इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुलमध्ये रविवारी (२५ ऑगस्ट) तीव्र चकमक पाहायला मिळाली. काही महिन्यांतील हा सर्वांत मोठ्या सीमापार हल्ल्यांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केल्यापासून, इराण समर्थित हिजबुल संघटनेने पॅलेस्टिनींशी निष्ठा ठेवण्याचे वचन दिले आहे आणि गाझामध्ये इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी हल्ल्याला विरोध केला आहे.

रविवारी या संघटनेने इस्त्रायलवर शेकडो रॉकेट डागले. तर, इस्रायलने सांगितले की, त्यांनी हा हल्ला रोखण्यासाठी १०० जेट पाठवली. इस्रायलने या वर्षी जुलैमध्ये हिजबुलचा वरिष्ठ कमांडर फुआद शुक्र याची हत्या केली. या हत्येला प्रत्युत्तर देण्यासाठी सदर हल्ला केल्याचे हिजबुलच्या वतीने सांगितले गेले. इस्रायल-हमास संघर्ष वाढण्याची भीती गेल्या काही महिन्यांपासून या प्रदेशात पसरली आहे. रविवारी हिजबुलने कात्युशा रॉकेटपासून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांपर्यंत अनेक शस्त्रे तैनात केली. ही संघटना किती ताकदवान आहे? त्यांच्या शस्त्रागारात कोणकोणत्या शस्त्रांचा समावेश आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

statue Shivaji Maharaj, Malvan Rajkot fort,
मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
anuradha tiwari brahmin social post
Who is Anuradha Tiwari: “ब्राह्मण भारताचे नवे ज्यू आहेत का?” बेंगलुरूमधील महिलेची सोशल पोस्ट व्हायरल; म्हणाली, “आम्ही अभिमानाने…”
bangladesh violence
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed in Malvan
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!
Yogi Adityanath
Yogi Adityanath : “…तर आपण कापले जाऊ”, बांगलादेशचं उदाहरण देत आदित्यनाथांचा इशारा; शिवरायांचा उल्लेख करत म्हणाले…
रविवारी हिजबुल संघटनेने इस्त्रायलवर शेकडो रॉकेट डागले. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?

हिजबुल संघटना

हिजबुलचा उल्लेख ‘देवाचा पक्ष’, असा केला जातो. ‘थिंक टँक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज’ (सीएसआयएस)ने हिजबुलचे वर्णन जगातील सर्वांत मोठी सशस्त्र संघटना, असे केले आहे. त्यामध्ये तोफखाना, रॉकेट्सचा वैविध्यपूर्ण साठा आहे, तसेच बॅलेस्टिक, अँटीएअर, अँटी टँक व अँटीशिप क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. आधुनिक इतिहास लक्षात घेतला, तर लेबनान १९४३ पर्यंत फ्रेंच अधिपत्याखाली होता. देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांसारखी महत्त्वाची अधिकृत पदे, लोकसंख्येतील विविधता लक्षात घेऊन विशिष्ट धार्मिक संप्रदायाच्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली. हिजबुलची निर्मिती लेबनीज गृहयुद्ध (१९७५-१९९०) दरम्यान झाली. लेबनानच्या उत्तरेस इस्रायलची सीमा आहे.

त्याच्या अंतर्गत वांशिक आणि धार्मिक विभाजनांमध्ये १९४८ साली ज्यू लोकांसाठी एक राज्य म्हणून इस्रायलची निर्मिती झाली आणि त्या प्रदेशात तणाव वाढला. अनेक स्थलांतरित लेबनानमध्ये आले. इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी गनिमी सैनिकांना काढण्यासाठी १९७८ मध्ये व पुन्हा १९८२ मध्ये दक्षिण लेबनानवर आक्रमण केले. १९७९ मध्ये इराणमध्ये ईश्वरशासित इस्लामिक सरकारच्या स्थापनेपासून प्रेरित होऊन, याच सुमारास हिजबुलचा उदय झाला. इराण आणि त्याच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)नेदेखील या संघटनेला निधी पुरवला.

हिजबुलची निर्मिती लेबनीज गृहयुद्ध (१९७५-१९९०) दरम्यान झाली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हिजबुल संघटनेची उद्दिष्टे काय आहेत?

