What is Duchenne Muscular Dystrophy: अभिनेत्री काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर १४ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये ‘सलाम वेंकी’बाबत उत्सुकता वाढली होती. ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट आई व मुलाच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटात सुजाता (काजोल) व तिचा मुलगा वेंकी (विशाल जेठवा) यांचं नातं दाखवण्यात आलं आहे. वेंकीला कधीही बरा न होणाऱ्या ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी नावाच्या एका आजाराची लागण होते. हा आजार वेंकीला मरणाच्या दिशेने घेऊन जाणारा असतो. पण या परिस्थितीला त्याची आई मात्र मोठ्या हिंमतीने सामोरी जाते. वेंकीला लागण झालेला हा ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणे कोणती, उपचार पद्धती कोणत्या याबद्दल जाणून घेऊयात.

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी काय आहे?

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी (Duchenne Muscular Dystrophy) हा स्नायूंवर परिणाम करणारा अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे स्नायूंच्या पेशींमध्ये डिस्ट्रोफिन नावाच्या प्रथिनाचे उत्पादन कमी होते किंवा त्याचे उत्पादन पूर्णपणे थांबते. यामुळे स्नायू काम करू शकत नाहीत. तसेच दीर्घकाळापर्यंत हीच स्थिती राहिल्यास ते पूर्णपणे खराब होऊ शकतात. हा आजार शरीराच्या कोणत्याही भागाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो प्रभावित भाग पूर्णपणे खराब होऊ शकतो.

Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

पुरुषांना जास्त प्रमाणात होतो हा आजार

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी हा एक दुर्मिळ आजार आहे. हा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांना होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याची लक्षणे ३ ते ५ वर्षांच्या वयात दिसू लागतात. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्रास होत नाही. पण वाढत्या वयात त्याचे हळूहळू परिणाम दिसू लागतात. कालांतराने ती व्यक्ती कोणतीही शारीरिक हालचाल करू शकत नाही.

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी कशामुळे होतो?

प्रथिनांची कमतरता – डिस्ट्रोफिन नावाची प्रथिनं प्रामुख्याने माणसाच्या स्नायूंमध्ये आढळतात. त्याच्या कमतरतेमुळे ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी आजार होऊ शकतो.

कौटुंबिक इतिहास – जर आई किंवा वडिलांना हा आजार आधीच असेल तर तो दोषपूर्ण जनुकामुळे मुलाना देखील होऊ शकतो. ज्यात मुलांना त्यांच्या कौटुंबिक इतिहासामुळे हा आजार होण्याचं प्रमाण सुमारे ५०% आहे.

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीची लक्षणे कोणती?

  • थकवा जाणवणे
  • शिकण्यात अडचणी येत असल्याने, मुलांची IQ पातळी ७५ पेक्षा कमी असू शकते.
  • मुलामध्ये बौद्धिक अपंगत्व येतं. मूल वारंवार प्रयत्न करूनही नवीन शिकू आणि करू शकत नाही.
  • पाय, हात आणि मानेचे स्नायू कमजोर होतात.
  • मुलांना धावणे, उडी मारणे किंवा इतर कोणतीही शारीरिक हालचाल करण्यात अडचण येणे.
  • वारंवार पडणे
  • झोपणे, उठणे किंवा चालण्यात अडचण येणे.
  • पायऱ्या चढताना त्रास होणे.
  • हृदयातील स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होणे.
  • पायात सूज येणे
  • स्नायूंची ताकद हळूहळू कमी होणे.
  • हृदयविकार होणे.

वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून या आजाराची लक्षणं दिसू लागतात. या आजाराने ग्रस्त मुलं १२ वर्षांची होईपर्यंत पूर्णपणे चालण्यास अक्षम होऊ शकतात. त्यांना व्हीलचेअर वापरावी लागते. यासह २०व्या वर्षांपासून त्यांना धाप लागणे आणि हृदयविकाराची गंभीर लक्षणंही दिसू लागतात.

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीवरील उपचार

ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी बरा करण्यासाठी कोणताही यशस्वी उपचार नाही. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि काही औषधांच्या मदतीने त्याची लक्षणं काही प्रमाणात कमी करता येतात.

स्टिरॉइड औषधे – ही औषधे घेतल्याने स्नायूंचं होत असलेलं नुकसान कमी करता येऊ शकतं. यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि त्यांची कार्य करण्याची क्षमता कायम ठेवता येते.

इतर औषधे – याशिवाय डॉक्टर श्वासोच्छवासाच्या समस्या कमी करण्यासाठी दमा आणि इतर श्वसन उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा वापर करण्याची शिफारस देखील करू शकतात.

माशांचं तेल – काही रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर आहारात माशांचं तेल म्हणजेच फिश ऑइल वापरण्याची शिफारस करू शकतात. यामध्ये ओमेगा-३ असतं. ते हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं.

ग्रीन टी – ग्रीन टी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. त्याच्या अर्कांमधील अँटिऑक्सिडंट्स हृदयाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

उपकरणांचा वापर – ब्रेसेस आणि व्हील चेअर यासारखी ऑर्थोपेडिक उपकरणं शारीरिक हालचाली सुधारण्यासाठी वापरता येऊ शकतात.

शस्त्रक्रिया – काही रुग्णांच्या मणक्याच्या आणि छातीच्या हाडांच्या दुरुस्तीसाठी मणक्याच्या शस्त्रक्रियेचा पर्याय डॉक्टर निवडू शकतात.

Story img Loader