प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री बियोन्सेचे लाखो चाहते आहेत. तिला क्वीन बे म्हणूनही ओळखले जाते. आपल्या गायनामुळे कायम चर्चेत असणारी बियोन्से आता एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. तिचे वडील मॅथ्यू नोल्स नुकतंच स्तनाच्या कर्करोगातून (ब्रेस्ट कॅन्सर) ठीक झाले आहेत. १७ ते २३ ऑक्टोबर हा आठवडा अमेरिकेत पुरुष स्तन कर्करोग जागरूकता आठवडा म्हणून साजरा केला जात आहे. ७२ वर्षे वय असणार्‍या मॅथ्यू नोल्स यांनी आजाराशी दिलेल्या आपल्या लढ्याविषयी सांगितले आहे. ‘हेल्थलाइन’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “कधीकधी पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो, परंतु याबद्दल अनेकांना माहीत नाही. मी त्यातून गेलोय म्हणून मला बोलण्याची संधी मिळत आहे.” त्यांनी सांगितलेल्या अनुभवानंतर पुरुषांना होणार्‍या स्तनाच्या कर्करोगाची चर्चा वाढली आहे. पण पुरुषांना खरंच स्तनाचा कर्करोग होतो का? त्याची लक्षणे काय असतात? स्तनाचा कर्करोग असलेल्या स्त्रियांना जे उपचार करावे लागतात तेच उपचार पुरुषांनाही घ्यावे लागतात का? त्याविषयी जाणून घेऊ.

पुरुषांना होणारा स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग स्त्रियांशी संबंधित आहे, असा अनेकांचा समाज आहे. परंतु, स्तनाचा कर्करोग पुरुषांमध्येही होऊ शकतो, मात्र, तो अगदीच दुर्मिळ आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटी स्पष्ट करते की, शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागात पसरू शकतात. पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊती असतात आणि तिथेच त्यांना कर्करोग होऊ शकतो. पुरूषांना होणार्‍या स्तनाच्या कर्करोगाचे दोन प्रकार आहेत; त्यातील एक प्रकार म्हणजे इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा आणि दूसरा प्रकार आहे, डक्टल कार्सिनोमा इन सिटू. सर्वप्रथम कर्करोगाच्या पेशी नलिकांमध्ये तयार होतात आणि नंतर नलिकांच्या बाहेर स्तनाच्या ऊतींमध्ये वाढतात. परंतु, पुरुष स्तनाच्या कर्करोगाच्या दुस-या प्रकारात कर्करोगाच्या पेशी फक्त नलिकांमध्ये असतात आणि स्तनातील इतर ऊतींमध्ये पसरत नाहीत.

pediatricians observation in diseases in children
धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
what is the pink tax that additional price paid by women
स्त्री ‘वि’श्व : ‘गुलाबी करा’चे गूढ
Health Special, aggression in society, aggression,
Health Special : समाजमनातील आक्रमकता कुठून येते?
Loksatta chaturang life encouraged think Cognitive Science
जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग
Long term impacts of climate change on coastal area
किनारपट्टीवरील शहरांतील हवामान बदल नियमांच्या अंमलबजावणीत त्रुटी
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री बियोन्सेचे वडील मॅथ्यू नोल्स नुकतंच स्तनाच्या कर्करोगातून (ब्रेस्ट कॅन्सर) ठीक झाले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Yahya Sinwar Death: याह्या सिनवारच्या हत्येनंतर हमासचे नेतृत्व कोण करणार?

स्तनाचा कर्करोग फक्त स्त्रियांना होतो असे गृहीत धरण्याचे कारण म्हणजे महिलांमध्ये दिसून येणारी प्रकरणे. अमेरिकेत प्रत्येक १०० स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणांपैकी फक्त एका पुरुषामध्ये हा रोग आढळतो. ब्रिटनमध्ये, २०१७ मध्ये ३१९ पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते, त्या तुलनेत स्त्रियांची संख्या ४६ हजार होती. परंतु, डॉक्टरांना असे दिसून आले आहे की, या आकडेवारीत हळूहळू बदल होताना दिसत असून, आता पुरुषांमध्येही याची संख्या वाढत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकन कॅन्सर सोसायटी (एसीएस) च्या मते, या वर्षी अमेरिकेमध्ये पुरुष स्तनाच्या कर्करोगाच्या सुमारे २,७९० नवीन प्रकरणांचे निदान झाले आणि सुमारे ५३० पुरुषांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. अमेरिकेतील स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा १०० पट कमी असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते.

