प्रसिद्ध दिग्दर्शक आर.बाल्की यांनी नुकतंच ‘चूप’ या चित्रपटातून कला साहित्य क्षेत्रात होणाऱ्या टीका आणि समीक्षणाबद्दल भाष्य केलं आहे. चित्रपटाची कथा ही एका अशा सिरियल किलरभोवती फिरते जो फक्त चित्रपट समीक्षकांना ठार मारत सुटला आहे. चित्रपटातून बाल्की यांनी एक वेगळाच थरार आपल्यासमोर मांडला आहे. शिवाय नकारात्मक समीक्षकण चित्रपटासाठी मारक ठरू शकतं असं भाष्यदेखील केलं आहे.

या महिन्याततच तामिळनाडू चित्रपट निर्माते परिषदेने चित्रपट समीक्षकांकडे विनंती केली आहे की चित्रापटाचं नकारात्मक समीक्षण हे प्रदर्शनाच्या ३ दिवसांनी करावं. याबरोबरच परिषदेने युट्यूबर्सना चित्रपटगृहाच्या आवारात चित्रपटाचा रिव्यू शूट करू देऊ नये अशी विनंती चित्रपटगृहाच्या मालकांकडे केली आहे. याबद्दल बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही विनंती केली होती, अक्षय म्हणाला होता, “जर चित्रपट वाईट असेल तर त्याबद्दल वाईट लिहायची एवढी घाई का करावी? चित्रपट जर आपटणारच असेल तर त्याला आणखीन का खाली पाडावं?” चित्रपट समीक्षकण हे कसं असावं आणि ते का गरजेचं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

चित्रपटावर होणारी टीका म्हणजे काय?

चित्रपटाची टीका ही त्या चित्रपटाच्या विषयाबद्दलचं विश्लेषण आणि त्यावर आधारीत केलेला चित्रपटाचं मूल्यमापन होय. यासाठी चित्रपटाबद्दल अधिक माहिती आणि त्या माध्यमाची समज या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. “समीक्षकांचं मानसशस्त्र आणि मानसशास्त्रीय समीक्षण” या लेखात फिलिप वेसमन यांनी स्पष्ट केलं आहे, प्रत्येक समीक्षकाने त्या क्षेत्रातील जाणकार म्हणून या गोष्टीकडे पाहायला हवं.

आणखी वाचा : विश्लेषण : अपयश पचवू न शकलेले गुरु दत्त आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न, जाणून घ्या

टीका आणि समीक्षकण यातला फरक काय?

इंडियन एक्स्पप्रेसच्या ज्येष्ठ सिनेसमीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी यामधील नेमका फरक स्पष्ट केला आहे, चित्रपट समीक्षकांनी चित्रपटसृष्टीमधील कारभार फार जवळून अनुभवलेला असतो, त्यामुळे त्यांना यातले खाच खळगे ठाऊक असतात. चित्रपट समीक्षक हे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून चित्रपट पाहतात आणि तो पहावा का पाहू नये याबद्दल प्रेक्षकांना सल्ला देतात. पण सर्वात योग्य समीक्षक चित्रपटाच्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मांडतात. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा की पाहू नये या गोष्टीवर ते जास्त भर देत नाहीत. समीक्षकाला सर्व कलाक्षेत्रातलं पुरेसं ज्ञान असायला हवं आणि सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या बाबतीत त्यांनी सजग असायला हवं अशी माझी अपेक्षा आहे.”

समीक्षण चित्रपटाला मारक ठरतं का?

समीक्षण हे चित्रपटांसाठी मारक ठरतं हा आरोप बऱ्याचदा केला जातो. यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही विपरीत परिणाम होतो. शिवाय सोशल मीडियावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे ट्रोलिंगचं प्रमाणही वाढतं. शिवाय या सगळ्याला चित्रपटसृष्टीत असलेली स्टार परंपराही कारणीभूत आहे असंही म्हंटलं जातं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘भूलभुलैया २’ या चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश. या चित्रपटाचंही बरंच नकारात्मक समीक्षण समोर आलं होतं, तरी केवळ कार्तिक आर्यनच्या फॅनबेसमुळे चित्रपटाच्या कमाईत चांगलाच फरक पडला. तामीळ सुपरस्टार थलापती विजयच्या ‘बीस्ट’ चित्रपटाच्या बाबतीतसुद्धा हेच निरीक्षण समोर आलं.

आणखी वाचा : विश्लेषण : अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ म्हणजे इतिहास, पौराणिक कथा, आणि वाद यांना जोडणारा एकमेव दुवा

याविषयी शुभ्रा गुप्ता म्हणाल्या “समीक्षण चित्रपटाला मारक ठरतो का याचं उत्तर मी काही वर्षांपूर्वी नाही असंच दिलं असतं, पण गेल्या २ ते ३ वर्षात सोशल मीडियावरील समीक्षणपद्धतीमुळे चित्रपटामागील अजेंडा याची जास्त चर्चा होऊ लागली आहे. निष्पक्ष समीक्षणाऐवजी ट्रोलिंग, नेपोटीजम, बॉयकॉट या गोष्टींचं महत्त्व फार वाढलं आहे.”

व्यावसायिक समीक्षकांची भूमिका नेमकी काय?

सध्या सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्ती एखाद्या कलाकृतीवर आपलं मत मांडत असली तरी व्यावसायिक आणि निष्पक्ष समीक्षकांची सध्या आवश्यकता आहे. शुभ्रा गुप्ता म्हणतात, “समीक्षकांना आज जेवढं महत्त्व आहे तेवढं आधी नव्हतं आणि ते तसंच अबाधित राहणं अत्यंत गरजेचं आहे. कला साहित्य क्षेत्रातील चांगल्यातली चांगली गोष्ट वेचून लोकांच्या ज्ञानात भर पाडण्यात समीक्षकांचा मोठा वाटा आहे.”