सध्या प्रत्येक चित्रपट हा वेगवेगळ्या भाषेत डब करून प्रदर्शित केला जातो. याला सध्या सामान्य माणसांच्या भाषेत ‘पॅन इंडिया चित्रपट’ म्हणतात. राजामौली यांच्या ‘बाहुबली’पासून हा प्रयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला आणि आजकाल तर प्रत्येक दूसरा चित्रपट हा ४ ते ५ भाषांमध्ये प्रदर्शित केला जातो. असं करण्यामागे प्रामुख्याने ३ कारणं आहेत, पहिलं म्हणजे चित्रपटात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, दुसरं म्हणजे वेगवेगळ्या भाषेत शूट करून तो प्रदर्शित करण्यापेक्षा डबिंग ही तसं कमी खर्चीक काम आहे, तिसरं म्हणजे सबटायटल्सपेक्षा आपल्या सोयीच्या भाषेतला डब चित्रपट पाहणं कधीही प्रेक्षक पसंत करतो. या ३ प्रमुख करणांमुळे चित्रपटाचं डबिंग केलं जातं.

डबिंग म्हणजे नेमकं काय?

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

चित्रपटाचं चित्रीकरण करताना इतर गोष्टींचा आवाज त्या फायनल आऊटपूटमध्ये येऊ नये यासाठी डबिंग हा पर्याय वापरतात. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं की त्यातील प्रत्येक कलाकाराला साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावलं जातं. एका साऊंड प्रूफ खोलीमध्ये त्याच्यासमोर त्याने अभिनय केलेले सीन्स लावले जातात आणि ते बघता बघता व्हिडिओ मॅच करून त्याचे संवाद त्याला पुन्हा रेकॉर्ड करावे लागतात. खरंतर हे खूप कठीण काम आहे, कारण एकदा दिलेला सीन पुन्हा त्याच ताकदीने द्यायचा असतो त्यामुळे डबिंगमध्ये प्रत्येक कलाकाराने पारंगत असणं गरजेचं असतं. समजा एखादा कलाकार यामध्ये कमी पडत असेल तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या डबिंग आर्टिस्टला घेऊन रे रेकॉर्डिंग पूर्ण होतं.

आणखी वाचा : ‘राम सेतु’ला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद; अक्षयच्या आधीच्या चित्रपटांपेक्षाही कमी झालं ॲडव्हान्स बुकिंग

एकदा रेकॉर्डिंग पूर्ण झालं की संकलक व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही जोडून त्याचं फायनल आऊटपूट दिग्दर्शकाकडे सुपूर्त करतो. चित्रपट शूट करताना ‘सिंक साऊंड सिस्टम’सुद्धा बऱ्याचदा वापरली जाते. ‘लगान’सारख्या चित्रपटात हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. ‘सिंक साऊंड’ म्हणजे एक असं तंत्रज्ञान ज्यामध्ये चित्रीकरण करताना अभिनेत्याचे संवाददेखील त्याच्या अभिनयाबरोबर रेकॉर्ड केले जातात. डबिंगचं तंत्रज्ञान प्रगत होण्याआधी हे तंत्रज्ञान वापरलं जायचं आणि जे प्रचंड खर्चीकही होतं. यामुळे डबिंगची मेहनत थोडी कमी व्हायची पण पूर्णपणे या तंत्रज्ञानावर कधीच कुणाला अवलंबून राहता आलेलं नाही.

वेगळ्या भाषेतील डबिंग कसं होतं?

एखाद्या चित्रपटाला तुम्ही हव्या त्या आणि हव्या तेवढ्या भाषेत आता डब करू शकता. त्यासाठी मूळ चित्रपटाची स्क्रिप्ट त्या त्या भाषेत पुन्हा लिहावी लागते. अगदी भाषांतर वाटू नये याची काळजीही लेखकांना घ्यावी लागते. डबिंगसाठी लिखाण करणारे कलाकारही वेगळे असतात. एखादा हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब करायचा असेल तर मराठी भाषेतील प्रत्येक बारीक गोष्टीचा उपयोग या लिखाणात कसा करता येईल याकडे लक्ष दिले जाते. सामान्य माणसाला ते बघताना कुठेही खटकणार नाही याची काळजीही घेतली जाते. मूळ कथेला कुठेही धक्का न लावता त्याचे पुन्हा लिखाण पार पडते.

त्यानंतर मूळ चित्रपटातील कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्या पात्राला साजेसा असा आवाज देण्यासाठी वेगवेगळ्या डबिंग आर्टिस्टची ऑडिशन घेतली जाते. कधीकधी मूळ चित्रपटातील कलाकार हे डबिंगमध्ये पारंगत असल्याने ते स्वतःच स्वतःच्या पात्राचं डबिंग करतात तर कधी कधी बाहेरून कलाकारांची मदत घ्यावी लागते. ‘बाहुबली’मध्ये मुख्य पात्राला हिंदीमध्ये शरद केळकर यांनी आवाज दिला आहे त्यांची निवड याच निकषानुसार केली गेली आहे. जसं अभिनय ही एक कला आहे तशीच डबिंग हीसुद्धा एक कलाच आहे, त्यासाठीसुद्धा अभिनयाप्रमाणे प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं आणि पाठवलं इतकं सोप्पं काम नाही.

नुकताच आलेला ‘कांतारा’ हा लोकप्रिय ठरला आणि मग तो हिंदी आणि तेलुगूमध्ये डब केला गेला. ‘हर हर महादेव’ हा पहिला मराठी चित्रपट आहे जो अशापद्धतीने ४ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’नेही तेलुगू आणि तामीळमध्ये चांगली कामगिरी केली. ‘बाहुबली’. ‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘आरआरआर’ या चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर सध्या बहुतेक बिग बजेट चित्रपट अशाच पद्धतीने जगभरात प्रदर्शित होताना दिसत आहेत. नेटफ्लिक्स आणि तत्सम ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर इंग्रजी, स्पॅनिश, जपानी, कोरियन, इस्राईली अशा वेगवेगळ्या कलाकृती प्रादेशिक भाषांमध्ये डब केल्या जात आहेत आणि त्यामुळेच त्यांची जगभर चर्चादेखील होत आहे. आधी केवळ इंग्रजी चित्रपटांचं डबिंग व्हायचं आणि त्याला जास्त प्रेक्षक पसंती द्यायचे, पण आज लोकांना जगातील जेवढा शक्य होईल तेवढा कंटेंट त्यांच्या सोयीच्या भाषेत बघायचा आहे, आणि यामुळेच ‘डबिंग’ या क्षेत्राला सध्या सर्वात जास्त मागणी आहे. लोकं केवळ मनोरंजनाची सोय म्हणून नाही तर याकडे रोजगार निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणूनही बघत आहेत.

Story img Loader