Budget 2023 : सालाबादप्रमाणे यंदाही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि देशभरातल चर्चा सुरू झाली ती अर्थसंकल्पाची! केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या राज्यासाठी कोणते प्रकल्प, त्यासाठी किती निधीची घोषणा होणार अशा अनेक चर्चा या काळात ऐकायला मिळतात. अर्थसंकल्पात करप्रणालीमध्ये कोणते बदल होणार, याकडे देशातील सर्वसामान्य करदात्यांचं लक्ष असतं. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच अर्थसंकल्प चर्चेत आलेला असतानाच गुरुवारी दरवर्षीप्रमाणे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर ‘Halwa Ceremony’ पार पडली. यानंतर आता अर्थमंत्रालयातील अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उच्चपदस्थ नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर बंदिस्त झाले आहेत.

येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी अर्थमंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर प्रथेप्रमाणे हलवा सेरेमनी पार पडली. करोना काळात ही प्रथा मोडली होती. मात्र, यावर्षी पुन्हा एकदा या प्रथेला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी निर्बंधांमुळे हलवा वाटण्याऐवजी अर्थसंकल्पाशी निगडित कर्मचाऱ्यांना फक्त मिठाई वाटण्यात आली होती.

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Nana Patole question regarding the action to be taken against Rashmi Shukla
रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray
Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !

स्वत: निर्मला सीतारमण यांनी वाटला हलवा!

गुरुवारी नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर गरमागरम हलव्याचा घमघमाट सुटल्याचं दिसून आलं. तळमजल्यावर एका मोठ्या कढईमध्ये हलवा करून ठेवण्यात आला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्वत: जमलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हलवा वाटत होत्या. खुद्द अर्थमंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर यासंदर्भातले फोटो शेअर करण्यात आले आहेत.

विश्लेषण: शेअर मार्केट आणखी झाले सोपे! समजून घ्या काय आहे ‘टी+१ सेटलमेंट’

‘Halwa Ceremony’ म्हणजे काय?

गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये ही प्रथा पाळली जाते. केंद्रीय अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडण्याच्या काही दिवस आधी अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उच्चपदस्थ मिळून ही ‘हलवा सेरेमनी’ करतात. यामध्ये या सर्वांना हलवा तयार करून वाटला जातो. अर्थसंकल्पाशी निगडित असंख्य प्रकारच्या कागदपत्रांचं प्रिंटिंग आणि इतर शेवटची कामं या सेरेमनीनंतर सुरू होतात. नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावरच अर्थ मंत्रालयाची प्रिंटिग प्रेसही आहे. इथेच अर्थसंकल्पाची छपाई केली जाते.

पेपरलेस अर्थसंकल्प!

गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर केला जातो. यंदाचाही अर्थसंकल्प पेपरलेसच असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अर्थसंकल्पराची छपाई जरी नसली, तरी अर्थसंकल्पाशी संबंधित असंख्य कागदपत्रांची छपाई या काळात केली जाणार आहे.

आठवडाभर कर्मचारी-अधिकारी तळमजल्यावर बंदिस्त!

हलवा सेरेमनीशी संबंधित दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सेरेमनी होताच अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उच्चपदस्थ नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर असणाऱ्या बजेट प्रिंटिंग प्रेसमध्ये बंदिस्त होता. अर्थात, त्यांना कुणालाही बाहेर पडण्याची परवानगी नसते. त्यांचे फोनदेखील बंद करून ठेवण्यात येतात. या काळात फक्त अर्थमंत्री आणि त्यांच्या परवानगीने आवश्यकता भासल्यास काही उच्चपदस्थ अधिकारी यांनाच बाहेर पडण्याची परवानगी असते. अर्थसंकल्पातील कोणतीही तरतूद किंवा कोणतीही माहिती ही प्रत्यक्ष अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करेपर्यंत कुठेही बाहेर लीक होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. हे सगळे कर्मचारी आणि अधिकारी थेट अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतरच नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावरून बाहेर येऊ शकतात.

विश्लेषण : रोम जळत असताना राजा नीरो खरंच बासरी वाजवत बसला होता का?

आयबी, सीसीटीव्ही, जॅमर्स…

या कालावधीमध्ये नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर आणि तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर थेट IB ची नजर असते असंही सांगितलं जातं. याशिवाय, टेलिफोन कॉल्स वगैरे गोष्टींवर बारीक नजर ठेवली जाते. सीसीटीव्हीद्वारे प्रत्येक घडामोडीवर सुरक्षा यंत्रणेचं लक्ष असतं. इंटरनेटवरून माहिती लीक होऊ नये, यासाठी जॅमर्सही बसवण्यात येतात, असंही सांगितलं जातं.

Budget 2023 : निर्मला सीतारामन १ फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

राष्ट्रपती भवनात व्हायची अर्थसंकल्पाची छपाई!

यासंदर्भात एक रंजक गोष्ट अशी, की १९५० सालापर्यंत राष्ट्रपती भवनात अर्थसंकल्पाची छपाई केली जात होती. मात्र, त्याचवर्षी काही महत्त्वपूर्ण माहिती लीक झाल्यामुळे ही छपाई मिंटो रोडवरील प्रेसमध्ये केली जाऊ लागली. पुढे १९८० साली थेट अर्थमंत्रालयाच्या म्हणजेच नॉर्थ ब्लॉकच्या तळघरातच छापखाना तयार करण्यात आला. तेव्हापासून अर्थसंकल्पाची छपाई तिथेच केली जाते.