पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये चीनच्या वुहानमधून पसरलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवले आहे. वुहानमधून हा विषाणू उदभवल्यासंबंधीचा तपास अजूनही सुरू आहे. चीनच्या वुहानमध्ये विषाणूची उत्पत्तीच्या तपासणीचा विषय प्रलंबित असतानाच आता चीनमध्ये एका नव्या विषाणूने डोके वर काढले आहे; ज्यामुळे चीनसह जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. हा रहस्यमयी विषाणू आहे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही. करोनाच्या वेळी जगभर जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र चीनमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भारतातही या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. काय आहे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस? त्याची लक्षणे आणि उपाय काय? या विषाणूचा भारताला धोका किती? त्याविषयी जाणून घेऊ.

नव्या व्हायरसचा हाहाकार

नव्या विषाणूमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तेथील परिस्थितीच्या दृश्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. असंख्य वृत्त आणि ऑनलाइन पोस्टमध्ये नोंदविण्यात आल्यानुसार हा विषाणू वेगाने पसरत आहे. ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या व्हिडीओंमध्ये असे दिसून येत आहे की, ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि मृत्यूमुळे रुग्णालये आणि स्मशानभूमीत जागा राहिलेली नाही. परंतु, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत. या संकटाबद्दल चीनच्या आरोग्य अधिकारी किंवा ‘डब्ल्यूएचओ’ने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

China man revived after heart attack
रेल्वे स्थानकावर आला हृदयविकाराचा झटका; शुद्धीवर येताच म्हणाला, “मला कामाला जाऊ द्या”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Donald trump America china relations
अमेरिका चीन भाई भाई?
DeepSeek surge hits companies, posing security risks
‘डीपसीक’मुळे अमेरिकेच्या विदा सुरक्षेला धोका?
Trump tariffs impact against china canada and mexico
चीन, कॅनडा, मेक्सिकोविरुद्ध ट्रम्प यांचे ‘टॅरिफ युद्ध’ सुरू! पुढचा नंबर ‘ब्रिक्स’ आणि भारताचा?
President donald Trump Imposes tariffs hike on china canada and mexico
व्यापारयुद्धाचे रणशिंग; चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर; शेजारी देशांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
China is making huge fusion research facility
अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी चीनने तयार केले संशोधन केंद्र? याचा अर्थ काय? या घडामोडीमुळे भारतावर काय परिणाम?

हेही वाचा : ‘Ghost Particle’ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता समुद्राखाली बसवणार दुर्बिणी; कसं चालणार त्यांचं काम?

काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस, इन्फ्लुएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया व कोविड १९ सह अनेक विषाणू चीनमध्ये एकाच वेळी फिरत आहेत. देशात हाय अलर्टची परिस्थिती असल्याची माहिती आहे. परंतु, या विषाणूची अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस(एचएमपीव्ही) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आणि त्यामुळे व्यापक चिंता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. एचएमपीव्हीमध्ये इन्फ्लूएंझा आणि कोविड-१९ सारखी लक्षणे दिसून येतात; ज्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. चिनी आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, उद्रेक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.

करोनाच्या वेळी जगभर जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र चीनमध्ये पाहायला मिळत आहे. (छायाचित्र-फ्रीपीक/इंडियन एक्सप्रेस)

‘SARS-CoV-2 (COVID-19)’च्या ‘एक्स’नुसार, इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया व कोविड-१९ यासह श्वसनसंबंधित अनेक विषाणू चीनमध्ये एकाच वेळी फिरत आहेत. प्रकरणांमध्ये या वाढीमुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण पडला आहे. मुलांची रुग्णालये विशेषत: प्रभावित होत आहेत. न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्याच वेळी, रॉयटर्सच्या वृत्तात नमूद केले आहे की, चीनच्या रोगनियंत्रण प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले की, ते या परिस्थितीचे नियोजन करीत आहेत. हिवाळ्याच्या महिन्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये संभाव्य वाढ होण्याच्या शक्यतेने या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, ‘एचएमपीव्ही’साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.

लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषणूचा वाढता प्रभाव पाहाता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे.

चीन पुन्हा काही लपवत आहे का? याचा भारताला धोका किती?

कान बियाओ या चिनी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये चीनमध्ये श्वसनाचे अनेक आजार होतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण प्रकरणांची संख्या जास्त आहे की कमी, हे अजून स्पष्ट झालेले नाही. अलीकडील प्रकरणांमध्ये rhinovirus आणि ह्युमन मेटापन्यूमो व्हायरससारख्या रोगजनकांची उपस्थिती दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विषाणूची लक्षणे सामान्य सर्दीसारखी दिसत असली तरी या विषाणूची कोणतीही लस अद्याप विकसित झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी सुचवले आहे की, थंड हवामान आणि साथीच्या रोगामुळे एचएमपीव्हीसह श्वसन संक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान मर्यादित सामाजिक परस्परसंवाद आणि कठोर निर्बंधांमुळे अनेक विषाणू नियंत्रणात राहतात.

हेही वाचा : आता नायलॉन मांजापासून होणार दुचाकीस्वारांचं रक्षण? काय आहे ‘काइट स्ट्रिंग गार्ड’?

विशेषत: मुलांमध्ये सामान्य रोगजनकांचा संपर्क कमी होते. सर्व काही पूर्ववत झाल्यानंतर आता लोकांना पुन्हा अशा विषाणूंचा सामना करावा लागत आहे आणि त्याचा सर्वाधिक परिणाम मुले आणि प्रौढ नागरिकांवर होत आहे. चीनमधील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानेन्टर आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले होते की, या विषाणूचा भारताला कोणताही धोका नाही. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी स्पष्ट केले होते, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा उद्रेक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भारतात असे कोणतेही प्रकरण आढळून आलेले नाही. त्यामुळे सध्या चीनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताला काळजी करण्यासारखे कारण नाही.” परंतु, आता बंगळुरूमध्ये एका आठ महिन्यांच्या बाळाला याची लागण झाली असल्याने भारतात या विषाणूच्या प्रसाराची भीती निर्माण झाली आहे.

Story img Loader