आफ्रिकन देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआसी)मध्ये बऱ्याच काळापासून हिंसाचार सुरू आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. या देशाचा पूर्वेकडील शेजारी रवांडाच्या पाठीशी असलेल्या M23 बंडखोर संघटनेने दोन देशांच्या सीमेवर असलेले खनिजसमृद्ध शहर गोमा ताब्यात घेतल्याने हिंसाचारात वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार जानेवारीमध्ये सुरू झालेल्या या लढाईत २,९०० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि सात लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तसेच, बरेच जण जखमी झाले आहेत. संपूर्ण देशात याचा परिणाम चकमकींच्या स्वरूपात दिसून येत आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये नक्की काय सुरू आहे? या प्रदेशाचा इतिहास काय? या प्रदेशात हिंसाचार वाढण्याचे कारण काय? जाणून घेऊ.
प्रदेशाचा इतिहास काय आहे?
साधारणपणे १९९४ च्या रवांडन नरसंहार, सध्याच्या हिंसाचारास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी हा प्रदेश औपनिवेशिक काळापासून हुटस आणि तुत्सी यांच्यातील संघर्षाने ग्रासलेला आहे. १,५०,००० तुत्सी लोक १९६२ मध्ये बेल्जियमपासून रवांडाच्या स्वातंत्र्यापूर्वीच शेजारच्या देशांमध्ये स्थलांतरित झाले होते. जर्मनी आणि बेल्जियमसारख्या साम्राज्यवादी शक्तींनी रवांडावर तुत्सी राजेशाहीद्वारे राज्य केले; ज्यामध्ये स्थानिक प्रशासकीय भूमिका व्यापलेल्या होत्या. १९५९ मध्ये ‘क्रांती’ची हाक देणाऱ्या हुटसला हे नीट जमले नाही; ज्यामुळे सुमारे २०,००० तुत्सी लोकांनी आपले प्राण गमावले. परिणामी, राजा किगेली पाचवा पळून गेला आणि हुतू राजवट सत्तेवर आली. १९६० च्या बेल्जियन अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या निवडणुका या गटाची सत्तेवरील पकड आणखी मजबूत करणारी होती, ज्यामध्ये स्थानिक कम्युनमध्ये हुटस विजयी झाले. दोन वर्षांनंतर देशाने स्वातंत्र्य घोषित केले आणि ग्रेगोइर कायबांडा हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

रवांडा नरसंहार काय होता?
हुटस यांच्या नेतृत्वाखाली तुत्सी दडपशाहीत होते. त्यामुळे तुत्सी बंडखोर गट रवांडाने देशभक्ती आघाडी (आरपीएफ)ची स्थापना झाली, ज्याने १९९० मध्ये गृहयुद्ध सुरू केले. एप्रिल १९९४ मध्ये हुटस असलेले रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्रियामाना आणि त्यांचे बुरुंडी समकक्ष सायप्रियन न्तारीनिरा यांना घेऊन जाणारे विमान पाडण्यात आले. या हल्ल्यासाठी आरपीएफला दोष देत, रवांडाचे सैन्य आणि हुतू इंटरहॅमवे मिलिशियाने हल्ला केला आणि दररोज सुमारे आठ हजार लोकांची हत्या केली. १०० दिवसांनंतर मोहीम संपेपर्यंत सुमारे आठ लाख तुत्सी आणि काही संख्येने हुतू मारले गेले होते. जुलै १९९४ मध्ये आरपीएफचा प्रतिशोध पूर्ण झाल्यानंतरच नरसंहार संपला. उठावाच्या नेत्यांपैकी एक पॉल कागंबे, २००० साली रवांडाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि तेव्हापासून ते या पदावर आहेत.
नरसंहारानंतर काय झाले?
हत्येचा परिणाम म्हणून गुन्हेगारांसह सुमारे दोन दशलक्ष हुटस हे डीआरसीच्या पूर्वेकडील प्रदेशात गेले. या प्रदेशाला झैरे म्हणतात. आज, या प्रदेशात डेमोक्रॅटिक फोर्स फॉर द लिबरेशन ऑफ रवांडा (एफडीएलआर)सारख्या १२० हून अधिक सशस्त्र गटांचा समावेश आहे, जे हुटससाठी लढण्याचा दावा करतात आणि M23 संघटना तुत्सींच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात. नरसंहारानंतर रवांडाच्या सैन्याने काँगोवर आक्रमण केले. हे आक्रमण सर्वप्रथम १९९६ मध्ये आणि नंतर १९९८ मध्ये केले गेले, ज्याला आफ्रिकेचे महायुद्ध म्हटले गेले. १९९६ च्या युद्धाला पहिले काँगो युद्ध म्हटले जाते. परिणामी देशाचे नाव डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, असे ठेवण्यात आले.

