आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. ऑफिसमधील कामाच्या तणावामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव वाढत असल्याचे दिसून येते. केवळ चाळिशीनंतरच नव्हे, तर पंचविशीतील तरुण पिढीमध्येदेखील मानसिकरीत्या थकल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. याच मानसिक तणावामुळे एक नवा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘मायक्रो-रिटायरमेंट’. बूमर्स (१९४६ ते १९६४) व जेन एक्स (१९६५ ते १९८०) प्रत्यक्षात निवृत्त होण्यासाठी धडपडत असताना, तणावात असणारे मिलेनियल्स (१९८१ ते १९९६) व जेन झेड (१९९०-२०१०) कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम सुरू ठेवणे कठीण जात आहे, त्यामुळे तरुण पिढी या ट्रेंडचा अवलंब करताना दिसत आहे. काय आहे ‘मायक्रो-रिटायरमेंट’ ट्रेंड? या ट्रेंडची इतकी चर्चा का? त्याविषयी जाणून घेऊ.

‘मायक्रो-रिटायरमेंट’ काय आहे?

जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या करिअरमधून काही महिने किंवा अगदी वर्षांसाठी ब्रेक घेतो तेव्हा त्याला ‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हटले जाते. बर्नआउटवर मात करण्यासाठी म्हणजेच कामाच्या ताणाने त्रस्त झाल्यावर या काळात सुटीवर जाणे किंवा छंद जोपासण्यासारख्या गोष्टी लोक करतात. काही लोकांसाठी, ‘मायक्रो-रिटायरमेंट’ व्यक्तींना कामाच्या ठिकाणापासून विश्रांती घेत, वैयक्तिक आवड जोपासण्याची एक संधी प्रदान करते. काही जण या काळात स्वतःचा जोड व्यवसाय सुरू करू शकतात, असे एचआर कन्सल्टन्सी ‘द राइज जर्नी’च्या जेस ओसरो यांनी ‘बिझनेस इनसाइडर’ला सांगितले. “ही संकल्पना आणि याची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते,” असेही ओसरो यांनी स्पष्ट केले. २०२३ प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात, ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ४४ टक्के कामगारांनी सांगितले की, ते त्यांच्या नोकरीबद्दल खूप समाधानी आहेत. तसेच ६५ टक्के कामगारांनी मान्य केले की, ते असमाधानी आहेत.

Six year old Girl in just one minute did 100 pushups
‘तरुणांनो, तुम्हाला जमेल का?’ सहा वर्षांच्या चिमुकलीने फक्त एका मिनिटात मारले १०० पुशअप्स; VIDEO पाहून व्हाल शॉक
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Services sector hit by slowdown, PMI hits two-year low
सेवा क्षेत्राला गतिरोधाची बाधा ‘पीएमआय दोन वर्षांच्या नीचांकी
Shocking video of man attacked elder woman and snatched chain robbery video viral on social media
बापरे, आता वृद्ध महिलाही सुरक्षित नाहीत! घराबाहेर उभ्या असणाऱ्या महिलेबरोबर ‘त्याने’ काय केलं पाहा, धक्कादायक VIDEO व्हायरल
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…

हेही वाचा : ‘या’ देशाने व्हिसा नियमांमध्ये केले मोठे बदल; त्याचा भारतीयांवर काय होणार परिणाम?

काही कर्मचाऱ्यांना कामाचा फटका बसला आहे. गॅलपच्या अहवालात म्हटले आहे की, ५० टक्के कामगारांनी नोंदवले की, ते त्यांच्या स्वतःच्या जीवनात बदल घडवू इच्छित आहेत,” २००९ पासून लोकांच्या भावनांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली तेव्हापासून या प्रतिक्रिया येत आहेत. २०२० मध्ये जेव्हा साथीच्या रोगाचा फटका बसला तेव्हा कर्मचाऱ्यांच्या भरभराटीचा दर कमी होऊ लागला. लॉकडाऊन, रिमोट वर्किंग, हायब्रिड वर्क मॉडेल आणि नंतर वर्कफोर्समध्ये प्रवेश केल्याने जेन झी कर्मचारी नाखूश असल्याचे दिसून आले. सिग्नाच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जेन झी ही ऑफिसमध्ये सर्वांत कमी पगार असलेली आणि सर्वांत जास्त तणाव असणारी पिढी आहे. दुसरीकडे, मिलेनियल्स पिढीने बर्नआउटचा मोठ्या प्रमाणात अनुभव घेतला आहे.

