How to Deal With FOMO in Your Life : आजकालच्या काळात इतरांबरोबर तुलना करणे हा मनुष्याचा स्वभावच झाला आहे. काहींना नेहमी असं वाटत असतं की, इतरांकडे ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्यापेक्षा अधिक चांगल्या आहेत. याच विचारांमुळे काहीजण स्वत:ला कमी लेखत असतात. ही समस्या तेव्हा वाढते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी नवीन आणि मोठं यश मिळतं. यानंतर आपल्या मनात एक भीती निर्माण होते, की इतरांपेक्षा आपण मागे तर पडत नाहीये ना? जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील, तर तुम्ही ‘फोमो’चे शिकार झाला आहात. दरम्यान, फोमो म्हणजे नेमकं काय? या समस्येतून स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

नुकत्याच एका संशोधनात ‘फोमो’चा अगदी सविस्तरपणे उलगडा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक जॅकलिन रिवकिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकल्पनेवर संशोधन केले आहे. अभ्यासानुसार, तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी गमावली असली तरीही सामाजिक संवाद गमावणे हा फोमो वाढवणारा महत्वाचा घटक ठरतो.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Hrishikesh Shelar
व्हिलन ‘दौलत’ ते आदर्श मुलगा ‘अधिपती’…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका कशी मिळाली? हृषिकेश शेलार म्हणाला…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar : “माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला…”; सुधीर मुनगंटीवार यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?
pooja sawant letter to god
Video : प्रिय स्वामी…; पूजा सावंतने देवाला लिहिलं पत्र! मागितली ‘ही’ खास गोष्ट; म्हणाली, “सध्या माझा पत्ता…”

हेही वाचा : ‘Sapiosexuality’ म्हणजे काय? बुद्धिमत्तेच्या आकर्षणाचं विज्ञान आणि वाद नेमका काय आहे?

होय, टेलर स्विफ्ट कॉन्सर्ट किंवा फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी न होता आल्यामुळे मनात येणारी पश्चतापाची भावना येणे साहजिकच आहे. पण, या अभ्यासाने दैनंदिन जीवनातील लहान आणि सामान्य घटनांवरही लक्ष केंद्रित केले आहे. संशोधनात असेही आढळून आलं आहे की, एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन मित्रांना भेटता न आल्याने काहीजणांना ‘फोमो’ जाणवतो.

फोमो म्हणजे नक्की काय?

फोमो म्हणजे ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतरांपेक्षा मागे राहण्याची किंवा काहीतरी गमावण्याची भीती वाटणे. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्याला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी न होता आल्यामुळे मनात येणारी चिंतेची भावना. जणू काही लोक आपल्या अनुपस्थितीत एकमेकांशी खूप जवळीक वाढवत आहेत. आपण मात्र ही संधी गमावली आहे, असे जॅकलिन रिवकिन यांनी DW’s Science Unscripted ला सांगितले.

‘फोमो’ हा शब्द सुमारे २० वर्षांपासून वापरात आला आहे. याची सुरुवात ऑनलाइन माध्यमातून झाली होती, नंतर तो सर्वसामान्य भाषेत वापरला जाऊ लागला. ‘फोमो’ हा शब्द क्रिप्टोकरन्सीशीही जोडला गेला असून स्टॉक गुंतवणुकीसाठी प्रेरक म्हणून वापरला जातो. तसेच त्याचा वापर जाहिरातीत देखील केला जातो, जेणेकरून ग्राहकांना विशिष्ट उत्पादने किंवा संधींचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करता येईल.

FOMO वर कसे संशोधन केले?

जॅकलिन रिवकिन यांच्या टीमने ‘फोमो’ परिस्थितींवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हजारो व्यक्तींवर ७ वेगवेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी एक मोठ्या संगीत कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, सहभागींना दैनंदिन जीवनातील अधिक सामान्य प्रसंग दाखवले. रिवकिन म्हणाले, “आम्हाला अशा सामान्य प्रसंगांमध्ये रस होता, जिथे कदाचित तुम्ही चुकवलेली गोष्ट फारशी महत्वाची नसेल. परंतु, यामुळे आपण त्या मूलभूत मानसशास्त्राला समजू शकतो, ज्यामुळे तुम्हाला पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. त्यामागील खरी गोष्ट म्हणजे लोकांना एकमेकांशी जोडणे होते.”

