What is Gray Market Premium गेल्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीज, इरेडा, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि गंधार ऑइल रिफायनरी याबरोबर इतर पाच कंपन्यांनीही ‘आयपीओ’ लाँच केल्यामुळे भारतातील इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) बाजारपेठ वधारली होती. IPO मधील या वाढीमुळे ग्रे मार्केट आणि ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) बद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्रे मार्केट आणि ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय हे समजून घेणे संयुक्तिक ठरावे.

ग्रे मार्केट म्हणजे काय (GM)?

ग्रे मार्केट ही संज्ञा IPO मार्केटशी संबंधित आहे. IPO कोणत्या किमतीवर लिस्ट होणार हे ठरविण्यासाठी ग्रे मार्केट ही संज्ञा वापरली जाते. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत आणि अनियंत्रित मार्केट आहे, जिथे शेअर्स मुख्य बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वीच व्यवहार केले जातात. म्हणजेच IPOचे शेअर्स बाजारात प्रत्यक्ष दिसण्यापूर्वी बाहेरच्या बाहेर परस्पर खरेदी-विक्री केली जाते. या व्यवहारावर शेअर बाजाराचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या मार्केट मध्ये काही मध्यस्थ (डीलर्स) असतात, ग्रे मार्केटमध्ये खरेदी- विक्री करणारे लोक या मध्यस्थांद्वारे व्यवहार करतात. मूलतः IPO हे सब्स्क्रिप्शनसाठी नोंदले जातात, त्या वेळेस शेअर्ससाठी मागणी नोंदवली जाते याला बीड करणे असे म्हणतात. IPO नोंदणीची मुदत संपल्यानंतर बीड केलेल्या शेअर्सचे वाटप होते, अपेक्षित प्रमाणाबाहेर मागणी असल्यास सर्वांनाच शेअर्स मिळत नाहीत. IPO चे वाटप झाल्यांनतर काही दिवसांनी हे शेअर्स बाजारात लिस्ट केले जातात, तेथे कोणीही ते खरेदी करू शकतात.

Share Market
येत्या आठवड्यात कशी असेल Share Market ची कामगिरी? अर्थसंकल्पासह ‘हे’ ३ घटक ठरणार महत्त्वाचे
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
deepseek vs chatgpt america
AI Technology: चीनी DeepSeek मुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये कोलाहल; बाजार ३ टक्क्यांनी कोसळला, नेमकं घडतंय काय?
ITC Hotels Limited shares listed on the stock exchange print eco news
आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सचा भाव तीन अंकी सूर मारेल?  बाजारात शेअर्सचे लिस्टिंग येत्या बुधवारी
Gold prices surge above Rs 83,000 in the spot market and hit a lifetime high on MCX.
Gold Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोने तेजीत, सोने खरेदीचा योग्य दर काय?
Sebi when listed platform
IPO लिस्ट होण्यापूर्वी करता येणार ट्रेडिंग, सेबी नवीन प्लॅटफॉर्म सुरू करणार? याचा गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

अधिक वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

ग्रे मार्केट कसे काम करते?

शेअर खुला झाल्यानंतर ग्रे मार्केटची भूमिका येते. इथे ग्रे मार्केट दोन प्रकारे काम करते, पहिले जे शेअर्स वाटप झाले आहेत, परंतु स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झालेले नाहीत अशांचा व्यवहार होतो, तर दुसऱ्या प्रकारात जे शेअर्स अजूनही वाटप झालेले नाहीत त्यांचा व्यवहार होतो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणाऱ्या एक्सचेंज ट्रेडच्या विरुद्ध, ग्रे मार्केटमधील व्यवहार वैयक्तिकरित्या होतात. हे व्यवहार नियमांच्या कक्षेबाहेर होत असले तरी ते बेकायदेशीर मानले जात नाहीत.

ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे (GMP)?

ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे ‘स्टॉक’ एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये IPO किमतीवर भरण्यास इच्छुक असलेल्या अतिरिक्त किंमतीचा संदर्भ होय. व्यापार्‍यांच्या परस्पर विश्‍वासावर आधारित ग्रे मार्केटमध्‍ये शेअरची अनौपचारिकपणे खरेदी-विक्री केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने फिक्स IPO आणलेला आहे, ज्यामध्ये एका शेअर्सची किंमत ३०० रुपये आहे. तर ग्रे मार्केट मध्ये याच शेअर्ससाठी ३५० रुपये मोजले जात असतील, तर याचाच अर्थ त्या कंपनीच्या IPO चा GMP ५० रुपये असेल. मूलतः हे मार्केट किंवा हा व्यवहार अनधिकृत असल्याने या मार्केटचे कोष्टक किंवा तत्सम लेखाजोखा कुठेही प्रकाशित होत नाही, या मार्केट मधील व्यवहारांसाठी डिलर्सचीच मदत घेणे अपरिहार्य असते.

ग्रे मार्केट प्रीमियमची गणना कशी केली जाते?

