पहलगाम इथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांवर गोळी चालवण्याआधी दहशतवाद्यांनी त्यांची मुस्लिम ओळख सिद्ध करण्यासाठी कलमा नावाचा इस्लामिक कलमा म्हणण्यास सांगितले. ज्यांना कलमा म्हणता आल्या नाही, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. शांतता आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पहलगाममध्ये आलेल्या असंख्य पर्यटकांसाठी कलमा हा जीवन-मरणाचा प्रश्न ठरला. आसाम विद्यापीठातील प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांना कलमा माहिती असल्याने ते दहशतवाद्यांपासून वाचले. “एक दहशतवादी आमच्याकडे आला आणि त्याने माझ्या शेजारी असलेल्या माणसावर गोळी झाडली. नंतर त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि मी काय करत आहे, असं विचारलं. मी फक्त मोठ्या आवाजात कलमांचं पठण केलं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मला माहीत नाही काय झालं, तो फक्त निघून गेला”, असं भट्टाचार्य यांनी पीटीआयला सांगितलं.

इस्लाममध्ये कलमा म्हणजे काय?

कलमा म्हणजे श्रद्धेवर शिक्कामोर्तब करणं आहे, ज्या अल्लाह एकच आहे आणि मुहम्मद यांच्या प्रेषित असण्यावरील विश्वास सिद्ध करते. सर्व मुस्लिमांना कलमा माहीत असल्या पाहिजे. कारण- त्या इस्लाम धर्माप्रति श्रद्धा दर्शवतात, असं मानलं जातं. नियमितपणे कलमांचं पठण करणं हा मुस्लिमांना अल्लाहची उपासना करण्याच्या आणि पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणींचं पालन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची आठवण करून देण्याचा एक मार्ग आहे. कलमा मुस्लिमांसाठी वैयक्तिक चिंतन आणि श्रद्धेचं परिमाण म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात, असं म्हटलं जातं.

कलमा किती प्रकारच्या आहेत?

कलमांचे सहा प्रकार आहेत. त्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा उद्देश आणि अर्थ आहे.

पहिली कलमा तैय्यब म्हणजे शुद्धता :

अल्लाह एकच आहे आणि मुहम्मद त्याचा प्रेषित असल्याचे ही कलमा सांगते. हे पठण करून एक मुस्लिम असे सिद्ध करतो की, अल्लाहशिवाय इतर कोणीही देव नाही, तो एकच आहे. मुहम्मद त्याचे प्रेषित आहेत.
“ला इलाहा इल्लल्लाह वहदाहू का शरीका लहू, लहू व अशदाहू अन्ना मुहम्मद अब्दुह व रसूलुहू”
इस्लामिक वेबसाईटनुसार त्याचे भाषांतर असे आहे की, अल्लाहशिवाय इतर कोणीही देव नाही, तो एकच आहे आणि त्याच्यासारखा कोणीही नाही. मुहम्मद त्याचे प्रेषित आहेत.

दुसरी कलमा शहादत म्हणजे साक्ष :

ही श्रद्धेची साक्ष आहे, जी अल्लाह एकच आहे आणि मुहम्मद पैगंबरावरील विश्वासावर शिक्कामोर्तब करते. हे अनेकदा चिंतनाच्या क्षणांमध्ये किंवा जेव्हा एखादी व्यक्ती इस्लाम स्वीकारते तेव्हा या कलमांचे पठण केले जाते.
“अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदाहू ला शरीका लहू वा अशहदु अन्ना मुहम्मदान अब्दुह व रसूलुहू”
याचे भाषांतर असे आहे, “मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय इतर कोणीही देव नाही, तो एकच आहे. त्याच्यासारखा कोणीही नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद त्याचा प्रेषित आहे.”

तिसरी कलमा तमजीद म्हणजे महिमा:

हे अल्लाहच्या परिपूर्णता, सार्वभौमत्व व महानता यासाठी त्याची स्तुती करते. ते अल्लाहच्या दयेबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करते.
“सुभानल्लाही वालहमदुलिल्लाही वा ला इलाहा इल्लाल्लाह वल्लाहू अकबर, वा ला हवाला वा ला कुव्वाता इल्ला बिल्लाही अलियिल अदीम”
याचं भाषांतर असं आहे की, अल्लाहमी महिमा आहे, सर्व स्तुती अल्लाहची आहे. अल्लाहशिवाय इतर कोणीही देव नाही आणि अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. अल्लाहशिवाय इतर कोणतीही शक्ती नाही.”

