सोशल मीडियावर अनेकदा ‘GOAT’ हा शब्द ट्रेंडिंग होताना दिसतो. कोणत्याही क्रीडा प्रकारातील खेळाडूने उत्तम कामगिरी केल्यानंतर अनेकजण संबंधित खेळाडूला शुभेच्छा देताना GOAT शब्दाचा वापर करतात. विराट कोहली, लिओनेल मेस्सी किंवा सेरेना विल्यम्स अशा महान खेळाडूंसाठी हा शब्द वापरला जातो. पण या शब्दाचा अचूक अर्थ काय? क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा शब्द कसा जोडला गेला? याचा उगम नेमका कुठून झाला? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…

सोशल मीडियावर बर्‍याचदा ‘एडका’ प्राण्याच्या आयकॉनसह GOAT हा शब्द ट्रेंडिंग होत असतो. GOAT हे ‘Greatest of All Time’ या वाक्याचं लघुरुप आहे. जो खेळाडू एखाद्या क्रीडाप्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवतो, अशा खेळाडूंच्या नावापुढे GOAT ही संज्ञा वापरली जाते. GOAT या शब्दाच्या उत्पतीचा संबंध महान बॉक्सर आणि सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद अलीच्या महान कामगिरीशी जोडला जातो. GOAT या शब्दाचा शेळी किंवा एडका प्राण्याशी काहीही थेट संबंध नाही.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

“मी सर्वात महान”- मोहम्मद अली

खरं तर, मोहम्मद अली जितका प्रभावी खेळाडू होता. तितकाच तो स्वतःला महान संबोधत असे. त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: “मी सर्वात महान आहे, हे मला कळायच्या आधीच मी स्वत:ला महान म्हणालो. मी स्वत:ला महान म्हणत असेल तर मी जगालाही पटवून देईन की, मी खरोखरच महान आहे.”

‘आय एम द ग्रेटेस्ट’ कॉमेडी अल्बम आणि ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन

वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत मोहम्मद अलीला ‘कॅसियस क्ले’ या नावानं ओळखलं जायचं. तेव्हा त्यानं ‘आय एम द ग्रेटेस्ट’ हा कॉमेडी अल्बम रिलीज केला होता. १९६४ साली हा अल्बम सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय या गटातून ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकितही झाला. “कॅसियस क्ले हा एक दिग्गज आहे. तो जगातील सर्वात चांगला फायटर आहे. तो महान आहे! होय! या कवितेतील माणूस मीच आहे. मी जगज्जेता होईन, यात काही शंका नाही,” असे ‘आय एम द ग्रेटेस्ट’ या अल्बमचे बोल होते.

आधी भविष्यवाणी मग जगज्जेत्ता

‘आय एम द ग्रेटेस्ट’ या अल्बममधून भविष्यवाणी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात कॅसियस क्लेने ‘जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिप’ जिंकली. त्यानंतरच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून ‘मोहम्मद अली’ असं ठेवलं. त्यानंतर कृष्णवर्णीय व्यक्तीच्या रुपात मोहम्मद अलीने स्वत:ला महानतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. गेल्या अनेक वर्षांपासून जगावर मोहम्मद अलीचा प्रभाव कायम आहे.

१९९२ मध्ये मोहम्मद अली बॉक्सिंगमधून निवृत्त झाले. यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडली. तेव्हा त्यांची पत्नी आणि व्यवसायिक मॅनेजर लोनी अली (योलांडा विल्यम्स) यांनी ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आयएनसी (G.O.A.T. Inc) नावाची संस्था स्थापन केली. व्यावसायिक हेतूंसाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये मोहम्मद अलीचे नाव, त्याचे दुर्मिळ छायाचित्रे, संग्रहित व्हिडीओ अशा सर्व मजकूराची मालकी या संस्थेकडे होती. २०१३ साली ही कंपनी ऑथेंटिक ब्रँड ग्रुपने विकत घेतली आहे.

G.O.A.T हा शब्द लोकप्रिय कसा झाला?

रॅपर एलएल कूल जे याने २००० साली G.O.A.T नावाचा अल्बम प्रदर्शित केला होता. या गाण्याने GOAT ही संज्ञा सर्वदूर पोहोचली. २०१६ मध्ये कूल जेने रोलिंग स्टोन्सला सांगितलं, “मोहम्मद अलीशिवाय, ‘मामा सेड नॉक यू आउट’ आणि G.O.A.T. ही संज्ञा कधीही तयार झाली नसती. ”

पुढे २०१८ मध्ये, GOAT या शब्दाचा ‘मेरियम वेबस्टर’ या शब्दकोशात समावेश करण्यात आला. त्याच वर्षी मेरियम वेबस्टरचे तत्कालीन संपादक पीटर सोकोलोव्स्की यांनी Boston.com ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, “१९९६ सालच्या आवृत्तीमध्ये GOAT हा शब्द आढळला आहे. हा शब्द ऑनलाइन वापरासाठीच्या शब्दकोशात आढळला. ज्यामध्ये GOAT या शब्दासाठी पेनी हार्डवेचा संदर्भ दिला होता. ‘पेनी इज द GOAT’ (सर्वकालिक महान खेळाडू) असं साधं सरळ वाक्य त्या शब्दकोशात लिहिलं होतं. पेनी हार्डवे हा बास्केटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आहे,” अशी माहिती सोकोलोव्स्की यांनी दिली.

२०१८ मधील शब्दकोशात नमूद केलं आहे की, अमेरिकन फुटबॉलपटू टॉम ब्रॅडीमुळे GOAT या शब्दाच्या वापरात मोठी वाढ झाली. GOAT ही संज्ञा लोकप्रिय करण्यात ब्रॅडीचा मोठा वाटा आहे, असा उल्लेख ‘द अॅथलेटिक’नेही केला आहे. २०२२ च्या एका लेखात, स्पोर्ट्स वेबसाइटने Google Trends डेटाचा हवाला देत म्हटलं की ‘टॉम ब्रॅडी GOAT’ हा हॅशटॅग २०१५, २०१६ मध्ये सर्वाधिक वापरला गेला. अॅथलेटिकच्या लेखात पुढे असेही म्हटलं आहे की, जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर २०१६ मध्येही GOAT गूगलवर ट्रेंड झाला होता. सध्याच्या घडीला क्रीडासोबतचं इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाला GOAT हा शब्द जोडला जात आहे.

Story img Loader