हिजबुल संघटनेचा मध्यपूर्वेतील इस्रायल आणि पाश्चात्त्य प्रभावाला विरोध आहे. हिजबुल सुन्नी मुस्लिम आणि शिया मुस्लिम यांचे संरक्षण करणारी शक्ती म्हणून ही संघटना उदयाला आली. इस्त्रायल आणि सौदी अरेबियाचा कट्टर मित्र असलेल्या अमेरिकेचा अंदाज आहे की, इराण हिजबुलला लाखो डॉलर्सचा निधी पुरवतो आणि या संघटनेकडे हजारोंच्या संख्येने लढवय्ये आहेत. हिजबुल २००० च्या मध्यात लेबनीज राजकारणात सामील झाल्याने या संघटनेची ताकद आणखी वाढली. सध्या देशाच्या संसदेत १२८ पैकी १३ जागा या संघटनेच्या आहेत. आपल्या मित्रपक्षांबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकार स्थापन केले. परंतु, अलीकडच्या वर्षांत गरिबी, बेरोजगारी व सरकारी कर्जामुळे लेबनामधील अनेकांनी त्यांच्या सरकारचा निषेध केला आहे.

हिजबुलची शस्त्रागारातील ताकद

हिजबुल संघटनेने गेल्या काही वर्षांत त्याच्या क्षमतांचे स्वरूप लपवून ठेवले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या म्हणण्यानुसार संघटनेचे नेते हसन नसराल्लाह यांच्या विधानांवरून असे दिसून आले आहे की, या संघटनेतील सैनिकांनी गेल्या काही महिन्यांत त्यांच्या हल्ल्यांमध्ये आपल्याकडील शस्त्रांचा केवळ एक भाग वापरला आहे. ‘सीएसआयएफ’च्या मते, “पक्षाच्या शस्त्रागारात प्रामुख्याने लहान व पोर्टेबल रॉकेटचा समावेश आहे. इस्रायल आणि हिजबुल यांच्यात २००६ च्या युद्धात १५ हजार रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे डागली गेल्याचा इस्रायलचा अंदाज आहे. “हिजबुलने तेव्हापासून रॉकेटच्या साठ्यात वाढ केली आहे. आज हिजबुलकडे अंदाजे १,३०,००० रॉकेट्स आहेत,” असे त्यात सांगण्यात आले आहे. संघटनेचे नेते हसन नसराल्लाह यांनी असेही म्हटले आहे की, २००६ पासून हिजबुलने अचूक मार्गदर्शन प्रणालीचा विस्तार केला आहे; जो त्यांच्या शस्त्रागारातील सर्वांत मोठा बदल आहे.

यूएस सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए)च्या वर्ल्ड फॅक्ट बुकमध्ये म्हटले आहे की, २०२२ हिजबुलकडे ४५ हजार लढवय्ये असण्याबाबतचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यापैकी अंदाजे २० हजार पूर्णवेळ कार्यरत आहेत. हिजबुलने सांगितले की, त्यांनी रविवारी इस्रायलच्या दिशेने ३२० कात्युशास रॉकेट सोडली आणि ११ लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. मूलतः सोविएत युनियनने तयार केलेली कात्युशास रॉकेट २५ मैल (सुमारे ४० किलोमीटर)पर्यंत प्रवास करू शकतात. या संघटनेकडे राद, फजर (डाउन) व झिलझाल (अर्थक्वेक) रॉकेट्ससारखी इराणी मॉडेल्सची रॉकेट्सदेखील आहेत. इराणी बनावटीचे फलक-२ रॉकेट पूर्वी वापरलेल्या फलक-१ पेक्षा मोठे आहे. त्यांची रेंज सुमारे १० ते ११ किमी आहे.

हेही वाचा : भारतातील ‘या’ राज्यात तयार होणार कुतुबमिनारपेक्षाही तीन पट उंच स्कायडेक; काय असेल या प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

पुढे हिजबुलने रशियननिर्मित अँटी-टँक कॉर्नेट क्षेपणास्त्रे, तसेच ‘अल-मास’ म्हणून ओळखले जाणारे इराणनिर्मित मार्गदर्शित क्षेपणास्त्र वापरले आहे. त्याव्यतिरिक्त समूहाकडे मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) आहेत; जसे की इराणनिर्मित शाहेद-१२९; ज्याची रेंज दोन हजार किलोमीटर आहे.