गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात २५० हून अधिक नागरिक ठार झाले असून अनेकांचे अपहरण करण्यात आले आहे. इस्रायलच्या ज्यू भूभागात १९४८ नंतर केलेला हा सर्वात भयाण हल्ला असल्याचे सांगण्यात येते. इस्रायलनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले असून गाझा पट्टीतील २३० लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. या हल्ल्यामुळे इस्रायली संरक्षण यंत्रणेची चिंता वाढली असून गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

सीएनएनचे संपादक निक रॉबर्ट्सन यांनी एक्स (जुने ट्विटर) वर रविवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गाझा पट्टीतून डागले जाणारे रॉकेट इस्रायलने हवेतच उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे. रॉकेट हवेतल्या हवेत नष्ट करण्याच्या इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम असे म्हटले जाते. इस्रायलच्या शेजारी असलेल्या गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २०११ साली आयर्न डोमची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
Prime Minister announces free elections in Syria
सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा

हे वाचा >> Israel-Palestine Conflict : मृतांचा आकडा वाढला; हमासकडून इस्रायल नागरिक कैद, गाझापट्टीवर धुमश्चक्री सुरूच!

आयर्न डोम म्हणजे काय?

कमी अंतरावर जमिनीपासून हवेत मारा करणारी ही एक हवाई सुरक्षा यंत्रणा (Air Defence System) आहे. ज्यामध्ये एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मारा करणाऱ्या बाबीला मध्येच अडवणारे क्षेपणास्त्र) समावेश आहे. या यंत्रणेचा वापर इस्रायलच्या दिशेने येणारे रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा हवेतच प्रतिकार करण्यासाठी केला जातो.

२००६ सालच्या इस्रायल-लेबनॉन युद्धामुळे आयर्न डोमची उत्पत्ती झाली. या युद्धावेळी लेबनॉनमधील हेजबुल्लाह दहशतवाद्यांनी इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर इस्रायलने देशातील नागरिकांचे प्राण आणि शहरे वाचविण्यासाठी राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टम कंपनीला नवीन हवाई सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी दिली. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने सदर यंत्रणा निर्माण केली.

२०११ साली अखेर आयर्न डोम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. संबंधित यंत्रणेचा यश मिळण्याचा दर ९० टक्के असल्याचा दावा राफेल कंपनीने केला आहे. २००० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांना निकामी करण्याची क्षमता यंत्रणेत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यंत्रणेचा यश मिळण्याचा दर ८० टक्क्यांच्या पुढे आहे. राफेलने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, “हवाई हल्ल्यांपासून तसेच युद्धाच्या भूमीवर आणि शहरी भागांतदेखील यापासून संरक्षण केले जाऊ शकते.”

हे वाचा >> इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?

आयर्न डोम कसे काम करते?

आयर्न डोममध्ये तीन मुख्य प्रणाली कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, त्या ठिकाणी धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी या तिन्ही प्रणाली एकत्रितपणे काम करतात. यामध्ये डिटेक्शन आणि ट्रॅकिंग रडार (Detection and Tracking Radar आहे, जे नजीक येत असलेल्या धोक्याची सूचना देते. युद्ध व्यवस्थापन आणि शस्त्र नियंत्रण प्रणाली (Battle Management and Weapon Control System) आणि क्षेपणास्त्र डागण्याचा विभाग (Missile Firing Unit) अशा तीन प्रणाली आहेत.

दिवस असो किंवा रात्र आणि हवामानाची परिस्थिती कशीही असली तरी ही यंत्रणा चोखपणे आपले काम करू शकते.

भारताच्या हवाई दलातील निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी नवी दिल्लीतील सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज (CAPS) या संस्थेचे प्रमुखपद भूषविलेले आहे. त्यांनी इस्रायलच्या आयर्न डोमबद्दल माहिती देताना सांगितले की, कोणत्यारी एअर डिफेन्स सिस्टिमचे दोन महत्त्वाचे घटक असतात. “एक म्हणजे रडार, ज्या माध्यमातून छोट्यातला छोटा धोकाही ओळखता आला पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या धोक्याचा अचूकपणे माग काढणे.”

अनिल चोप्रा यांनी पुढे सांगितले की, आपल्या दिशेने येत असलेले धोके ओळखणे आणि त्याचा माग काढणे यासाठी दोन ते तीन प्रकारचे रडार आहेत, जे कोणत्याही एअर डिफेन्स सिस्टिममध्ये कार्यरत असतात. जेव्हा आपण शस्त्र प्रक्षेपित करतो, तेव्हा ट्रॅकिंग रडारच्या माध्यमातून त्याचा अचूक ठिकाणी मारा केला जातो. त्यानंतर शस्त्र स्वतःची जबाबदारी पार पाडते.

एकदा का क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, त्यानंतर ते लक्ष्यापर्यंत पोहोचायला हवे, त्याने छोट्यातले छोटे लक्ष्य अचूक ओळखून त्यावर मारा करायला हवा. पण, प्रत्येकवेळी लक्ष्यावर थेट हल्ला होईलच, असे नाही. त्यामुळेच प्रत्येक क्षेपणास्त्रामध्ये प्रॉक्झिमिटी फ्यूज नावाची यंत्रणा बसवलेली असते. या यंत्रणेत लेझर नियंत्रित फ्यूज असतात. जेव्हा क्षेपणास्त्र लक्ष्याच्या आसपास दहा मीटर अंतरावरून जात असेल, तर ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि क्षेपणास्त्राचा स्फोट होतो, ज्यामुळे लक्ष्याचे नुकसान होऊन ते नष्ट होते, अशीही माहिती अनिल चोप्रा यांनी दिली.

आणखी वाचा >> इस्रायलमध्ये अडकली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री; संपर्क होईना, चिंता वाढली…

आयर्न डोमचा खर्च किती?

पूर्ण युनिटची किंमत ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. त्यातील एका इंटरसेप्टर तामीर क्षेपणास्त्राची किंमत जवळपास ८० हजार डॉलर आहे. याउलट यंत्रणेकडून निकामी करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राची किंमत ही १००० डॉलरपेक्षाही कमी असते. आपल्या सीमेवर आलेल्या क्षेपणास्त्राचा माग काढण्यासाठी आयर्न डोम यंत्रणेतून प्रत्येक वेळी दोन तामीर क्षेपणास्त्र सोडले जातात. अनिल चोप्रा म्हणाले की, या यंत्रणेसाठी लागणारा खर्च आणि त्यातून नष्ट करण्यात येणाऱ्या रॉकेटची किंमत याची तुलना करणे योग्य ठरणार नाही. खर्चिक असली तरी या यंत्रणेमुळे प्रतिबंधक उपाय राबविता येतात. शत्रूचे क्षेपणास्त्र निकामी केल्यामुळे अनेकांचा जीव वाचतो. तसेच शत्रूचे क्षेपणास्त्र आपल्या सीमेत न आल्यामुळे राष्ट्राचे मनोबलही वाढते.

Story img Loader