भारतात प्रथमच १२० सेकंदांसाठी सक्रिय थंड स्क्रॅमजेट कम्बस्टरची जमिनीवर यशस्वी चाचणी घेऊन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ध्वनीहून पाचपट वेगाने झेपावणाऱ्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाचा टप्पा गाठला. हायपरसॉनिक तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर कुठेही अल्पावधीत हल्ला चढविणे, उपग्रहविरोधी मोहीम साध्य करण्याची क्षमता देऊ शकते. याचा धोरणात्मक फायदा घेण्यासाठी अनेक राष्ट्रे पुढे सरसावली आहेत.

चाचणीचे स्वरूप

डीआरडीओच्या हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल) हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्क्रॅमजेट कम्बस्टरच्या चाचणीत हायपरसॉनिक वाहनांमध्ये यशस्वी प्रज्वलन आणि स्थिर ज्वलन यांसारख्या कार्यात्मक वापरासाठी त्याची क्षमता अधोरेखित झाली. स्क्रॅमजेट इंजिनातील प्रज्वलन हे चक्रीवादळात मेणबत्ती पेटविण्यासारखे आहे. यामध्ये ज्योत स्थिरीकरण तंत्र समाविष्ट आहे, जे कम्बस्टरमध्ये दीड किलोमीटर प्रति सेकंदपेक्षा जास्त हवेचा वेग असताना ज्योत सतत तेवत ठेवते. जमिनीवरील चाचणीतून अनेक नवीन, आश्वासक प्रज्वलन व स्थिर ज्वलन तंत्राचा अभ्यास केला गेला. स्क्रॅमजेट ही हायपरसॉनिक वाहनांची गुरुकिल्ली मानली जाते. कोणत्याही हालचाल करणाऱ्या सुट्या भागांचा वापर न करता ते सुपरसॉनिक वेगात ज्वलन टिकवून ठेवण्यास सक्षम असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. पुढील पिढीतील हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात जमिनीवरील यशस्वी चाचणी हा महत्त्वाचा टप्पा आहे.

udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?
biggest iceberg in the world
जगातील सर्वांत मोठा हिमखंड ‘या’ बेटावर धडकणार? याचे परिणाम किती विध्वंसक?
India Beat England by 2 Wickets Tilak Varma Fifty Ravi Bishnoi Washington Sundar
IND vs ENG: भारताचा विजयी ‘तिलक’, नाट्यमय लढतीत इंग्लंडवर केली मात; बिश्नोईची साथ ठरली निर्णायक
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

हायपरसॉनिक मोहिमेसाठी पायाभरणी

या चाचणीतील यश हायपरसॉनिक मोहिमांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणारे ठरणार आहे. कारण, यात देशात पहिल्यांदा निर्मिलेल्या ‘एंडोथर्मिक स्क्रॅमजेट’ इंधनाचा वापर करण्यात आला. हे इंधन शीतलीकरण आणि प्रज्वलन सुलभता असा दुहेरी लाभ देते. ध्वनीहून पाचपट वेगात मार्गक्रमण करताना प्रचंड उष्णता निर्माण होते. त्याचा सामना करण्यासाठी नव्याने प्रगत उष्णता प्रतिबंधक लेपन (टीसीबी) विकसित करण्यात आले, जे धातू वितळण्याच्या बिंदूच्या पलीकडे काम करते. स्क्रॅमजेट इंजिनच्या आत विशिष्ट पद्धतीने त्याचा मुलामा दिला जातो. यातून कार्यक्षमता व आयुष्यमान वाढवते, याकडे डीआरडीओ लक्ष वेधते. चार वर्षांपूर्वी हायपरसॉनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहनाची (एचएसटीडीव्ही) यशस्वी चाचणी घेण्यात आली. जलद प्रहार ते अतिजलद जागतिक प्रवासापर्यंतची क्षमता प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे.

प्रचंड वेग कसा मिळतो?

हायपरसॉनिक प्रणोदनाच्या केंद्रस्थानी स्क्रॅमजेट इंजिन आहे. येणारी हवा इंधनाने संकुचित व ज्वलन करून वाहनांना हायपरसॉनिक वेगाने प्रवास करण्यास सक्षम करते. स्क्रॅमजेट इंजिनचा वापर करून वाहनांना ‘माक’ – पाचपेक्षा (ध्वनीचा वेग १ ‘माक’ गृहित धरल्यास) जास्त वेगाने चालविण्याचा समावेश आहे. पारंपरिक टर्बोजेट इंजिनप्रमाणे स्क्रॅमजेट हवा आत घेऊन दाबते व इंधनात मिसळते. दाबामुळे तापमान वाढते आणि प्रज्वलन होते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रणोद निर्माण होतो. प्रचंड वेग मिळतो.

लष्करी उपयुक्तता

माक – पाचपेक्षा जास्त वेगाने प्रवास करण्यास सक्षम सुपरसॉनिक वाहने अनेक क्रांतिकारी क्षमता देतात. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ५४०० किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त वेगाने प्रवास करतात. या प्रगत क्षेपणास्त्रांसमोर सध्याच्या हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ ठरतात. हे तंत्रज्ञान कमीत कमी वेळेत दूरच्या लक्ष्यांवर अचूक, मार्गदर्शित युद्धसामग्री तैनात करण्यास सक्षम करते. संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी लष्करी नियोजनकारांना लवचिक पर्याय उपलब्ध करते. अल्पावधीत अवकाशात पेलोड्स प्रक्षेपित करण्याची क्षमता लष्करी उपग्रह तैनाती, शोध व संप्रेषणासाठी कामी येऊ शकते. स्क्रॅमजेट प्रणोदनाने सुसज्ज हायपरसॉनिक वाहने उपग्रहविरोधी मोहिमांसाठी वापरली जाऊ शकतात. ही क्षमता अवकाशातील प्रभुत्व वाढवून लष्करी मालमत्तेवरील संभाव्य धोक्यांचा सामना करते.

वर्चस्वाची स्पर्धा का?

त्वरित जागतिक प्रहार, मागणीनुसार प्रक्षेपण व उपग्रहविरोधी मोहीम साध्य करण्याची क्षमता भू-राजकीय परिस्थितीला आकार देऊ शकते. अमेरिका, रशिया, चीनसह अन्य काही देश हायपरसॉनिक स्क्रॅमजेट तंत्राचा विकास आणि चाचणीत गुंतण्याचे हे कारण आहे. या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट वेगवान जागतिक हल्ल्याची क्षमता प्राप्त करण्याचे आहे. लष्करी तंत्रज्ञानातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्याचे आधुनिक युद्धावर दूरगामी परिणाम होतील. वर्चस्वाची स्पर्धा जशी वेगवान होईल, तसे जग युद्धाच्या नव्या उंबरठ्यावर येईल. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा प्रभाव लष्करी, नागरी व व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल.

Story img Loader