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील मुले आहेत. ताप, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यात अडचण, नाक वाहणे ही या आजाराची गंभीर लक्षणे आहेत.

हेही वाचा : प्रियांका गांधींच्या संसदेतील बॅगेवरून नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

प्रयोगशाळेच्या चाचण्या सुरू आहेत आणि न्यूमोनिया, मलेरिया, गोवर व कोविड-१९ सारखे आजार याच्या संशयित कारणांपैकी आहेत. तज्ज्ञांनी या रोगाचा आणखी प्रसार होण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि हा आजार हवेद्वारे पसरत असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे म्हटले आहे की, जागतिक धोका कमी आहे; परंतु सीमापार संक्रमणाची चिंता निर्माण झाली आहे. पुढील चाचणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. परंतु, प्रदेशातील दुर्गमता, सुरक्षा आव्हाने व मर्यादित आरोग्य पायाभूत सुविधांमुळे प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

Story img Loader