इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतील हमास या अतिरेकी संघटनेने चढविलेल्या हल्ल्यास दोन आठवडे उलटून गेले आहेत. या काळात इस्रायलच्या प्रतिसादात्मक हवाई हल्ल्यांनी गाझाची अक्षरश: चाळण केली आहे. हमासचा संपूर्ण नायनाट करण्याचा विडा इस्रायलने उचलला असला, तरी केवळ हमासला संपवून हा प्रश्न मिटणार आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण केवळ हमासच नव्हे, तर इस्रायलच्या आसपासच्या देशांमध्ये इराणचे अनेक ‘अदृश्य हात’ इस्रायलविरोधी छुप्या युद्धामध्ये गुंतले आहेत.

इराण आणि इस्रायलमध्ये शत्रुत्व का?

खरे म्हणजे इस्रायलच्या स्थापनेनंतर लगेच, १९५० सालापासून दोन्ही देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध होते. मात्र इराणचे अखेरचे सम्राट शहा मोहम्मद रझा पेहलवी यांची सत्ता इस्लामी क्रांतीने १९७९ साली उलथविली गेली आणि इस्रायल-इराणचे संबंध बिघडले. इराणच्या नव्या राज्यकर्त्यांनी इस्रायलला शत्रुराष्ट्र घोषित केले. त्यानंतर इस्रायलविरुद्ध गनिमी युद्ध खेळण्यासाठी इराणने आखातामधील विविध देशांतील दहशतवादी संघटनांना बळ दिले. पॅलेस्टाईनमधील हमास व लेबनॉनमधील हेजबोला ही त्याची दोन प्रमुख अंगे बनली. याखेरीज सीरिया आणि इराकमधील अतिरेकी संघटनांनाही इराणची मदत होते. दुसरीकडे इराणचा अणुकार्यक्रम थांबविणे किंवा शक्य तितका लांबविणे हे इस्रायलचे धोरण असल्यामुळे दोन्ही देशांतील तणावात भर पडली आहे.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…

हेही वाचा : ओलिस ठेवलेल्यांचा ठावठिकाणा अद्याप का लागला नाही? इस्रायली लष्कराकडून काय प्रयत्न केले जात आहेत?

इराणचा ‘प्रतिकाराचा अक्ष’ कोणता?

इस्रायलभोवती असलेल्या देशांतील अतिरेकी संघटनांना सर्वतोपरी मदत करण्याचे इराणचे धोरण आहे. शिया पंथाच्या समान धागा असलेल्या लेबनॉनमधील हेजबोला संघटनेला इराण आपली लष्करी आघाडी म्हणून वापरत आला आहे. २००६च्या इस्रायल-लेबनॉन युद्धानंतर इराणच्या मदतीने हेजबोलाने इस्रायल सीमेवर क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जमविला आहे. इराणकडून होणाऱ्या शस्त्रपुरवठ्याचा मार्ग रोखण्यासाठी अनेकदा इस्रायलकडून लष्करी किंवा गुप्तहेर कारवाया केल्या जातात. त्याला क्षेपणास्त्रे डागून किंवा इस्रायल तळांवर हल्ले करून हेजबोलाचे अतिरेकी प्रत्युत्तर देतात. २०११ मध्ये सीरियातील गृहयुद्धानंतर इराणला इस्रायलच्या सीमेवर आणखी एक छुपी आघाडी उघडण्याची संधी मिळाली. सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पाठिंबा देण्यासाठी इराणने तेथील खासगी लष्करी संघटनांना पाठबळ दिले. इराक आणि सीरियामार्गे हेजबोला संघटनेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा अधिक सुलभ करणे हा इराणचा हेतू यामुळे सफल झाला. येमेनमधील हूती अतिरेक्यांनाही इराणकडून रसद पुरविली जाते. याला इराणचा ‘प्रतिकाराचा अक्ष’ (ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स) संबोधले जाते.

इस्रायलची युद्धनीती काय आहे?