दुसरे काँगो युद्ध म्हणून ओळखली जाणारी पुढची लढाई राष्ट्राध्यक्ष लॉरेंट-डिसिरे काबिला यांनी रवांडा आणि युगांडा या मित्रराष्ट्रांच्या विरोधात सुरू केल्यामुळे झाली. नऊ देश व २५ सशस्त्र गट सामील झाल्यानंतर ही लढाई खंडातील सर्वांत मोठ्या युद्धांपैकी एक ठरली. लढाई, रोग आणि उपासमार यांमुळे पाच दशलक्ष लोक मारले गेले. २००३ मध्ये या लढाईचा शेवट झाला. तेव्हापासून पाश्चात्त्य राष्ट्रांच्या भरपूर मदतीमुळे राष्ट्राध्यक्ष कागामे यांनी देशाला गरिबीतून बाहेर काढले आहे. तरीही रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कागामे यांच्या सरकारवर M23 बंडखोरांना मदत केल्याचा आरोप आहे.
M23 बंडखोर कोण आहेत?
२०१२ मध्ये स्थापन झालेल्या, M23 चा अर्थ ‘Mouvement du 23 Mars’ असा आहे. हा गट एका करारामुळे स्थापन झाला. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो सरकार आणि तुत्सीच्या नेतृत्वाखालील नॅशनल काँग्रेस फॉर द डिफेन्स ऑफ द पीपल (सीएनडीपी) यांच्यात २३ मार्च २००९ रोजी स्वाक्षरी केलेला करार रद्द करण्यात आला. या करारानुसार, २००६ ते २००९ दरम्यान सरकारी सैन्याशी लढा देणाऱ्या सीएनडीपीने राजकीय पक्षाचे रूप धारण करायचे होते आणि त्यांच्या सैनिकांना डीआरसी सैन्यात सामावून घ्यायचे होते. हे सैनिक काँगोच्या सैन्यापासून वेगळे झाले आणि M23 तयार करण्यासाठी एकत्र आले.
याचे नेतृत्व सुल्तानी माकेंगा करत आहे आणि ते उत्तर किवू प्रांतात आहे. तुत्सीसचे संरक्षण करण्याचा दावा करीत या गटाने २०१२ मध्ये प्रथमच गोमा काबीज करण्यात यश मिळवले. काँगोली आर्मी आणि यूएन सैन्याच्या हातून अनेक पराभवांनंतर तुत्सीसांच्या संरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर गटाने माघार घेतली. एका दशकानंतर आश्वासनांची पूर्तता करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते २०२२ मध्ये पुन्हा परतले. यूएनने या गटावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला आहे.

हा जातीय तणावाचा संघर्ष आहे का?
जातीय कलह हा या संघर्षाचा केवळ एक भाग आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हे कोल्टनचे घर आहे. ज्या धातूपासून टँटलम तयार होतो, त्या निळ्या-राखाडी धातूचा वापर स्मार्टफोन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. कारण- ते विविध तापमानांवर जास्त चार्ज ठेवू शकते; ज्यामुळे ऊर्जा साठवून ठेवणाऱ्या कपॅसिटरच्या निर्मितीसाठी ते अनुकूल ठरते. ब्राझील, नायजेरिया व रवांडा येथे कोल्टनचे उत्खनन केले. जाते. मात्र, जागतिक पुरवठ्यापैकी जवळजवळ ४० टक्के साठा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून येतो. त्यामुळे गोमा हे एक प्रमुख व्यापार आणि वाहतूक केंद्र ताब्यात घेतल्याने M23 ला खूप मदत होईल.
संकटावर देशातील नेत्यांची प्रतिक्रिया काय?
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स त्शिसेकेडी यांनी गोमाच्या ताब्याला युद्धाचे कृत्य म्हटले आहे. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कागामे यांनी तुत्सीच्या नेतृत्वाखालील देशाच्या कृती सीमेपलीकडे राहणाऱ्या गटाच्या हिताच्या आहेत आणि गृहयुद्धाचा प्रसार रोखण्यासाठी आहे, असे म्हटले आहे. शेजारी बुरुंडी हा हुतू-बहुसंख्य देश रवांडाशी प्रतिकूल संबंध सामायिक करतो. त्याने कागामे प्रशासनाला M23 च्या आणखी दक्षिणेकडील वाढीविषयी इशारा दिलाआहे. “रवांडा विजय मिळवीत राहिल्यास युद्ध बुरुंडीमध्येदेखील येईल. कागामे यांना बुरुंडी काबीज करायचे आहे आणि आम्ही ते स्वीकारणार नाही,” असे राष्ट्राध्यक्ष एव्हॅरिस्ते एनडायशिमिये म्हणाले.