उरलेले भाजी, पोळी, भात असे जेवण आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देतो. हेच शिळे अन्न आपण दुसऱ्या दिवशी खातो. कधी कधी तर रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवलेलेही अन्न सर्रास खातो. मात्र, असे केल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. याच विषबाधेशी संबंधित ‘फ्राईड राईस सिंड्रोम’ नावाच्या आजाराची सध्या चर्चा होत आहे. हा आजार नेमका काय आहे? या आजारामुळे नेमका काय त्रास होतो? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या समाजमाध्यमांवर २००८ सालचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बेल्जियममधील असून, त्यात एका २० वर्षीय मुलाचा पाच दिवसांचे शिळे अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याला फ्राईड राईस सिंड्रोम हा आजार झाल्याचे म्हटले जात असून, तो बॅसिलस सेरस या जीवाणूमुळे होतो. जेव्हा अन्न खूप दिवस तसेच ठेवले जाते, तेव्हा त्या अन्नात बॅसिलस सेरस या जीवाणूची वाढ होते.

फ्राईड राईस सिंड्रोम म्हणजे नेमके काय?

फ्राईड राईस सिंड्रोम हा आजार एका प्रकारची विषबाधा आहे. आपल्या वातावरणात आढळणाऱ्या बॅसिलस सेरस या जीवाणूमुळे हा आजार होतो. योग्य पद्धतीने न ठेवलेल्या शिजवलेल्या अन्नात या जीवाणूची वाढ होते. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अन्नसंसर्गातील तज्ज्ञ डॉ. सायथिया सियर्स यांनी ‘टुडे डॉट कॉम’ला हा जीवाणू आणि फ्राईड राईस सिंड्रोम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. एका भोजनालयात पांढरा भात तयार करण्यात आला होता. नंतर हा भात रेफ्रिजरेटममध्ये ठेवला गेला नव्हता. परंतु, नंतर याच भाताचा उपयोग फ्राईड राईस तयार करण्यासाठी करण्यात आला. त्यातून लोकांना बॅसिलस सेरस जीवाणूचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून अशा प्रकारे होणाऱ्या विषबाधेला फ्राईड राईस सिंड्रोम, असे म्हटले जाऊ लागले, अशी माहिती डॉ. सायथिया यांनी दिली.

युनायटेड स्टेट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर डिपार्टमेंट (यूएसडीए)च्या म्हणण्यानुसार- भात, पास्ता अशा स्टार्च असलेल्या शिजवलेल्या अन्नात बॅसिलस सेरस या जीवाणूची लवकर वाढ होते. या जीवाणूच्या वाढीसाठी साधारण ४० ते १४० डिग्री फॅरेनहाईट तापमान अनुकूल असते.

बरेच दिवस ठेवलेल्या आणि शिळ्या अन्नाला उच्च तापमानात पुन्हा शिजवले तरी बॅसिलस सेरस या जीवाणूची वाढ होते. तापमानाशी सामना करू शकेल अशी प्रतिकारशक्ती हा जीवाणू स्वत:मध्ये विकसित करतो. “आपल्याला या जीवाणूबद्दल

बऱ्याच दिवसांपासून माहिती आहे. हा जीवाणू आपल्या भोवताली अनेक ठिकाणी सहज आढळतो. विशेष म्हणजे तो निसर्गत:च माती, वनस्पती, प्राण्यांसाठीच्या खाद्यपदार्थांमध्ये आढळतो,” अशी माहिती कॉर्नेल विद्यापीठातील अन्न विज्ञानाचे प्राध्यापक रॉबर्ट ग्रॅवानी यांनी सांगितले.

फ्राईड राईस सिंड्रोमची लक्षणे काय?

बॅसिलस सेरस या जीवाणूमुळे फ्राईड राईस सिंड्रोम म्हणजेच विषबाधा होते. या विषाणूमुळे एकूण दोन प्रकारचा आजार होतो. एका प्रकारात उलट्या होतात; तर दुसऱ्या प्रकारच्या विषबाधेत अतिसाराचा त्रास होतो. फ्राईड राईस सिंड्रोम झाल्यानंतर बरेच लोक बरे होतात; मात्र ज्या लोकांची प्रतिका

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is fried rice syndrome know detail information in marathi prd