GMP ची गणना प्रामुख्याने IPO मधील स्टॉकची मागणी आणि पुरवठा यांची गतिशीलता दर्शवते. ऑफरमध्ये वाटप केले जाऊ शकतील अशा समभागांच्या संख्येबद्दल व्यापाऱ्यांची धारणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अरुण केजरीवाल यांनी ईटीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, शेअर वाटपाची शक्यता वाढल्यास, विक्रीसाठी उपलब्ध अधिक स्टॉक दर्शविल्यास, जीएमपी घसरेल. याउलट, वाटपाची शक्यता कमी झाल्यास, कमी शेअर्स उपलब्ध असल्याचे सुचविल्यास, GMP जास्त असेल. ग्रे मार्केटमधील किमती देखील IPO मधील सबस्क्रिप्शनच्या अनुषंगाने बदलतात. सामान्यतः, उच्च सदस्यता दर उच्च जीएमपीकडे जातो. असे असले तरी हा व्यवहार सावधगिरीने करणे अपेक्षित आहे.

ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी करता येते?

IPO मध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी, खरेदीदार ग्रे मार्केट ब्रोकर्सशी संपर्क साधतात आणि विशिष्ट किंमत किंवा प्रीमियमवर खरेदी करण्याची ऑफर देतात. त्यानंतर ब्रोकर्स संभाव्य विक्रेत्यांशी संपर्क साधतात ज्यांनी IPO साठी अर्ज केलेला असतो. विक्रेते सूचीच्या किंमतीबद्दल अनिश्चित असल्यास आणि जोखीम घेऊ इच्छित नसल्यास ते विक्री करणे निवडू शकतात. येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ग्रे मार्केटमध्ये शेअर्सचे प्रत्यक्ष हस्तांतरण होत नाही. एकदा विक्रेत्याला शेअर्सचे वाटप झाल्यानंतर, ते ब्रोकर्सच्या माध्यमातून खरेदीदारांना रोख सेटलमेंटसह हस्तांतरित केले जातात. सर्व व्यवहार सूचीच्या किंमतीवर सेटल केले जातात आणि सूची किंमत आणि पूर्वी उद्धृत केलेल्या किंमतीमधील कोणताही फरक सूचीच्या दिवशी सेटल केला जातो. त्यामुळे, लिस्टिंगच्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता, अनेक IPO साठी ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतो. तथापि, या व्यवहारांना धोका निर्माण होतो कारण ते एक्सचेंजेस आणि सेबी या दोन्हींच्या देखरेखीबाहेर काम करतात.

अधिक वाचा: काळे पाणी म्हणजे काय? ते पिणे किती आरोग्यदायी?

ग्रे मार्केट प्रीमियमचा अर्थ काय आहे?

ग्रे मार्केट प्रीमियम मागणी-पुरवठ्याच्या गतिशीलतेवर आधारित विशिष्ट IPO साठी बाजारातील भावना दर्शवते. उच्च जीएमपी सूचीबद्धतेवर स्टॉकमध्ये मजबूत मागणी आणि संभाव्य चढ-उतार सूचित करते. याउलट, कमी GMP कमकुवत मागणी आणि माफक किंवा कमकुवत सूची दर्शवते.

ग्रे मार्केट प्रीमियम किती अचूक आहे?

आपण बऱ्याचदा ऐकतो, शेअर्स मार्केट उघडण्यापूर्वी एखाद्या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये त्याच्या इश्यू किमतीच्या अमुक एक टक्के जास्त किंवा कमी आहे. त्यामुळे काळ्या बाजारातमध्ये हा अंदाज लावला जातो की, त्याची शेअर्स किमंत आपल्या इश्यू किंमती पेक्षा किती कमी किंवा अधिक असणार आहे. रिटेल इन्व्हेस्टर यात अधिक स्वारस्य घेतात. असे असले तरी GMP अचूक सूची किंमत प्रतिबिंबित करू शकत नाही, परंतु GMP ट्रेण्डचे निरीक्षण केल्याने व्यापार्‍यांना स्टॉकच्या सूचीनंतरच्या दिशेने अंतर्दृष्टी मिळू शकते. बाजारातील तज्ज्ञ सांगतात की एक स्टॉक सहसा त्याच्या GMP किमतीच्या जवळपास १५-३०% च्या मर्यादेत सूचीबद्ध असतो.

ग्रे मार्केट प्रीमियम्समध्ये फेरफार होतात का?

मोठ्या IPO साठी ग्रे मार्केट प्रीमियम्समध्ये फेरफार करणे आव्हानात्मक असते. तथापि, बाजार तज्ज्ञ सावध करतात की, लहान IPOs GMP हाताळणीसाठी संवेदनक्षम असू शकतात. छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या आयपीओसाठी ग्रे मार्केटमध्ये किमती नियंत्रित केल्या प्रमाणे जातील असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे, IPO मध्ये समभागांसाठी अर्ज करताना, GMP हा एकमेव घटक विचारात घेऊ नये, असे अरुण केजरीवाल सांगतात. साधारणत: जीएमपी ८० टक्के बरोबर असतात. त्याच्या ५-१० टक्के वरती- खालती शेअर्स सूचिबद्ध होतात असा आजवरचा अनुभव आहे.

Story img Loader