अलीकडे इंटरनेट सर्फिगही मोबाइलवरून करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. मोबाइलवरील स्वस्त इंटरनेटमुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा संगणकाऐवजी मोबाइल वापरकर्त्यांकडे वळवला आहे. मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाइलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे. याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊ.

मोबाइल कसे हॅक होतात?

Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Digital Arrest is biggest crisis of future and police department and banks should show seriousness now
‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट
Hyderabad Police
Hyderabad : चोरांचा प्रताप, रुग्णवाहिका चोरली अन् बचावासाठी लढवली अनोखी शक्कल; पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग

* जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाइल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आरामात जोडता येते, त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात.

* मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो.

* हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्रे दूरवरून मिळवू शकतात.

हॅकर्स काय करतात?

* हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते.

* तसेच अनेक वेळा मोबाइलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच रुपये दुसऱ्या खात्यात वळविले जातात.

* मोबाइलमध्ये सुरू असलेली सर्व अ‍ॅप्लिकेशन्स अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केली जातात. मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करीत ‘क्रेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात.

* हॅकर्सने काही बँकांकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा ‘डाटा’ हॅक केलेला आहे. हॅकर्सने अनेक बँकाचा ‘डाटा’ मिळविला आहे. या क्रेडिन्शिअलचा वापर करून ऑनलाइन लूटमार करण्यासाठी हॅकर्स ग्राहकांच्या मोबाइलमध्ये मालवेअर पाठवितात.

हॅकिंगकरिता हॅकर्सकडून ‘ओटीपी’चा वापर!

हॅकर्सकडून शक्यतो लूटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येते. हॅकर्सने मोबाइल हॅक केला असल्याने त्यांना पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना लागणारा ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) लगेचच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाइन लूटमार करतात.

व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक अकाऊंट हॅक कसे होते?

व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक अकाऊंट हॅक करून अकाऊंटद्वारे अश्लील मॅसेज पाठविले जातात. व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक रिइन्सॉटल करताना संबंधित कंपनीकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेच आपण संबंधित अ‍ॅप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स परिचितांपैकी एकाचा मोबाइल हॅक करून त्यावर व्हॉट्सअ‍ॅप रिइन्सॉटल करण्याचा ओटीपी मिळवून व्हॉट्सअ‍ॅप हॅक करतात आणि नंतर कॉन्टेक्ट लिस्टमध्ये पोहोचून इतरांचे मोबाइल हॅक करण्याचा सपाटा सुरू करतात. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करून रिइन्सॉटल करताना नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी आल्यावर हॅकर हॅक केलेल्या अकाऊंटवरून काही भूलथापा मारून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती करतो. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंधितांना तो मॅसेज फॉरवर्ड करतो. अशा रीतीने हॅकर सहजपणे हॅकिंग करू शकतो.

हॅक झाल्याची लक्षणं कोणती?

* अचानक रीस्टार्ट होणे, एकदम शटडाऊन होणे.

* मोबाइलमधून आपोआप एसएमएस पाठवला जाणे.

* मोबाइलमधील अ‍ॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा बंद होणे.

ही मोबाइल हॅक झाल्याची लक्षणे आहेत.

आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या..

*पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर विसंबून न राहता मोबाइलवर बोलून खात्री करून घ्यावी.

* मेलमध्ये किंवा एसएमएसमध्ये आलेली अनोळखी लिंक उघडू नये आणि ती लिंक चुकून उघडल्यास मोबाइल फॉरमॅट करून घ्या.

*अनोळखी व्यक्ती मेसेज किंवा मेल करीत असेल तर त्याला ब्लॉक करणे हे योग्य ठरेल.

* मोबाइल हॅकिंगपासून संरक्षित ठेवण्याकरिता काय काळजी घ्याल?

* ब्ल्यू टूथ वापरत असाल तर ते बंद किंवा इनव्हिझिबल मोडमध्ये ठेवा.

* त्याशिवाय फोन सतत अपडेट करीत राहा. म्हणजे त्यातील कार्यक्रम तुम्हाला सतत समजत राहील.

* तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही.

*मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका

* एखादे अ‍ॅॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.

* मोबाइलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका.

– प्रा. योगेश हांडगे,

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Story img Loader