चौथी कलमा तौहीद म्हणजे एकता :

अल्लाह एकच आहे हा विश्वास व्यक्त करते. तो अल्लाहसारखा कोणीही नाही याची आठवण करून देते. ही कलमा इस्लामिक एकेश्वरवादाच्या सिद्धांतावर भर देते. “ला इलाहा इल्लल लाहू वहदाहू ला शरीकलहू लहुल मुलको वलाहुल हमदो युही वा युमीतो व ​​होआ हैय युल ला यमूतो अबदान अबदा झुल जलाली वल इकराम बयादीहिल खैर. वा होवा आला कुल्ली शायी इन कादीर”
इस्लामिक वेबसाईटनुसार याचा अर्थ असा होतो की, अल्लाहशिवाय इतर कोणीही उपासनेला पात्र नाही. तो एकच आहे आणि त्याच्यासारखा कोणीही नाही. त्याचेच राज्य आहे आणि सर्व प्रशंसा त्याच्यासाठीच आहे. तो जीवन देतो आणि मृत्यूही. त्याच्याच हातात सर्व काही चांगले आहे आणि तो प्रत्येक गोष्टीसाठी सामर्थ्यवान आहे.

पाचवी कलमा अस्तफगर म्हणजे पश्चात्ताप :

ही कलमा प्रत्येक मुस्लिमाला त्यानं केलेल्या पापांसाठी क्षमा मागण्याची आणि पश्चात्तापानं अल्लाहकडे जाण्याची विनंती करते. ही कलमा मुस्लिमांना नम्रता आणि दैवी दयेचा शोध घेणं शिकवते.
“अस्तगफिरुल्ला रब्बी मिन कुल्ले झांबिन अजनबतुहो अमादान आओ खत एन सिरान आओ अलानियातान वा अतुबू इलायही मि आज जम्बिल लाझी आलमो वा मिन अझ जंबिल लाझी ला आलामो इंनाका अंता अल्लामुल घुयूल्बी ओझ्बुझुउझ्बुझ वारबी वाला हा ओला वाला क्व्वाता इल्ला बिला हिल अलीयल अजीम”
याचा अर्थ असा होतो की, मी अल्लाहकडे क्षमा मागतो. तो माझा निर्माता व पालनकर्ता आहे. मी जाणूनबुजून किंवा नकळत, गुप्तपणे किंवा उघडपणे केलेल्या प्रत्येक पापासाठी क्षमा मागतो. मी अशा सर्व पापांसाठी क्षमा मागतो, ज्याची जाणीव मला आहे किंवा ते माहीतही नाही. निश्चितच तू दडलेल्या गोष्टींचा जाणकार आहेस आणि पापांना क्षमा करणारा आहेस. अल्लाहपेक्षा इतर कोणतीही शक्ती किंवा ताकद मोठी नाही, महान नाही.

सहावी कलमा रद्दे कुफ्र म्हणजे विश्वास ठेवणे :

हा एक प्रार्थनेचा प्रकार आहे. यामध्ये मुस्लिम अनेकेश्वरवादाचा निषेध करतात आणि अल्लाहशी निष्ठा घोषित करतात. “अल्लाहुम्मा इन्नी अउधु बिका मिन अन उश्रिका बिका शाई-अन्व-वा आना आलामू बिही. वस् तग फिरुका लिमा ला आलमु बिही. तुब्तु अनहु वा तबरा-तू मिन अल-कुफरी वॉश-शिर्की वाल-किझ्धबी वाल-इमाबति वाल-वती-वान्ति वाल-किज्द्धी फवाहिशी वाल-बुहतानी डब्ल्यू-अल-माआसी कुल्लिहा वा अस्लमतु वा अक्लुलु ला इल्लाहा इल्लाहु मुहम्मद रसूलअल्लाह”
याचा अर्थ असा आहे की, ज्या पापाचं मला ज्ञान नाही, त्या पापासाठी मी तुझी क्षमा मागतो. माझ्या अविश्वास, खोटं बोलणं आणि निंदा करणं, अश्लीलता व घृणास्पद कृत्यं आणि इतर सर्व अवज्ञाकारी कृत्यांचा मी पश्चात्ताप करतो आणि तुला शरण येतो.

इस्लाममध्ये कलमा का महत्त्वाच्या?

कलमा इस्लाम धर्माच्या मूळ श्रद्धा प्रतिबिंबित करतात. या सहा कलमा जगभरातील मुस्लिम पाळतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात यांचा तत्त्व म्हणून समावेश करतात. ते अल्लाह एकच आहे, मुहम्मद त्याचा प्रेषित असणं यावर शिक्कामोर्तब करण्याचे समर्थन करतात. या कलमांच्या माध्यमातून मुस्लिम लोक अल्लाहशी त्यांचे नाते आणि इस्लामच्या तत्त्वांप्रति त्यांची वचनबद्धता अधिक मजबूत करतात, असे मानले जाते. याव्यतिरिक्त कलमा म्हणजे क्षमा, कृतज्ञता व अनेकेश्वरवादापासून संरक्षणासाठी प्रार्थना असल्याचे मानले जाते.