सीरियातून हेजबोलाच्या अतिरेक्यांना होणारा शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी इस्रायल सीरियातील विमानतळांवर लक्ष्यभेदी हल्ले करत असतो. यात इराणचे काही नागरिक मारलेही जात असले, तरी त्याला प्रत्युत्तर दिले जात नाही. २०१८ मध्ये मात्र सीरियातील इराणपुरस्कृत अतिरेक्यांनी गोलान टेकड्या या इस्रायलने सीरियापासून तोडलेल्या प्रदेशावर क्षेपणास्त्रे डागली. याला इस्रायलने ताकदीने प्रत्युत्तर दिले. इराणचा अणुकार्यक्रम रोखणे हे उद्दिष्टही असल्याने इस्रायल गुप्तहेर कारवाया करतो. २०१० पासून आतापर्यंत इराणच्या पाच अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली आहे. इराणमधील अणुकेंद्रांवर घातपाताच्या घटना घडल्या. याची जबाबदारी इस्रायलने कधी स्वीकारली नसली, तरी फेटाळलेलीही नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये इराणमधील पेट्रोल पंप ठप्प होण्यामागे इस्रायलने केलेला सायबर हल्ला कारणीभूत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये इस्फाहान शहरातील इराणच्या दारूगोळा गोदामात घातपात झाला. दोन अमेरिकन वृत्तपत्रांनी यामागे इस्रायल असल्याचे वृत्त दिले होते.

हेही वाचा : विश्लेषण : प्रशिक्षणानंतर अग्निवीरांना थेट सियाचिनमध्ये तैनात करणे योग्य आहे का?

हमासच्या हल्ल्याचा इराणला फायदा काय?

अनेक पाश्चिमात्य गुप्तहेर संघटनांच्या मते हमासने आजवरचा सर्वात मोठा हल्ला इराणला अंधारात ठेवून केला. असे असले तरी याचा इराणला काही प्रमाणात लाभ होणार आहे. गाझातील कारवाईचे निमित्त करून हेजबोला, हूती आणि इराक-सीरियातील शिया मुस्लिमांच्या टोळ्यांना इस्रायलविरुद्ध हल्ले करण्यास प्रवृत्त करणे इराणने सुरू केले आहे. याचा फायदा असा, की अन्य आघाड्यांवर तयारीत गुंतल्यामुळे इस्रायलची गाझातील प्रत्यक्ष कारवाई लांबणीवर पडली आहे. इराणसाठी दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सौदी अरेबियाला ‘अब्राहम करारा’पासून काही काळ दूर ठेवणे हमासच्या हल्ल्यामुळे शक्य झाले आहे. २०२० पासून सुन्नीबहुल बहारीन, मोरोक्को, सुदान आणि संयुक्त अरब अमिराती यांनी या करारान्वये इस्रायलबरोबर संबंध जोडले आहेत. इस्रायलशी सर्वप्रथम जुळवून घेतलेला अरब देश, इजिप्तने गाझामधील नागरिकांना प्रवेश द्वावा, अशी मागणी करण्यामागेही इराणचा मुस्लीम जगताला इस्रायलपासून तोडण्याचाच हेतू आहे. युद्धस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याचाही इराणला आर्थिक फायदा होणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : नाराज पंकजा वेगळा निर्णय घेणार काय? भाजपला मतपेढीची चिंता!

इराणला त्रासदायक ठरणाऱ्या बाबी कोणत्या?

इराणची फूस असलेल्या हमासने केलेल्या या हल्ल्याचा सामान्य इराणी नागरिकांवर फारसा प्रभाव पडलेला नाही. उलट पाश्चिमात्य राष्ट्रांबरोबर तणाव वाढल्यामुळे इराणमध्ये देशांतर्गत निदर्शने पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे. १ तारखेला अर्मिता गेरावंद या शालेय मुलीचा पोलिसांच्या मारहाणीनंतर मृत्यू झाला आहे. गतवर्षी महसा अमिनीच्या तुरुंगातील मृत्यूनंतर उद्भवलेल्या स्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गाझातील मृतांना आदरांजली म्हणून तेहरानमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एक मिनिटाचे मौन बाळगण्यात आले. त्या वेळी काही जणांनी घोषणाबाजी करून हुर्यो उडविली. याखेरीज आणखी एक धोका आहे तो ‘प्रतिकाराच्या अक्षा’वरील इराणचे नियंत्रण सुटण्याचा… या अक्षाचे कर्ते-करविते इराणी लष्करी अधिकारी जनरल कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने ड्रोनहल्ल्याद्वारे हत्या केल्यानंतर हा धोका अधिक वाढला आहे. हमासने इराणला अंधारात ठेवून इस्रायलवर केलेला हल्ला, हे याचे एक उदाहरण म्हणता येईल. दुसरीकडे इराणच्या हस्तकांनी अमेरिकेचे नुकसान केले, तर अमेरिका थेट इराणवरच कारवाई करण्याची शक्यता असून इराणसाठी हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader