प्राणघातक मारबर्ग विषाणू रवांडामध्ये वेगाने पसरत आहे. करोनानंतर हा जगातील सर्वांत धोकादायक विषाणू असल्याचे सांगण्यात येते. पूर्व आफ्रिकन देशात गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात मारबर्गच्या पहिल्या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी ४६ लोकांना संसर्ग झाला आहे आणि १२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सुमारे ८० टक्के संसर्ग वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. १३ दशलक्षांहून अधिक लोकसंख्या असणार्‍या देशात केवळ १५०० डॉक्टर्स आहेत. या उद्रेकामुळे देशातील आरोग्य सेवा प्रणालीवर लक्षणीय ताण येण्याची भीती आहे. मारबर्ग व्हायरस काय आहे? हा विषाणू किती घातक आहे? त्याची लक्षणं काय? हा विषाणू भारतातही पसरण्याची शक्यता आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारबर्ग व्हायरस म्हणजे काय?

१९६७ साली मारबर्ग विषाणू सर्वप्रथम जर्मनीत आढळून आला होता. मारबर्ग व्हायरस डिसीज (एमव्हीडी)चा मृत्युदर २४ ते ८८ टक्यांपर्यंत आहे. त्या अर्थाने हा अतिशय धोकादायक विषाणू आहे. जर्मनीनंतर या विषाणूची बहुतेक प्रकरणे आफ्रिकेमध्ये आढळून आली आहेत. मारबर्ग हा विषाणू इबोलाप्रमाणेच ‘फिलोव्हायरस’ कुटुंबातील आहे. दोन्ही रोगजनक वैद्यकीयदृष्ट्या सारखेच आहेत आणि दुर्मीळ असले तरी त्यांचा मृत्युदर जास्त आहे.

१९६७ साली मारबर्ग विषाणू सर्वप्रथम जर्मनीत आढळून आला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘सॅल्मन स्पर्म फेशियल’ काय आहे? हॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये याची लोकप्रियता का वाढतेय?

मारबर्ग व्हायरस कसा पसरतो?

सुरुवातीला मारबर्ग व्हायरसचा संसर्ग खाणी किंवा गुहांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे रुसेट्टस वटवाघळांच्या वसाहतींमध्ये राहिल्यामुळे, विशेषत: इजिप्शियन फ्रूट बॅटमुळे पसरत होता. परंतु, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)नुसार, मारबर्गचा प्रसार थेट संक्रमित लोकांच्या रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्काद्वारे आणि अप्रत्यक्ष (पृष्ठभाग आणि बिछाना, कपडे इ.) संक्रमणाद्वारे होतो. पुष्टी झालेल्या किंवा संशयित मारबर्ग प्रकरणांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वारंवार संसर्ग झाला आहे.

मारबर्गची लक्षणे काय आहेत?

२ ते २१ दिवसांच्या कालावधीत मारबर्ग विषाणूची लक्षणे दिसून येतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, प्रारंभिक लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे व उलट्या ही लक्षणे दिसून येतात. अनेक रुग्णांमध्ये रक्तस्रावाची लक्षणेही दिसून येतात. काहींमध्ये अनेकदा मल आणि उलटीमध्ये रक्त येणे, नाक, हिरड्या व योनीमार्गाद्वारे रक्त येणे, यांसारखी गंभीर लक्षणेही दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यानंतर आठ ते नऊ दिवसांनी रुग्णाचा मृत्यू होतो. या आजारातून व्यक्ती बरी झाला तरी त्याचे रक्त किंवा वीर्यात हा विषाणू अनेक महिने असू शकतो आणि दुसऱ्याला तो संक्रमित करू शकतो.

२ ते २१ दिवसांच्या कालावधीत मारबर्ग विषाणूची लक्षणे दिसून येतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी केली जाते? कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात पुरस्कार?

मारबर्ग व्हायरसवर उपचार काय?

सध्या मारबर्ग विषाणूवर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार नाहीत. परंतु, डब्ल्यूएचओच्या मते, आवश्यक काळजीसह याची लागण झालेल्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात पाणी आणि रक्त चढवले जाते आणि विशिष्ट लक्षणांवर उपचार केले जातात. त्यामुळे मृत्यूचा धोका कमी केला जातो. रवांडाचे आरोग्यमंत्री सबिन नसानझिमाना यांनी म्हटले आहे की, देश प्रायोगिक लस व उपचार शोधत आहे आणि औषधे व लसी तयार करण्यावरही भर देत आहे. अमेरिकास्थित सॅबिन लस संस्थेने रवांडाला त्यांच्या प्रायोगिक मारबर्ग लसीचे ७०० डोस दिले आहेत, जे आघाडीवर असलेल्या आरोग्य सेवा व्यावसायिकांना दिले जातील.