कोणकोणत्या गोष्टींवर प्रयोग करण्यात आले?

१) मित्र ज्या संगीत महोत्सवाला जातील, असं वाटत होते. तो चुकवणे

२) मित्र किंवा अनोळखी लोकांसोबत वेळ न घालवता येणे.

३) सदस्यांसाठी असलेल्या एका सामाजिक गटात प्रवेश न मिळणे.

४) वैयक्तिक सोशल मीडिया फीडमधील सामग्रीच्या आधारे ‘फोमो’चे मूल्यमापन करणे.

जरी हा अभ्यास फक्त अमेरिकेतील सहभागींवरच करण्यात आला असला, तरी यामध्ये विविध वयोगटांतील व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामुळे हे सिद्ध झाले की, ‘फोमो’ फक्त तरुणांमध्येच नाही, तर इतर वयोगटातील व्यक्तींमध्ये देखील दिसून येतो. रिवकिन म्हणाले, “आमच्या अभ्यासातून असे दिसून आलं आहे की, कोणताही सामाजिक गट जवळच्या लोकांच्या गटाशी निगडित असेल, तर कोणालाही ‘फोमो’ होऊ शकतो”.

हेही वाचा : ‘मिरर लाईफ बॅक्टेरिया’ म्हणजे काय? प्रयोगशाळेतील जीवाणूच्या प्रसाराच्या भीतीने शास्त्रज्ञ चिंतेत; कारण काय?

FOMO ची लक्षणे आणि उपाय

गेल्या दहा वर्षांत ‘फोमो’चा परिणाम समजून घेण्यासाठी अनेक संशोधने करण्यात आली आहे. यातील बहुतांश संशोधनांमध्ये ‘फोमो’बद्दल खालील समस्या आढळून आल्या आहेत.

१) झोपेची समस्या ‘फोमो’ वाढण्याचे कारण ठरू शकते.

२) सामाजिक चिंतेमुळे देखील ‘फोमो’ वाढू शकतो.

३)सतत नैराश येत असेल, तर ‘फोमो’ असू शकतो.

४) शैक्षणिक कामगिरीतील घसरण यामुळे देखील ‘फोमो’ वाढतो.

२०२२ मध्ये Southern Connecticut State University च्या एका अभ्यासात असं म्हटलं की, अमेरिकन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दारू आणि मादक पदार्थ्यांच्या सेवनाचे प्रकार वाढले आहे. त्यांचे बेकायदेशीर वर्तनामागे ‘फोमो’ असण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. University of Toledo च्या एका संशोधनानुसार, तरुणांमध्ये स्मार्टफोनचा वाढत्या अतिवापरामुळे ‘फोमो’ अतिवापर वाढत्या किंवा अति वापरामुळे ‘फोमो’ किंवा भावनिक अस्थिरता वाढू शकते.

फोमो दूर करण्यासाठी उपाय

१) स्मार्टफोन वापर कमी करा, विशेषतः सोशल मीडियावर कमी वेळ घालवा.

२) आत्मचिंतन करा, आपल्याला ज्या गोष्टींची खरोखरच गरज आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा.

३) मनावर नियंत्रण ठेवा. ध्यान किंवा योगाचा सराव केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

४) आपण जे अनुभवत आहात त्याचा आनंद घ्या, इतरांच्या गोष्टींच्या मागे जाण्याऐवजी स्वत:कडे लक्ष द्या.
सकारात्मक संवाद साधा. आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्यास ‘फोमो’ कमी होऊ शकतो.

५) ‘फोमो’ अगदी सहजपणे दूर केला जाऊ शकतो. परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

Story img Loader