पुरुष स्तनाच्या कर्करोगासाठीचे जोखीम घटक

असे अनेक घटक आहेत जे, पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. त्यापैकी एक म्हणजे वृद्धत्व. वयानुसार पुरुषाला स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत जातो. सरासरी, स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झालेल्या पुरुषांचे वय सुमारे ७२ वर्षे किंवा त्याहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. परंतु, सर्वात लक्षणीय जोखीम घटकांपैकी एक म्हणजे जनुक उत्परिवर्तन. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘BRCA2’ जनुकातील उत्परिवर्तन असलेल्या पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, १०० पैकी सहा पुरूषांना याचा आयुष्यभर धोका असतो. BRCA1 जनुकांच्या उत्परिवर्तनामुळेदेखील पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, परंतु हा धोका कमी असतो, म्हणजेच १०० पैकी एक अशी याची टक्केवारी असते.

ज्या पुरुषांना ‘क्लाइनफेल्टर सिंड्रोम’चा त्रास होतो, त्यांनादेखील स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. क्लाइनफेल्टर सिंड्रोम ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये पुरुषामध्ये अतिरिक्त ‘एक्स’ गुणसूत्र असते. यामुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि एन्ड्रोजनची पातळी कमी होते. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणामुळेही पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कारण लठ्ठपणाचा संबंध शरीरातील इस्ट्रोजेनच्या उच्च पातळीशी असतो. यामुळे पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

पुरुषांमध्ये दिसणारी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

तज्ज्ञांच्या मते पुरुषांमध्ये दिसणारी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे महिलांसारखीच असतात. यामध्ये त्या भागात वेदनारहित गाठ येणे किंवा त्या भागवरील त्वचेत किंवा त्वचेच्या रंगात बदल होणे, यांचा समावेश असतो. छातीच्या भागात त्वचा लाल होणे हेदेखील पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. आणखी एक लक्षण म्हणजे छातीतून रक्तस्त्राव. या लक्षणामुळे मॅथ्यू नोल्स यांना या आजाराचे निदान लागणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस असेही लिहिते की, तुमच्या छातीवर फोड किंवा व्रण तसेच तुमच्या स्तनाग्राचा आकार बदलणे किंवा त्यावर पुरळ येणे, हीदेखील कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

हेही वाचा : भारताला ९४ वर्षांमध्ये विज्ञानाचं एकही नोबेल पदक का मिळू शकलं नाही?

उपचार काय?

जर एखाद्या पुरुषाला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले असेल, तर त्यांना देण्यात येणारे उपचार स्त्रियांप्रमाणेच असतात; ज्यामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी आणि लक्ष्यित थेरपी यांचा समावेश होतो. बहुतेक पुरुष ज्यांना स्तनाचा कर्करोग आहे, ते ट्यूमर काढून टाकण्यासाठी मास्टेक्टॉमी करून घेतात. या स्थितीचे निदान झाल्यानंतर बियॉन्सेच्या वडिलांनीदेखील हेच केले. यामध्ये, स्तनाग्रांसह संपूर्ण स्तन आणि काहीवेळा छातीचे काही स्नायू आणि त्याच बाजूच्या काखेखालील लिम्फ नोड्स काढून टाकले जातात. तज्ज्ञ हेदेखील सांगतात की, लवकरात लवकर चाचणी करणे, हा उपचारासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. एनवायसी हेल्थ अँड हॉस्पिटल्सच्या ब्रेस्ट हेल्थ सर्व्हिसेसच्या संचालक मारिया कास्टल्डी यांनी हेल्थलाइनला सांगितले की, उशीरा निदान झाल्यामुळे पुरुषांमधील स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगापेक्षा वाईट परिणाम करू शकतो. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि ॲडव्हेंटहेल्थ कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील ब्रेस्ट कॅन्सर प्रोग्रामचे क्लिनिकल प्रोग्राम डायरेक्टर वासिम मॅकहेलेह, हे निदर्शनास आणतात की, ज्या पुरुषांमध्ये जनुकीय उत्परिवर्तन होते, त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून दरवर्षी स्व-स्तन तपासणी करावी आणि वयाच्या ५० व्या वर्षी मॅमोग्राफी करावी.