जेव्हा सततच्या परिश्रमामुळे एखादी व्यक्ती दुर्बल अवस्थेत ढकलली जाते, तेव्हा त्याला बर्नआउट म्हणतात. ( छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

बर्नआउट म्हणजे काय आणि ते कसे टाळायचे?

जेव्हा सततच्या परिश्रमामुळे एखादी व्यक्ती दुर्बल अवस्थेत ढकलली जाते, तेव्हा त्याला बर्नआउट म्हणतात. त्याचा परिणाम केवळ तुमच्या कामाच्या ठिकाणातील कार्यक्षमतेवरच नाही, तर तुमच्या आरोग्यावरही होतो. सुमारे सात टक्के व्यावसायिकांवर बर्नआउटचा गंभीर परिणाम झाला आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. बर्नआउटचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, जसे की कोरोनरी धमनी रोग, उच्च रक्तदाब, झोपेचा त्रास, नैराश्य व चिंता, तसेच अल्कोहोल आणि ड्रग्सचा वापर वाढणे यांमुळे निरर्थकता, परकेपणाची भावना निर्माण होऊ शकते आणि दीर्घकालीन करिअरच्या शक्यतादेखील कमी होऊ शकतात.

बर्नआउटसाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ- नोकरी, सांघिक किंवा संस्थात्मक स्तरावरील बदलांमुळे चिंता आणि उच्च पातळीचा ताण येऊ शकतो. त्यासाठी शारीरिक आणि भावनिक उर्जा निर्माण करणे आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता निर्माण करणे, झोपेच्या चांगल्या सवयी, पोषण, व्यायाम, सामाजिक संबंध यांना प्राधान्य देणे, ध्यान करणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासारख्या पद्धतींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.

साठीचे कर्मचारी निवृत्तीच्या निर्णयासाठी असमर्थ का?

जेन झी कामगार कर्मचारी काम सोडण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात. फॉर्च्युनच्या एका अहवालानुसार, एकूणच वाढत्या महागाईमुळे प्रौढ लोक अपेक्षेपेक्षा जास्त काम करतात. या पिढीतील कर्मचारी श्रीमंत असले तरी आर्थिक चिंतेमुळे ते अधिक काटकसरीने वागतात आणि त्यांना वाटते की, त्यांना प्रत्यक्षात निवृत्त होण्यापेक्षा जास्त काम करण्याची गरज आहे. अशा प्रकारे, सेवानिवृत्तीसाठीचे आवश्यक वय अपेक्षेपेक्षा वाढत जाते. हा एक व्यापक ट्रेंड आहे, कारण- प्यू रिसर्च सेंटरच्या डेटानुसार, ३५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत ६५ वर्षांहून अधिक वयाच्या अमेरिकन लोकांचा दर जवळजवळ दुप्पट झाला आहे.

मायक्रो-रिटायरमेंट कशी घ्यावी?

ज्या कर्मचाऱ्यांच्या कंपन्या सब्बॅटिकल म्हणजेच पगारी सुट्या देत नाहीत, त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आरामदायी असल्याची खात्री करण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक योजना तयार करावी. करिअर प्रशिक्षक लोकांना मायक्रो-रिटायरमेंटनंतर त्यांच्या कौशल्यांसह अद्ययावत राहण्याचा सल्ला देतात. एखादी व्यक्ती तिची व्यावसायिक कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी महिन्यातून पाच ते सात तास घालवू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला नोकरी शोधण्यास मदत होऊ शकते.
द लॅटिन टाइम्सच्या मते, काही अतिरिक्त सल्ल्यांमध्ये समाविष्ट बाबी खालीलप्रमाणे :

हेही वाचा : तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत? 

आर्थिक तयारी : सुट्टी घेण्यापूर्वी मासिक खर्चात २५ ते ३५ टक्के कपात करा.

कनेक्टेड राहा : नवीन नोकऱ्या जलदपणे शोधण्यासाठी विश्रांतीदरम्यान व्यावसायिक नेटवर्कसह जुळून राहा.

योग्य गुंतवणूक : मायक्रो-रिटायरमेंटच्या टप्प्यात तुमच्या गुंतवणुकीपैकी १५ ते २५ टक्के तुमच्या गरजांसाठी राखून ठेवा.

Story img Loader